माझे साडी प्रेम

Submitted by शिवानी बलकुंदी on 24 February, 2025 - 04:32

जगात भारी भारतीय नारी च्याच् धर्तीवर जगात भारी भारतीय सारी (साडी) असे म्हणावेसे वाटते. सकाळी घाईघाईने कपाट उघडावे आणि अंगावर साड्यांचा पाऊस पडावा, असे कायम च् घडत असते. घरातील सगळ्यांच्या कपाटात हक्काने एक एक खण आपल्या साड्यांसाठी आधीच आरक्षित करून ठेवल्या मुळे नवीन साड्या ठेवण्यासाठी छान सोय झालीय असे कितीही वाटत असले तरिही नवीन खरेदी झाल्यावर या साड्या कुठे बर ठेवाव्यात हा कायमच अनुत्तरित राहणारा प्रश्न.
अलीकडेच माझ्या साडी संग्रहात नव्यानेच् दोन
साड्यांची भर पडली आणि घरात जणू काही माणसे जास्त आणि जागा कमी असावी अशा त्राग्याने हट्ट बाई म्हणून चिडचिड करून झाली. त्यावर उपाय म्हणून एखादे नवे कपाटच का विकत घेऊ नये असाही विचार मनात तरळून गेला, पण... तो पती राजांकडे मांडला तर त्यावर “ अगं त्यापेक्षा जरा तुझ्या साड्या कमी कर” असे उत्तर येऊ शकते अशी शक्यता नाकरता येत नाही, असा विचार येऊन, त्यापेक्षा यावर काही न् बोलता मी बिचारी गप्पच राहाणे पसंत करते. कारण नोकरी निमित्याने भ्रमंतीवर असलेल्या पती राजांना ना पुढील वेळी “ तूम्ही गेला आहे ना तिकडे सिल्क खूप छान् मिळते, माझ्यासाठी एक साडी घेऊन याल, असे विनंती वजा फरमान हक्काने काढता येते. सिल्क ची जागा कधी कॉटन तर कधी बनारसी, जामदानी अशी बदलत जाते, मात्र मागणी कायम एकच् असते ती म्हणजे, माझ्यासाठी साsss असं मी म्हणणार आणि पलीकडून मsss म म्हटलं जावं. त्या नंतर ही कधीतरी चुकून वाढदिवसानिमित्त वगैरे अहोंनी ' अग तुझ्यासाठी काय आणू एवढे विचारण्याचा धोखा पत्करलाच तर परत माझा साssss तय्यार, माझ्यासाठी ना एक ..
तर असे नावरोजिंकडून कधी हक्काने, कधी भांडून, तर कधी भावनिक साद घालून साडी ची हौस पूर्ण करून घेऊन समाधान मानावे हे किमान साडी या एका बाबतीत तरी मुळीच लागू होत नाही. कारण स्वत; दुकानात जाउन साडी खरेदी करण्याचा आनंद काय वर्णावा, बहिणीला फोन करून “ अग चिटणविस सेंटर ला सिल्क एक्सपो लागले आहे जायच का ’ असा सवाल टाकण्याची च देर की बहिणी बहिणी मिळून एकदा तरी चक्कर मारून येऊ म्हणत परत येताना दोन्ही हातात दोन तीन बॅगा भरून साडी खरेदी होतेच.
याशिवाय बहिणी सोबत महालक्ष्मी साठी साडी घ्यायला दुकानात गेल्यावर अग ही तुझ्या महालक्ष्मी साठी माझ्याकडून घेते आहे बर का म्हणून दोन साड्या पदरात पडून घेताना, चला या वर्षी ची महालक्ष्मी साठी साडी खरेदी झाली अस म्हणत त्या आधीच महालक्ष्मीसाठी म्हणून खरेदी केलेली ऑनलाइन साडी खरेदी चक्क विसरल्या जाते.
माझी मैत्रीण साड्यांचा व्यवसाय करते, छान कलेक्शन आहे तिच्या कडचे, पण आजकाल ना कुणी जास्त साडी घालत्त नाही म्हणून किमान आपण तरी तिच्या कडून विकत घेऊया तेवढीच तिला मदत असा उदात्त विचार मनात आणून देखील साडी खरेदी केली जाते.
त्याशिवाय प्रतिवर्षी नित्यानेमाणे आणि वृत्त पत्रांमधील जाहिरातींमधून ठळकपणे खुणावणारा साडी सेल तर समस्त स्त्री वर्गा मध्ये भारीच प्रिय. ५० टक्के ६० टक्के discount हमखास मिळतो, १००० ची साडी ६०० ला मिळते अशा विविध आमिषाला बळी पडत आम्ही बायका साडी सेल मधून साडी खरेदी करणे हा आमच्या समस्त स्त्री वर्गाचा अधिकारच आहे, असेच मानतो. मला कायमच वाटत आले आहे की प्रत्येक प्रकार ची एक तरी साडी कपाटात हवीच हवी. तर अशी ही परम प्रिय साडी खरेदी करून आल्यावर ती साडी उलगडून बघणे, वारंवार हाताळणे आणि आरशासमोर उभे राहून लावून बघणे, घरच्या लोकांना दाखवून त्यांच्या कडून दाद मिळविणे हा एक आनंददायी सोहोळाच असतो. असे मला कायमच वाटत आले आहे. तर अशी कधी कारणाने तर कधी कारणाशिवाय केलेली साडी खरेदी म्हणजे आ#नंदाची जणू पर्वणीच.
#सुरपाखरू #३०दिवसांत३० #प्रयोग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> #सुरपाखरू
हा सुरपाखरू काय प्रकार आहे, आ़णखी एकदोन ठिकाणी वाचलं इतक्यात.

लेख छान आहे!
एक छोटा बदल सुचवु का?
' साडी घालणे ' हे बदलुन 'साडी नेसणे' केले तर....