चिरलेला पालक - ३-४ वाट्या, कोथिंबीर पाउण ते एक वाटी, कांदा १ मध्यम , लसूण १२-१५ पाकळ्या, आले १ इन्च, हिरव्या मिरच्या ३-४, धणे १ टे.स्पून, हरभरा डाळ किंवा पंढरपुरी डाळे ४ चमचे, शेंगदाणे ४ चमचे, लाल मिरच्या २-३.
आमच्याकडे पालक सगळ्यांचा आवडता. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे पालक आठवड्यातून एकदा तरी होतोच. ही रेसिपी मला एकदा इन्स्टा रील्स मधे दिसली, आवडली आणि जशी लक्षात राहिली त्याप्रमाणे लगेच करून पाहिली. तेव्हापासून बर्याचदा केली जाते.
ही रेसिपी अगदी पाहुण्यांना काहीतरी खास म्हणून, पॉटलक ला किंवा वीकेन्ड ला काहीतरी स्पेशल हवे असेल तेव्हा करावी इतकी मस्त आणि तरीही झटपट होणारी आहे.
या भाजीला पालक आणि कोथिंबिरीची मिश्र चव येते ती फार मस्त लागते. अशीच पालक + मेथी किंवा नुस्ता पालक वापरून पण करता येईल.
मसाला - प्रथम अगदी थोड्या तेलावर हरभरा डाळ खमंग भाजून घ्या, ती नसल्यास डाळे घेतले तर ते किंचित परतून घ्या. ( डाळे वापरल्यास जास्त परतावे लागत नाही) , त्यानंतर धणे , लाल मिरच्या भाजून घ्या. शेंगदाणे भाजून साले काढून घ्या. हे सगळे मिक्सर मधून काढून पावडर करून घ्या.
या रेसिपी मधे लसूण बराच वापरलेला आहे, तो कमी करू नका. देअर इज नो सच थिंग अॅज टू मच गार्लिक.
त्यातल्या ५-६ पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आले याची एक पेस्ट करून घ्या. ही सेपरेट ठेवा किंवा वरच्या मसाला पावडरी मधेच हे जिन्नस मिक्स करून एकच पेस्ट तयार केली तरी चालेल. उरलेला लसूण ( ८-१० पाकळ्या) किंचित ठेचून वेगळा ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्या. त्यात हा ठेचलेला लसूण घालून तो जरा लाल होऊ देत. मग बारीक चिरलेला कांदा घालून परता. तो थोडा मऊ झाला की त्यात पालक आणि कोथिंबीर घालून थोडे परता. ते जरासे शिजले की हळद, आधी तयार केलेली पेस्ट आणि मसाला घालून नीट हलवा आणि एखादे मिनिट शिजू द्या. मग थोडेच गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करा. मीठ, गरज पडल्यास तिखट, हवी तर चिमूट भर साखर घाला. मी घालत नाही. भाजी तयार! ही नान सोबत किंवा भातासोबत पण छान लागते. भाजीतले तळलेल्या लसणाचे तुकडे जबरा लागतात!!
आमच्या कडे अशी लसूण चिरुन
आमच्या कडे अशी लसूण चिरुन तेलात तळून वरून घेतात काही काही भाज्यांमधे, तसा पण चांगला लागेल का?>>Ditto
रेसिपी मस्त आहे. आज उद्यातच या पद्धतीने करुन बघेन.
सुंदर पाककृती, मैत्रेयी
सुंदर पाककृती, मैत्रेयी
आज केली ही भाजी. डाळं घालून.
आज केली ही भाजी. डाळं घालून. फार सुंदर लागते आहे!

थोडा लिंबाचा रस घातला मी - त्याने ‘कम्प्लीट’ झाली चव माझ्यासाठी.
इथे वाचल्यापासून बरेच दिवस
इथे वाचल्यापासून बरेच दिवस करेन करेन म्हणून आज मुहूर्त लागला.

एक नंबर झाली. ह्यात पनीर किसून पण छान लागेल.
वा ! भारी फोटो!! धन्यवाद!
वा ! भारी फोटो!! धन्यवाद!
मस्त खमंग रेसिपी
मस्त खमंग रेसिपी
डाळ पालक आहे.
डाळ पालक आहे.
Pages