18+

Submitted by अनन्त्_यात्री on 1 February, 2025 - 06:15

कमान ओलांडून अठरावी
अधीर आलो अनङ्ग-देशी
इथल्या अणु-रेणूवर अविरत
प्रथम-रसाची(#) झाक जराशी

पर्वत इथले अवघड, दुस्तर
घळीत त्यांच्या नजर न ठरते
चेटूक त्यांचे नजरबंदीचे
स्वप्नातही ना पाठ सोडते

गुहा निसरड्या, फसव्या इथल्या
दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन
गारूड गूढाचे पण त्यांच्या
पंचप्राणा छळते निशिदिन

अनङ्ग-देशी एक उमजले
नाद खुळा पर्वत कुहरांचा
हात आपुला जगन्नाथ - जो
मुष्टित दे अनुभव तुष्टीचा Happy

=================

(#): नवरसांतील प्रथम रस = शृंगाररस

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर !
या विषयावरची इतकी  चपखल आणि छंदोबद्ध कविता मायबोलीवर वाचून गालातल्या गालात हसू फुटलं आणि "हल्ली हल्ली फुलू लागल्या, शेजारील सान्यांच्या पोरी" या   विंदा करंदीकरांच्या कवितेची आठवण झाली (फ्रॉईडला कळालेले संक्रमण). गदीमांही या दर्‍या टेकड्यांवर लिहिण्याच्या मोहातून सुटले नाही (जाळीमंदी पिकली करवंंद)
उद्या जर ही कविता   ईयत्ता दहावीला मराठीच्या  पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाली आणि शेवटच्या दोन  ओळी संदर्भासह स्पष्टीकरणास आल्या तर काय होईल? Happy

वाह..

पहीली २ फार कडवी आवडली. नंतर नंतर, फार एक्स्प्लिसिट होत गेली कविता. कल्पनेकरता काहीच सोडले नाही. त्यामुळे नॅह!!! विशेष नाही आवडली. हां प्रयोग म्हणुन ठिक आहे.

प्रथम-रसाची(#) झाक >>
आधी वाटले की "पहिल्या धारेच्या रसा"बद्दल कविता आहे की काय? मग तळटीप वाचल्यावर उलगडा झाला.
असो, कविता आवडली.