तुरीचे दाणे - (१ मोठी वाटी )
हिरव्या तिखट मिरच्या - ३-४
लसूण - १ लहान गठ्ठा सोलून
आले - १ इंच
कोथिंबीर - २५ ग्राम
कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला
टोमॅटो - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला
हिंग, हळद, धणेपूड, लाल तिखट, मटण मसाला, गरम मसाला - प्रत्येकी १ लहान चमचा
मीठ - चवीनुसार
फोडणीसाठी तेल
एका लोखंडी कढईत ४ थेंब तेल घालून त्यावर जिरे, हिरव्या मिरच्या, आले व लसणाच्या कळ्या भाजून घ्याव्या. हे करताना त्यावर किंचित (चिमूटभर) मीठ भुरभुरावे. असे केल्याने कोणताही जिन्नस खमंग भाजला जातो. लसूण लाल झाला कि त्यातच तुरीचे सोललेले दाणे घालून दाण्यावर डाग दिसेपर्यंत परतावे.
जरा थंड झाल्यावर त्यात बचकभर कोथिंबीर घालून मिक्सरला जाडसर भरड वाटून घ्यावे. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे व ओलसर पेस्ट करून घ्यावी.
आता त्याच कढईत नेहमीच्या भाजीला वापरता त्यापेक्षा चमचाभर अधिक तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करून घ्यावी. यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा लाल होईपर्यंत परतावा पण जळू देऊ नये. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, मीठ व मटण मसाला घालून माध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतावे. टोमॅटोच्या फोडी दिशेनाश्या होऊन सारे मसाले एकजीव झाले कि यात तुरीच्या दाण्यांची पेस्ट घालून मध्यम आचेवरच २ मिनिटे परतावे. हे मिश्रण नीट शिजले कि कढईपासून सुटून येते (परतताना अजिबात भांड्याला चिकटत नाही).
या स्टेजला कडकडीत गरम पाणी घालून उकळी आणावी. आपल्याला रस्सा जितक्या प्रमाणात दाट/पातळ हवा असेल त्यानुसार पाण्याचे प्रमाण असावे.
२ मिनिटे मध्यम आचेवर उकळी आली कि झाकण ठेऊन १ मिनिट कमी आचेवर शिजवावे (व गॅस बंद करावा ) .
वऱ्हाडी पद्धतीची तुरीची आमटी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत ओरपून / काला मोडून किंवा गरम गरम वाफेवरल्या भातासोबत खावी.
१. तुरीच्या शेंगा निवडताना दाणे पूर्ण भरलेल्या व जरा जून झालेल्या निवडून घ्याव्या.
२. ताजे दाणे/ शेंगा नाही मिळाल्या तर तुरीचे कडधान्य ५-६ तास भिजवून नंतर प्रेशर कूक करून घ्यावे.
३. झाकण न ठेवता आधी मध्यम आचेवर उकळी आणायची आणि मग झाकण ठेऊन १ मिनिट मंद आचेवर शिजवावे. या पद्धतीने कोणतीही आमटी शिजवल्यास भाजीवर / आमटीवर झणझणीतपणा दाखवणारी व वऱ्हाडी जेवणाचा USP असणारी तर्री येते.
हे बेस्ट केले.
हे बेस्ट केले.
लेखात मुख्य चित्र upload
लेखात मुख्य चित्र upload केल्यावर दिसत नाही आहे
छान रेसिपी
छान रेसिपी
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
आमच्याकडे वाळलेल्या तुरीची आमटी करायची आई त्याची आठवण आली. तुरीचे दाणे आधी थोडे भाजून शिजवून ह्यायचे आणि आमटीत ते पूर्णच असायचे.
एक करेक्शन: तुरीचे दाणे एकदम
एक करेक्शन: तुरीचे दाणे एकदम बारीक न वाटता किंचित भरडसर वाटावेत...
लेखात मुख्य चित्र upload
मस्त ! 👍
अहाहा, भारी रेसिपी. लगेच करून
अहाहा, भारी रेसिपी. लगेच करून खावी वाटतेय.
मस्त झणझणीत रेसीपी आहे.
मस्त झणझणीत रेसीपी आहे. भाकरीबरोबर मज्जा येईल.
व्वा वा!
व्वा वा!
तुरीच्या कचोऱ्याही करतात विदर्भात, असे ऐकले आहे
मस्त! तिथला झणझणीतपणा इथे आला
मस्त! तिथला झणझणीतपणा इथे आला..
Thanks..
Thanks..
एक करेक्शन: तुरीचे दाणे एकदम बारीक न वाटता किंचित भरडसर वाटावेत...
Submitted by छल्ला.>>>>
हो.. बरोबर
हा पदार्थ फारच मस्त वाटतोय.
हा पदार्थ फारच मस्त वाटतोय. सध्या फ्रोजन लिलवा आहेच घरी. करून पाहण्यात येईल.
मस्तच!
मस्तच!
भाकरी बरोबर मस्त लागेल.
बघतो फ्रोजन लिलव बीन्स मिळाल्यातर. त्या नाही तर ओल्या हिरव्या हरभर्याने रिप्लेस करु का? ते होते परवा इंग्रोत.
त्या नाही तर ओल्या हिरव्या
त्या नाही तर ओल्या हिरव्या हरभर्याने रिप्लेस करु का?>>>
चालतंय की
मस्तच आहे पाककृती. मी थोडी
मस्तच आहे पाककृती. मी थोडी वेगळी व ओले खोबरे घालून करायचे व टोमॅटो चालायचे नाही. अशी करून बघेन.
तुरीच्या कचोऱ्याही करतात
तुरीच्या कचोऱ्याही करतात विदर्भात, असे ऐकले आहे
@बेफिकीर.. विदर्भात तुरीचे बरेच पदार्थ करतात. आमटी सगळयात कॉमन. त्यानंतर तुरीचे दाणे घातलेला सोलेभात, तुरीचे पराठे, कचोऱ्या. पुरण ...
+ हिरव्या तूरदाण्यांचे वडे/
.
झणझणीत रेसिपी तोंपासू झाले.
झणझणीत रेसिपी तोंपासू झाले.
गावी अनेकदा खाल्ली आहे. इथे तुर दाणे मिळत नाहीत, मलाही हिरव्या हरभर्यांवर समाधान मानावे लागेल.
मला ह्या रेसिपीत टोमॅटो सरप्रईज फॅक्टर वाटला..गावी नाही घालत बहुधा. मस्त लागेल घालून.
तुरीचे दाणे आधी थोडे भाजून शिजवून ह्यायचे आणि आमटीत ते पूर्णच असायचे.>>> करेक्ट मी अशीच खाल्लेय.
एकदम भारी!
एकदम भारी!
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी.
आम्ही दाणे नुसते भाजून जाडेभरडे वाटून करतो.
पण आता ह्या पद्धतीने करून पाहणार.
तुरीचे दाणे घातलेला सोलेभात.... हा पण मस्त लागतो...
मस्त .तुरीच्या शेंगा दिसतायत
मस्त .तुरीच्या शेंगा दिसतायत भाजीवालीकडे, कधी आणल्या नाहीत आता आणेन .
सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल
सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल खूप आभार. चुकून बारीक वाटून घ्यावे असे लिहिले होते. ते जाडसर हवे. आता योग्य तो बदल केला आहे.
तुरीचे दाणे घातलेला सोलेभात..
तुरीचे दाणे घातलेला सोलेभात.... हा पण मस्त लागतो.>>> अरे काय काय काढताय पोतडीतून बाहेर?
मस्त आहे रेसिपी
मस्त आहे रेसिपी
झणझणीत रेसिपी.
झणझणीत रेसिपी.
काल केली होती तुमच्या
काल केली होती आमटी तुमच्या रेसिपीने छान झाली होती झणझणीत एकदम विदर्भ स्पेशल
मी भरडण्या बरोबर काही दाणे अख्खे ठेवले होते आणि यात फक्त एक बटाटा घातला होता आमच्याकडे कुठलेही दाणे असुदे बटाटा पाहिजे पण माझ्यामते बटाटा घालूच नये फक्त दाण्याची चव जास्त मस्त लागते.
धन्यवाद रेसिपी लिहील्याबद्दल
धन्यवाद रेसिपी लिहील्याबद्दल :).. कृती डिटेल लिहील्यावरही २-४ शंका विचारयची मायबोली परंपरा चालू ठेवण्यासाठी शंका
मटण मसाला कोणत्या ब्रँड्चा वापरावा?,शाकाहारी असल्यानी कधी हा मसाला आणला गेला नाही
धन्यवाद सिमरन आणि @ वृषाली,
धन्यवाद सिमरन आणि @ वृषाली, आमच्या कडे वाघमारे मटण मसाला वापरतात. सवाई ब्रँडचा सावजी मटण मसाला पण छान असतो.
Pages