आवडलेल्या गोष्टी
सुरुवातीला श्रेय नामावलीमध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नटना वाहिलेली आदरांजली.
मूळ नाटकाचं चित्रपटात रूपांतर किंवा असा एखादा संगीत पट करायची कल्पना आणि त्यासाठी केलेला प्रयत्न / साहस .
जे काही थोडेफार संवाद मिळालेत ते नीना कुलकर्णींनी उत्तम केलेत.
आता खटकलेल्या गोष्टी
कास्टिंग
सुबोध भावे - वैदेही परशुरामी, वैदेही परशुरामी - सुमित राघवन दोन्ही जोड्या अत्यंत विजोड दिसतात. मनापासून वाटलं की एका ठराविक वयानंतर आपल्या वयाच्या निम्म्या वयाईतक्या वयाच्या नायकाच्या/ खलनायकाच्या भूमिका करण्याचा मोह आवरा आता!
शैलेश दातार एका साम्राज्याचा / छोट्या राज्याचा सेनापती ( थोडातरी करारीपणा असू दे की हो) म्हणून अजिबात शोभत नाही… फार तर एखादा म्हातारा प्रेमळ राजा/ मंत्री म्हणून शोभला असता.
नेपथ्य/ सेट्स
त्यात काहीही सातत्य नाहीये. कधी बाहुबली तर कधी रामानंद सागर तर कधी आशुतोष गोवरीकर यांच्या चित्रपट / सिरीयलच्या सेट्स ची आठवण येत राहते, अर्थात त्यांच्या तुलनेत हे सेट्स अगदीच तोकडे वाटतात.
महालाच्या/ वाड्याच्या भिंती रस्टिक पण इतर सजावट फॅन्सी अशी भेळ बऱ्याच फ्रेम्स मध्ये जाणवते. फुलं, वेली, झाडं, सजावट अगदीच प्लॅस्टिकची, बागेचा सेट गूगल वरून डाउनलोड केलेल्या चित्रासारखा दिसतो, भामिनीची paintings (चीप)
कॅलेंडर वरील चित्रसारखी दिसणारी अशा अनेक गोष्टी खटकल्या.
सुमित राघवन खर तर आवडता कलाकार आहे. पण ह्या चित्रपटात तो पहिल्यापासून शेवटपर्यंत नकली किंवा उपराच वाटतो. सुबोध भावेने काही फाईट सीन्स मध्ये प्रभास (बाहुबली) ची नक्कल (?) करण्याचा व्यर्थ प्रयत्न केल्यासारखे जाणवले. कुणाच्याहि अभिनयात जिवंतपणा नाही जाणवला तसच डायलॉग डिलिव्हरी पण यथा तथाच …
गाणी चांगली म्हणावीत तर ते दृश्य बघताना त्या पात्रांच्या तोंडी ती नीट जातही नव्हती, विशेषकरून शेवटचे गाणे, ‘ शुरा मी वंदिले…’. तसच पहिलं गाणं, धैर्यधर ची ओळख करून देतं, नीना कुलकर्णी आणि सुबोध भावे म्हणत असतात ते अत्यंत पुस्तकी मराठी भाषेत आहे, त्यांचे नंतरचे संवाद गावाकडच्या मराठी भाषेत आणि ढंगा मध्ये आहेत पण ते म्हणतानाही मध्येच सुबोध भावे ते गावरान बेअरिंग विसरून जातो .. (?) आणि नेहेमीच्या सिरियालमध्ये बोलावं तस बोलतो…
काहीच दिवसांपूर्वी ऐतिहासिक कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ बघितला होता त्याची न राहवून आठवण आली. तो जितका संयत (composed) , नीट विचार करून केलेला (thoughtful) आणि consistently एका ठराविक काळातला वाटतं होतं तितकाच हा त्याच्या विरुध्द वाटला.
हा अभिप्राय लिहिण्यामागे कारण म्हणजे एका लेव्हलला असा वाटलं की काय वाटेल ते बनवून प्रेक्षकांच्या गळ्यात मारतात आणि वारेमाप प्रमोशन करून काहीतरी अगळ वेगळं आणि उत्कृष्ट देत असल्याचा आभास तयार करतात.
#marathimovie #SangeetManapmaan
सुबोध भावेने कारकिर्दीचा आरंभ
सुबोध भावेने कारकिर्दीचा आरंभ होण्याआधी निवृत्ती घेतली असती तर खूप लोकाश्रय मिळाला असता
अगदी तपशीलवार व छान लिहिले आहेत
कारकिर्दीचा आरंभ होण्याआधी
कारकिर्दीचा आरंभ होण्याआधी निवृत्ती >>
बेफी
कधी बाहुबली तर कधी रामानंद सागर तर कधी आशुतोष गोवरीकर यांच्या चित्रपट / सिरीयलच्या सेट्स ची आठवण येत राहते, अर्थात त्यांच्या तुलनेत हे सेट्स अगदीच तोकडे वाटतात. >>> पाचशे सहाशे करोड खर्चून टाकायचे होते. धंदा १० कोटी का होईना. मराठीसाठी कायपण.
सिनेमा नाही बघितला अजूतरी.
सिनेमा नाही बघितला अजूतरी. नोव्हेंबरमध्ये 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' हे नाटक बघितलं होतं हृषीकेश जोशींचं. ते आवडलेलं. त्यातली गाणी जबरदस्त होती.
संप्रति१ नाटक नक्कीच चांगलं
संप्रति१ नाटक नक्कीच चांगलं असेल ...
पाच सहाशे कोटी टाकू नका पण जे करताय त्यामागे काहीतरी विचार आहे , clarity आहे ते तरी पोहोचू दे प्रेक्षकांपर्यंत तेव्हढी तरी किमान अपेक्षा .
अगदी तपशीलवार व छान लिहिले आहेत>>> thanks बेफिकीर
पण पॉझिटिव्ह काहीच नाही? असं
पहील्या ३ गोष्टी तू लिहील्याच आहेत. पण त्या वगळता,पॉझिटिव्ह काहीच नाही? असं कसं होइल? कधीकधी वाटतं माबोवर फार वाक्ताडन करतो आपण. कलाकारांनी मेहनत घेउन कलाकृती निर्माण केलेली असते. ते वाचतच असणार की.
फुलवंती मधे प्राजक्ताची
फुलवंती मधे प्राजक्ताची डायलॉग डिलिव्हरी खराबच होती. मधेच प्रमाण भाषा, मधेच ग्रामीण बोली भाषेतील शब्दोच्चार.
अर्थात फुलवंती हा काही निकोप
अर्थात फुलवंती हा काही निकोप सिनेमा नव्हताच , पण त्यांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या हाताळल्या होत्या किमान मानापमान वाचून तरी तो बराच बरा वाटला.
सामो, मी मायबोली वर टाकण्यासाठी म्हणून फक्त हे लिहिलं नाही.. इकडे पण टाकलं एवढंच..
बऱ्याचदा कलाकृती विषयीची मते सापेक्ष असतात. जे मला नाही आवडले ते तुला आवडू शकते.
मेहनत आपण सगळेच करतो पण म्हणून पगारवाढ, प्रमोशन देताना किंवा नोकरी देताना मूल्यमापन केलं जायचं ना.
हे काही शाळेच्या / सोसायटीच्या/ हौशी मंडळींनी केलेलं नाही, की मेहनत केली म्हणून कौतुक करा.... ती मेहनत पडद्यावर दिसली पाहिजे.
उलट दिसला तो फक्त ढिसाळपणा ..
लोक त्यांचे पैसे,वेळ देऊन जातात, तेव्हा त्यांच्या बेसिक अपेक्षा तर असणारच..
ओके. बरोबर आहे.
ओके. बरोबर आहे.
हा चित्रपट चांगला जमला असता
हा चित्रपट चांगला जमला असता तरी मी कदाचित पाहिला नसता कारण हा जॉनर आवडीचा नाही. पण ज्यांच्या आवडीचा आहे त्यांच्याकडून असेच निराशेचे सूर उमटत आहेत. आवडीच्या गोष्टीची माती केली की त्रास जास्त होतो. त्यामुळे नकारात्मक प्रतिसाद जास्त येणे स्वाभाविक आहे. नव्या पिढीला संगीत मानापमान हे असे असते म्हणून चुकीचे चित्र दिसणे हे त्याहून वाईट.