चांदके पार

Submitted by बिपिनसांगळे on 30 December, 2024 - 13:47

पूर्वसूचना

कथा १८+ आहे .
बोल्ड कन्टेन्ट
याची दखल घ्यावी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांदके पार

--------------

मुलाकडच्या लोकांचा होकार येईल की नाही ? ...
निकिताच्या आईबाबांना काळजी लागून राहिली होती . एकुलती एक पोर . तिचं लग्न जमवायचं चाललं होतं . स्थळं येऊन जात होती ; पण जमत काही नव्हतं. कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाची काय अपेक्षा , एक ना दोन अनेक गोष्टी . तशात एक स्थळ येऊन गेलं. मुलगा चांगला होता. नोकरी भारी नाही पण चांगली होती . मुख्य म्हणजे मुलगा देखणा होता . त्यांना तिच्यासाठी असाच मुलगा पाहिजे होता. तिला शोभणारा . म्हणून त्या मुलाने हो म्हणावं असं त्यांना वाटत होतं . निकी सावळी होती ; पण ठसठशीत फीचर्सची ,आकर्षक चेहऱ्याची अन भरलेल्या बांध्याची .
तिच्या आईवडलांची काळजी कुठल्याही सर्वसामान्य पालकांप्रमाणेच होती .
तर निकीची काळजी वेगळीच होती.
-----
निकी शिक्षणासाठी बाहेरगावी राहिली होती . होस्टेलवर. तिथे सुरुवातीच्या दिवसांत तिची एक मुलीशी मैत्री झाली . रिवा नावाची ती पोरगी आग्र्याच्या बाजूची होती . दिसायला अफाट अन वागायला बेफाट ! पण वागायला चांगली होती . तिच्या गावाकडच्या बऱ्याच मुली त्या कॉलेजमध्ये होत्या . तिला सिनियर. तिचा मोठा ग्रूप होता .
तिची आणि निकीची चांगलीच मैत्री जमली होती . रिवा नेहमीच नवनवीन कपडे घालायची . तिचा फॅशनसेन्स छान होता. पैसेवाल्या घरातली पोरगी. तिला काय कमी ? ... निकीला वाटायचं. पुढे असं झालं की तिच्याकडे नेहमीच नवीन वस्तू , कपडे , कॉस्मेटिक्स , परफ्यूम्स असं दिसायला लागलं .
तशी रिवा खरोखरी पैसेवाल्या घरातली पोरगी होती. पण एकदा बोलताना ती निकीला म्हणाली , ' माझा बाप लय कंजूष आहे! '
तेव्हा मात्र निकीला प्रश्न पडला - जर हिचे वडील कंजूष आहेत, तर मग हिच्याकडे पैसा येतो कुठून ? तेही मुबलक ?
एके दिवशी निकीने रिवाकडे भारी, इंपोर्टेड घड्याळ पाहिलं, तेव्हा तिने तिचं डोकंच खाल्लं . तेव्हा ती म्हणाली ,’ यार ! काहेको दिमाग खाती है ? दिलंय मला एकाने . काल रात्री मी त्याला खूष केलंय . तुला कमवायचा आहे का पैसा ? '...
रिवा ऑकेजनल कॉलगर्ल बनून पैसे कमवत होती . गोरीपान , गुबगुबीत रिवा त्या वर्तुळात चांगलीच फेमस होती .
बापरे ! निकीला तर धक्काच बसला .
पुढे - शिक्षण संपलं . रिवा तिच्या घरी गेली . बापाने लगेच तिचा ब्याह उरकून टाकला .
त्यानंतर काही दिवसांनी त्या दोघींचा फोन झाला . खूप गप्पा झाल्या. होस्टेलच्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. त्या गोष्टींवरही चर्चा झाली . आणि सरतेशेवटी ती चर्चा सेक्सवर आली . निकीने स्त्रीसुलभ कुतूहलाने त्याबद्दल विचारलं .
तेव्हा रिवा म्हणाली , ' छे ! बोअर प्रकार ! ‘
‘ बोअर ? अन ते का बाई ? ‘
‘काय तू पण ? इतक्या वेळा अनुभव घेतल्यानंतर खरंच मी पोरगी राहिले नाही . मी बाईच झाले . आता त्याच्यात काय मजा ? त्याच्यात काय नाविन्यच नाय ! अन एक सांगू, मिक्स फिलिंग आहे गं. कुठेतरी अपराधीपणाची जाणीव होते त्यामुळे हबी जवळ आला की इच्छाच होत नाही . जाम लोचा झालाय माझा . पश्चाताप होतोय आता . काय करावं कळत नाही .’ थोडं थांबून ती पुढे म्हणाली,’ आय होप- तुझं असं होऊ नये .’
जास्तीचे खर्च भागवण्यासाठी, निकीनेही त्याचा अनुभव पुढे घेतलाच होता .
-----
मुलाचा होकार आला . निकीचे आईवडील दोघेही खूप खूष झाले.
शंतनूही सावळाच, पण उंच आणि मर्दानी चेहऱ्याचा तरुण होता . एखाद्या मॉडेलसारख्या लूकचा .
पण निकीला तर टेन्शनच आलं ... अनेक गोष्टींचं ...
लग्नाआधी सेक्स, त्याचे विविध अनुभव, त्याचे पडसाद पुन्हा पुढच्या आयुष्यात उगवले तर ? ... ते नवऱ्याला सांगायचं की नाही आणि मुख्य म्हणजे रिवासारखं झालं तर ? …
लग्न पार पडलं . सगळे विधी पार पडले आणि पहिली रात्र उगवलीदेखील.
सुहाग रात - पब्लिकला तिची पहिली ओळख किंवा माहिती साधारणपणे चित्रपटांमधून होते. चित्रपटातून दाखवली जाणारी पहिली रात्र !... नवीन जोडप्याचा डबलबेड जसा सजवून दाखवतात तितकाच तो इव्हेंटही सजवून दाखवला जातो . पार वरपासून खालपर्यंत फुलांच्या माळाबिळा सोडून , बदामाचा शिरा अन मसाला दूध. घुंगट घेतलेली, खाली मान घातलेली, लाजून बसलेली, पतिदेवाची वाट पाहणारी दुल्हन.
खऱ्या आयुष्यात असं काहीच नसतं ! …
समर प्रसंगच असतो खरं तर , दोघांसाठीही . पण जास्त धास्तावलेला पक्ष अर्थात स्त्रियांचा असतो . इथेही तीच परिस्थिती होती; पण धास्ती वेगळीच होती…
आणि जे व्हायचं तेच झालं. निकीने शंतनुला जवळ येऊच दिलं नाही.
असं त्या रात्री झालं, त्याच्या पुढच्या रात्री झालं आणि रोज रात्री असंच होऊ लागलं . एकामागून एक रात्री सुन्या जाऊ लागल्या .शंतनूने सोडून दिलं. पण किती दिवस ? त्यालाही मन होतं, त्यालाही शरीर होतं , त्यालाही भावना होती , त्यालाही इच्छा होती. त्याची.चिडचिड होऊ लागली. होणारच ना. तरणाबांड गडी तो . पण त्याला काय करावं ते कळेना . काय कारण असावं तेच कळेना.
ती त्याच्या जवळ येत नसे . त्याने मिठीत घेतलं तरी पुढे काही करू देत नसे . बिचाऱ्याने साधे ओठ जरी पुढे केले तरी ती तोंड फिरवत असे . साला वैशाखवणवा काही संपेचना . आषाढाचा पाऊस सोडा , वळवाची साधी सरही पडेना .
आपण चुकीच्या मुलीशी लग्न केलंय असं त्याला वाटू लागलं . पण ही चूक सुधारायची कशी ? बोलायचं कोणाशी ? अजून तरी तो घरातल्यांना काही बोलला नव्हता .
त्याची आई तर सुनेवर खूष होती .
निकीचीही जाम घुसमट होऊ लागली. शंतनू वागायला चांगला होता . तीही त्या नवीन घरामध्ये ऍडजस्ट झाली होती खरी ; पण रात्र ? ती तिला नकोशी वाटू लागली होती . नवीन लग्न झालेली जोडपी रात्र उगवण्याची वाट पाहत असतात . इथे मात्र तिला रात्रच होऊ नये असं वाटू लागलं होतं. रात्रीची शीतलताही तिला दाहक वाटू लागली होती.
एकदा त्याला वाटलं की तिच्यावर सरळ जबरदस्तीच करावी ; पण त्याचा तो स्वभाव नव्हता .
पण अशा अनेक रात्री कोरड्या गेल्यावर , त्याला लग्न मोडावं असं वाटू लागलं . ते त्याच्या डोक्यातच घोळू लागलं . नाहीतरी कोर्टाने असा एक विशेष निकाल अलीकडेच दिला होता , शारीरिक संबंध झाले नसतील तर असा विवाह पूर्ण होत नाही म्हणून .
-----
एके रात्री दोघेही बेडवर पडले होते.
तिच्या डोक्यात एकेक जुने अनुभव येऊ लागले. तिला एकेक जुने पुरुष आठवू लागले. राकट पुरुष, घामट पुरुष, जनावरांसारखे ओरबाडणारे पुरुष अन धसमुसळे पुरुष …
धसमुसळा याचा अर्थच मुळी मुसळासारखा धसणारा . त्या क्रियेतील बळाचा वापर सांगणारा थेट अश्लील शब्द ; पण अर्थ माहित नसल्याने सहजपणे घरीदारी बंड मुलांसाठी वापरला जाणारा. अर्थात , तिला या शब्दाचा अर्थ माहित नसला तरी, असे पुरुष भरपूर प्रमाणात तिने सहन केलेले होते .
एकदा तिने नवीन इनर घातली होती . त्या दिवशी जे गिऱ्हाईक आलं होतं - रासवट , त्या xxx एवढी घाई झाली होती की त्याने ती इनर जोरात ओढून काढली. जसं काही उशीर झाला तर ती पळूनच जाणार आहे. इतक्या जोरात ओढल्याने ती इलॅस्टिकपासून फाटून त्याच्या हातात आली होती. त्यावर ती ओरडली, तर त्याने तिला एक जोरदार थप्पड लगावली .
‘गप पड ! पैशे मोजलेत ! चड्डीचेबी पैशे देईन. तेपण एक नाही तर चारचार .’
चार इनरचे पैसे त्याने खरोखरी मोजले , एक्सट्रा ; पण मग त्याने थोड्या वेळात तिचा दोन वेळा कस्सून उपभोग घेतला होता .
आणि त्यावेळी ती खरंच गप पडून राहिली होती . जणू त्या बेडवर ती नव्हतीच. तोच काय तो एकटा होता. त्याचा त्याचा स्वतःच निचरा करून घेणारं एक जंगली श्वापद.
बहुतेक पुरुष त्याच प्रकारात मोडणारे.
एक अपवाद होता .नंदन त्याचं नाव. तरुण होता. बायकोची पहिली डिलिव्हरी झाल्याने ती माहेरी गेली होती. आणि मग हा बाहेर त्याची हौस भागवत होता .
तो आला की तिला छान वाटायचं. तो तरुण होता .सुंदर होता .मुख्य म्हणजे तो फक्त सेक्ससाठी वखवखलेला नसायचा , तर त्याच्या त्या सगळ्या कृतीमध्ये तिला नेहमीच एक प्रेमळपणा जाणवायचा . तो हरप्रकारे तिच्याशी क्रीडा करायचा ; पण कुठेही काही गडबड, घाई किंवा जबरदस्ती न करता. तिला तर ते खूप आवडायचं. तिला तेव्हा खरी मजा यायची. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटायचा . आणि वर पैसे - ते वेगळेच. जणू एका दगडात दोन पक्षी.
त्याचं बोलणं शांत होतं . त्याचं वागणं अदबशीर होतं . त्याला त्याच्या मर्यादा माहिती होत्या . इतर गिऱ्हाईकं जशी तिच्यापुढे नाना प्रकारच्या बढाया मारायची, पैशाच्या किंवा सत्तेच्या- वर्चस्वाच्या बाता मारायची, तसं तो कधीच करत नसे. किंवा त्याचं तिच्यावर प्रेम आहे, असंही तो कधी सांगत नसे .
पण पुढे त्याची बायको आली असावी . तो यायचा बंद झाला. नको तेच लोक काय ते येऊ लागले.
त्यांच्याच वर्तुळात एक मुलगी होती . एके दिवशी एका मवाल्याने तिच्यावर जबरदस्ती केली . त्याचं असं म्हणणं होतं की पैसे एकाचेच देईन ; पण तू माझ्या मित्रालाही सोबत करावीस. त्यांची बोलाचाली झाली. त्या भांडणात त्या टपोरी गावगुंडाने तिचा जीवच घेतला.
त्या वाईटात एक चांगली गोष्ट अशी घडली की या सगळ्यात मुलींनी कॉल घेणंच बंद केलं . पुढे शिक्षणही संपलं. ते दिवस मागे पडले
त्या क्षणाला तिला नंदनची खूप आठवण आली …
तर शेजारी पडलेल्या शंतनूला सेक्सची !... त्याला ते हवं होतं. कुठल्याही परिस्थितीत हवंच होतं. त्यात निकी तर त्याची स्वतःचीच होती ना. त्याला ती खूप आवडू लागली होती . त्याचं तिच्यावरचं प्रेम हळूहळू वाढतही होतं, कुठल्याही ऍरेंज- मॅरेजमध्ये होतं ,तसंच . फक्त ती एक गोष्ट सोडता. एका क्षणात त्याला राग यायचा तर दुसऱ्या क्षणाला त्याचं प्रेम उतू जायचं . गंमतच सारी , पण विचित्र .
त्याला आज असं वाटलं की तिच्यावर सरळ जबरदस्तीच करावी . त्याचं डोकं फिरलं होतं . त्याचं शरीर बंड करत होतं . ते आतून बेभान उसळ्या मारत होतं . पण त्याचा तो स्वभाव नव्हता .
तो विचार करत होता - आज शेवटची संधी . नाही तर XXX गेलं . तुटलं !
एकदा अजमावून तर बघू आधी , त्याला पुन्हा वाटलं .
'आज शेवग्याचं वरण का केलं होतं ? ' त्याने तिला इशारा देण्यासाठी विचारलं .
' का म्हणजे ? त्याला काही कारण असतं का ? ‘तिला काही कळेचना .
' आम्हाला प्रॉब्लेम होतो . '
' प्रॉब्लेम ? काय प्रॉब्लेम ? '
' जाऊ दे ! तुला नाय कळणार . ' असं म्हणत त्याने कूस बदलली . त्या भाजीने इच्छा वाढते , असा समज आहे ; पण तो हे काही बोलला नाही .
तो असा वळला, नाराज झाला म्हणून ती पाघळली. म्हणून ती त्याच्या जवळ आली . तसं त्याने तिला हळुवारपणे जवळ घेतलं. तिच्या गालावर त्याचे ऊष्ण ओठ टेकले. तिचं शरीर तो स्वतःच्या शरीराला जाणवू देत राहिला . तिलाही आज त्याची ती मिठी हवीहवीशी वाटत होती आणि ती तशीच त्याच्या मिठीत पडून राहिली .
तो म्हणाला ,’ आमची राणी कधी प्रसन्न होणार ? ‘
आणि ती रडू लागली . तो तिला थोपटू लागला. त्याने तिला रडू दिलं .
थोड्या वेळाने ती रडायची थांबली.
बेडरूमचे पडदे वाऱ्याच्या झुळकेने हलत होते .
तेव्हा त्याने विचारलं , ‘ काय प्रॉब्लेम आहे ? ‘
‘ मला ते नाही जमणार . नाहीच जमणार असंच वाटतंय. त्यामुळे टेन्शन येतंय .’
‘पण का ? असं का वाटतंय? सुरुवातच होत नाहीये आपली , तर पुढचं कळणार कसं ? एकदा सुरुवात झाल्यावर तुला कळेल ना की मी एक प्रेमळ प्रियकर आहे म्हणून. पाण्यात पडल्याशिवाय पोहणार कसं ? एकदा माझी होऊन तर बघ - या जगातल्या तुझ्या सगळ्या चिंता क्षणात मिटवून टाकीन मी . फक्त एकदा त्या दुसऱ्या जगात प्रवेश करायचा अवकाश... मग ? चांदके पार ! ’…
त्याची ती तयारी, तो आत्मविश्वास पाहून ती त्याच्याकडे पहातच राहिली.
त्याने तिला आणखी जवळ घेतलं . त्याची ती मिठी आता आणखी आश्वासक होती. त्याच्या त्या आश्वासकपणाने तीसुद्धा त्याच्या जवळ आली . दोघांचे श्वास फुलले . ऊष्ण ऊष्ण झाले . एकमेकात मिसळले . तिने त्याचे ओठ स्वतःच्या ओठात घेतले. त्याच्या सॅंडो बनियनमुळे त्याच्या घामाचा जास्त चाळवणारा वास येत होता . दोघांची शरीरं तप्त झाली . त्यात ऑक्टोबर हीट . पण त्यांना आता त्याचं मुळीच भान नव्हतं .
नंतर निसर्ग पुढे आला . दोघांना एकमेकांच्या शरीराची ओळख पटली . दोघांची वस्त्रं बाजूला पडली आणि दोघेही पुढच्या आनंदी क्रीडेमध्ये रमून गेले. त्याच्या शरीराचा राकट आणि तिच्या शरीराचा मुलायम स्पर्श एक झाले .
निकीला वाटलं - आज खरा आनंदाचा दिवस आहे. दिवस म्हणण्यापेक्षा रात्र . उगाच मनाच्या एका कोपऱ्यात असंही वाटून गेलं की शंतनू भारी आहे , नंदनपेक्षा भारी.
तिच्या मनावरचं ते नकोसंसं ओझं उतरलं . ती तरारली . ती फुलारली . ती सुखावली .
आता ती त्याला पूर्ण समर्पित झाली .
तिच्या मनामध्ये आता चंद्र उगवला होता. मोठा ,पौर्णिमेसारखा . त्याचा प्रकाश तिच्या अंगभर पसरला . काही वेळानी वादळ . काही क्षणांनी ते चंद्रवादळ शांतवलं . तो चंद्र हळूहळू मालवत गेला .. अन ते दोघे ?... चांदके पार ...
स्त्रियांना बेडवर कसं खूष करायचं. यामध्ये शंतनू एक्सपर्ट होता. म्हणून तर एवढे दिवस तो थांबू शकला होता. त्याने तिच्या कलाने घेतलं होतं . आज त्याने त्याचं कौशल्य जणू पणाला लावलं होतं . स्वतःला पाहिजे आहे ते स्त्रीकडून कसं काढून घ्यायचं आणि स्त्रियांना काय हवंय ते कसं द्यायचं हे त्याला चांगलंच माहिती होतं . त्याला जवळ येणाऱ्या स्त्रियाच काय त्या माहिती होत्या . काहीतर पेटलेल्या असायच्या ; पण त्याच्यासाठी लांब पळणारी ही पहिलीच होती . त्याच्या आयुष्यात आलेला आजचा क्षण , दुर्दैवाने खूपच उशिराने उगवला होता .
कॉलेजमध्ये असताना त्यालाही छानछोकीने जगायची सवय लागली होती .त्याच्यासाठी लागणारे पैसे कमवण्यासाठी तोही चुकीच्या मार्गाला लागला होता .
त्यानेही काही दिवस जिगोलो म्हणून काम केलं होतं.
---------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान फुलवलीय कथा. फेसबुकवर वाचलीय आधी, तुम्हीच पोस्ट केली असावी.

कॉलेजात, इतरत्र असे राजरोस घडायला लागले तर ओळखणारेही निघतीलच की.. ह्या टेन्शनमध्ये कायम जगत राहणार का ही मंडळी??

ओह! शेवट जरा अनपेक्षित निघाला.
आधी वाटलं तो कॉलेजात असताना तिच्या मैत्रिणीकडे जाणारा असणार.

कॉलेजमध्ये राजरोस दारू, ड्रग्ज वगैरे चालतं असं ऐकलंय,
हे सुद्धा सर्रास होत असेल का? असा प्रश्न पडला.

वावे
साधना
ललिता प्रीती

आभारी आहे .

विशेषतः स्त्रियांच्या प्रतिक्रिया आहेत , अन संयत आहेत , म्हणजे प्रॉब्लेम नसावा .
पण एकूण प्रतिक्रिया नाहीत किंवा पुरुष वाचकांच्या प्रतिक्रिया नाहीत , म्हणजे कथा त्याज्य आहे कि काय ?
पता नहीं .

साधना

ही आणि इतरही अनेक प्रक्ररण चालू असतात , तुमचा प्रश्न योग्य आहे . कशी जगतात माहीत नाही

मी फेसबुक वापरत नाही . मी तिथे कथा पोस्ट केली नाही . म्हणजे दुसरया कोणीतरी केली असणार . निदान माझं नाव ठेवलं असेल तर ठीक आहे . आपण
अधिक सांगू शकाल का ? माझ्यासाठी हे आश्चर्यजनक आहे .

ललिता प्रीती

सर्रास होतंच हे . फक्त सरसकट होत नाही असं आपण नक्की म्हणू शकतो .

एका वयस्कर माणसाने मला विचारलं - तुझ्या या कथेची नायिका अशी का आहे ?
तर - प्रत्येक व्यक्ती ही आदर्श नसते . जगात अशा व्यक्ती प्रत्यक्षात आहेत .
त्यांचंही आयुष्य आहे , त्यांचीही काही बाजू आहे . बरी - वाईट . त्यांच्या आयुष्याचा एक तुकडा मला मांडावासा वाटला .
मी कथा मांडली . ती कथा बरी - वाईट हे वाचकांवर .
दुसरं - सगळी मुलं - मुली अशी नसतात . विशेषतः होस्टेलवर राहणारी असं मला म्हणायचं आहे .
काही मुलांना ते नकारात्मक वाटू शकेल . काही जणांना ते चुकीचं आकर्षक वाटू शकेल . काही पालकांना टेन्शन येईल . विशेषतः ज्यांची मुलं हॉस्टेलवर राहतात . मला असं नको आहे .
कथेतील पात्रं पूर्णपणे प्रातिनिधीक आहेत .
सगळेच तसे नसतात . त्या माणसाने मला असं सांगितलं की - किती मुलं - मुली अशी आहेत , जे होस्टेलवर राहून स्ट्रगल करतात . त्यांचं करिअर घडवतात.
मी त्या सहृदय माणसाशी सहमत आहे .

वेगळ्या विषयावरची आणि वेगळ्या धाटणीची कथा चांगली फुलवली आहे.

मोहाची. वाकडी वाट चालताना भविष्यात त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, आपल्या वर्तनाचे काय दुष्परिणाम होतील याचा थोडासा जरी विचार दोघांनी केला असता तर स्वतःचंच मन त्यांना खात राहिलं नसतं.. दोघांचे सोनेरी दिवस असे कोमजले नसते.
भूतकाळातली चूक पुढे भविष्यात त्यांनी चुकूनही करू नये असं वाटलं..

कथा छान आहे.

त्या मुलींच्या विश्वाबद्दल त्यांच्याशी मैत्री झाली तरच समजू शकते. कथेत अर्थात ते डिटेल आले नाहीयेत. वरवरचेच आले आहे.

मी वालचंद कॉलेज, सांगलीला असताना हॉस्टेलवर राहत नसून बाहेर पीजी म्हणून राहायचो. मेस कॉलेजच्या जवळ होती. जेवण झाल्यावर एका टपरीवर गप्पा मारत जमायचो. कारण काही मुलांना सिगारेट वगैरे ओढायची असायची. तिथे दोन मुली यायच्या. तुम्ही वर्णन केल्या तश्याच भरगच्च फटाका वगैरे. मी त्यांच्या समोर पोरगेलासा वाटेल असे. कदाचित तसेच समजून त्या माझ्याकडे बघून ओळखीच्या हसायच्या. बोलणे काही नाही. रोज ट्रेन मध्ये दिसणाऱ्या ओळखीच्या चेहऱ्याना हसून ओळख दाखवतो तितकेच संबंध. एकदा अशीच स्माईलची देवाणघेवाण झाली. आणि तेव्हा माझ्या सोबत असलेल्या हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांनी मला माहिती पुरवली की त्या कॉलगर्ल आहेत. वॉचमनकडे नंबर मिळतील यांचे. त्यातली एक मराठी होती तर एक नॉर्थ इंडियन. माझा त्या मुलांवर विश्वास बसला नाही, पण त्यांना तसे बोलून दाखवले नाही. कारण समोरचा पुरावे तर काही देत नाही वर बोलतो की तू अजून बच्चा आहेस..

असो, मी मात्र माझी मनाची पाटी कोरी ठेवली आणि त्या मुलींना बघून आधीसारखेच हसणे कायम ठेवले.
पण मुंबईला आलो तेव्हा मी सुद्धा माझ्या इथल्या मित्रांना सांगू लागलो की तिथे हॉस्टेलला असे चालायचे, त्यातल्या दोन मुली माझ्या ओळखीच्या होत्या वगैरे वगैरे..

पण खरेच महाराष्ट्रातील एखाद्या हॉस्टेलवर असे घडत असेल तर कसे याची उत्सुकता आता ही कथा वाचून पुन्हा चाळवली. आपल्या कॉलेजलाईफ आणि फ्रेंड्सग्रूपपेक्षा वेगळेच विश्व आहे हे.

ऋन्मेष

खूप आभार

सहमत आहे

फोकस फक्त कथेवर होता

एकमेव पुरुष वाचकाची प्रतिक्रिया

कारण कळलेच नाही

आवडली कथा.
ती ज्या पद्धतीने फुलवून लिहिली आहे ते आवडले.
मोहाच्या क्षणासाठी किंवा पैशांसाठी काही वेळा कॉलेजमध्ये मुले मुली अशी पावले उचलतात.