त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. माझा आयडीही त्यांच्या आयडीला जुजबीच ओळखत होता. त्यांच्या मायबोलीवरच्या वावरातून, लेखनातून, अभिप्रायांतून, गप्पांमधून एक प्रतिमा मनात घडत गेली होती. विविधरंगी कागदी कपटे जोडून चेहरा जुळवावा तशीच आणि तेवढीच ओळख.
ही ओळख हृद्य होती मात्र. अगदी बालवयापासूनच सलग सहज निखळ नितळ सुख वाट्याला येऊच नये अशी एखाद्याची वाटचाल का असते याला काही उत्तर नाही. एका परीक्षेपाठोपाठ पुढची सत्त्वपरीक्षा असाच जणू आयुष्याचा अभ्यासक्रम आखलेला यांच्या बाबतीत. त्यामुळे घडलेला म्हणा किंवा गडद होत गेलेला म्हणा, इंग्रजीत 'आऊटलायर पर्सनॅलिटी' म्हणता येईल अशा प्रकारचा स्वभाव. पण त्यातूनही त्यांचा उमदा जीवनोन्मुख दृष्टीकोन लखलखत असायचा. त्यांनी कधी स्वतःची कणव केली नाही आणि इतर कोणाला ती करायची संधी दिली नाही.
अंगी धीर होता, धडाडी होती. 'मकान और दुकान' खंबीरपणे सावरलं होतं, मुलीचं एकल पालकत्व जबाबदारीने निभावलं होतं. आणि हे सगळं करत असतानाही स्वतःतलं एक वेडंबागडं, मिश्कील, खोडकर मूल त्यांनी जिवंत ठेवलं होतं. 'घरचा अभ्यास' झाला की हे मूल घरच्या पाळलेल्या आणि रस्त्यातल्या कुलुंगी कुत्र्यांशीही खेळायचं, त्यांच्यासाठी खिशात खाऊ बाळगायचं, 'मोठं झाल्यावर' बेडरूममध्ये छोटा फ्रीज ठेवून रात्री टीव्ही बघताना त्यातून कोल्ड्रिंक नाहीतर बिअर पिण्याची स्वप्नं बघायचं, नवीन कपडे घालून सिनेमा बघून यायचं, मध्येच व्हीगन व्हायचं खूळ डोक्यात घ्यायचं, कधी कोणाला मुळुमुळू रडण्यावरून फटकारायचं, कधी अर्धं चॉकलेट शेअर करत 'फिकर नॉट!' म्हणून धीरही द्यायचं!
तो शेर आहे ना,
मिरे दिल के किसी कोने में इक मासूम सा बच्चा
बड़ों की देख कर दुनिया बड़ा होने से डरता है
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेतून नव्हे, तर 'बड़ों की दुनिया' पचवून आलेल्या परिपक्वतेतून आलेलं, म्हणून लोभस होतं.
इथल्या अनेकांप्रमाणे मायबोलीमध्ये त्यांना त्यांचा कबिला सापडला होता. पण इथेही त्या कुठल्या एका कंपूच्या नव्हत्याही, आणि सगळ्याच कंपूंमध्ये होत्याही. त्यांचा वावर पारदर्शी असायचा. मनात आलं, लिहून टाकलं असा बाणा! नो फिल्टर्स! आपसुखच त्यांच्याशी जो संवाद घडेल तो - एकमत असेल वा मतभिन्नता - पण सहज व्हायचा, त्यात नसती आडवळणं लागत नसत. फटकेबाजी करत तशी खिलाडूपणे झेलतही!
अमेरिकेबद्दल त्यांना का कोण जाणे पण विशेष आस्था होती. इथल्या चालू घडामोडी, राजकारण, राहणीमान यांबद्दल त्यांना कुतुहलही असायचं आणि बरीच माहितीही असायची. त्या अर्थाने त्या खरंच ग्लोबल सिटिझन होत्या.
त्यांच्या बाकी बर्यावाईट अनुभवांबद्दल त्या ज्या सहजतेने - मॅटर ऑफ फॅक्टली - लिहायच्या त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं कॅन्सरचं निदान आणि त्यानंतरच्या लढाईबद्दलही लिहिलं. त्यांचा डेहराडूनचा फोटो बघून चरकायला झालं होतं. त्या गेल्याची बातमी कळली तेव्हा त्यामुळे दुर्दैवाने फारसं आश्चर्य वाटलं नाही. वाईट मात्र फार वाटलं. खरंतर आंतरजालाच्या आभासी दुनियेतली एक आभासी ओळख, पण जवळचं कुणी जावं तशी चुटपुट वाटली.
'दु:खद घटना' धाग्यावर त्यांच्याबद्दल कळल्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, खूप हळव्या आठवणी लिहिल्या - आशुडीने 'स्वतःच्याच Wonderland मधली Alice' असं फार हृद्य आणि चपखल वर्णन केलं त्यांचं.
ते उत्स्फूर्त आणि स्वाभाविक होतं, पण अमा 'बातमी' नव्हत्या. आपल्या होत्या. त्यांच्यासाठी स्वतंत्र धागा असावा असं फार फार वाटलं म्हणून हा धागा काढत आहे.
तुमचे अनुभव, तुमच्या आठवणी इथेही लिहाल का?
स्वाती, छान लिहिलं आहेस.
स्वाती, छान लिहिलं आहेस.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
सुरूवातीला एकदा त्यांना उद्देशून ( राहण्याच्या ठिकाणांबद्दल) तिरकस प्रतिसाद दिला होता. पण नंतर त्यांचं वय समजलं. अनेक ठिकाणी दिलेले प्रतिसाद वाचून खूप पश्चात्ताप झाला. समजत नव्हतं त्यांच्याशी कसं बोलावं त्या विषयावर.
पण त्यांनी जसं काही काहीही झालेलं नाही असं दाखवलं. छान संवाद ठेवला. मग मुद्दामून माफी नाही मागितली. झालं गेलं गंगेला मिळाले असा न बोलता करार केला जणू काही.
आजाराबद्दल समजलं होतं. त्या खूप जागरूक होत्या. त्या विषयावर बोलणे टाळले. प्रत्येक जण जाणार आहे. चुटपुट लागली तर त्याने इथल्या मुक्कामात जग जिंकलं असं समजायचं.
श्रद्धांजली.
अमांना श्रद्धांजली,
अमांना श्रद्धांजली,
'जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये' हे वाक्य त्या अक्षरशः जगल्या.
बापरे खूप धक्कादायक आहे
बापरे खूप धक्कादायक आहे माझ्या साठी. मधे दोन तीन दिवस मायबोली वर येणं झालं नाही. _/\_ श्रद्धांजली अमा.
स्वाती, मनातलं लिहीलं आहेत.
औचित्यपूर्ण धागा.
औचित्यपूर्ण धागा.
खरंच अमाचा तो डेहराडूनचा फोटो पाहून कससंच झालं होतं. पण maybe she was preparing us all for the inevitable.
अमा हे एक अजब रसायन होतं. एकदाच ठाण्याला वेमागटगला तिला प्रत्यक्षात भेटले होते. तेव्हाही ती फार न बोलता एका बाजूला बसून होती. पण बाफांवर अमा धोधो भेटली. तिचे लिखाण, प्रतिसाद आणि नेमकी मार्मिक टिप्पणी यातून ती नकळत सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची व्यक्ती झाली. 'विवेक' नावाच्या जुन्या मराठी नटाचं वर्णन करताना तिनं त्याला 'धुवट नट' अशी उपाधी दिली होती. ती भयानकच चपखल बसत होती त्यामुळे मी फार हसले होते. तसंच एकदा तिची कुत्री रात्री झोपताना अमाच्या डोक्याभोवती चमेलीच्या वेणीसारखी अर्धगोलाकार झोपते असं सांगून तिनं हसवलं होतं.
एकदम जिंदादिल, मिश्किल, अजब रसायन होतं अमा म्हणजे. असशील तिथे नेहमीप्रमाणेच मजेत रहा अमा. मस्त दोशे, आणि रेड वेल्वेट केक खा आणि ऐश कर. We will miss you though.
सगळ्यानी किती छान लिहलय अमा
सगळ्यानी किती छान लिहलय अमा बद्दल, खरच फार सम्रुद्ध आणी दिलखुलास व्यक्तिमत्व..
प्रत्यक्ष ओळख नाही,बोलण नाही पण गेले दोन दिवस चुटपुट लागुन राहिलिये..
स्वातीने चपखल वर्णन केलय्...आशुने लिहलय तस खरच अॅलिस इन वन्डरलॅन्ड.
मायबोलीकर विल मिस यु अमा!
खूप दुःखद !
खूप दुःखद !
अमा - त्या मला भेटल्या त्या माझ्या २ कथांवरच्या प्रतिसादावरून
मंटी बंटी आणि घंटी
आणि हि बाईपण भारी देवा
दोन्ही परस्परविरोधी प्रतिसाद
पण एक वाचून मी उडालोच
असं कोण थेट वाट्टेल ते लिहितं , तेही बाई माणूस ?
पण नंतर त्यांच्या इतर प्रतिसादांवरून कळलं की त्या धडाधड लिहितात . पण ते मनापासून असतं . जे वाट्टेल ते . मनमोकळं .
मग त्या काय लिहितात याची उत्सुकता वाटू लागली . आणि अलीकडे त्यांचा फोटो पाहण्यात आला .
मग कळलं - त्यांनी जग पाहिलंय .
दुःख पचवलंय . ...
एकदम त्यांचा आदरयुक्त दरारा वाटू लागला
संवाद साधायचा राहून गेला .
एक ज्योत निमाली ...
अमाचं जाणं खूप धक्कादायक आहे
अमाचं जाणं खूप धक्कादायक आहे. ती फायटर होती, सगळ्यावर मात करेल अशी. तिचं निधन झाल्याचं कळल्यावर कोणीतरी फसवल्यासारखी भावना झाली.
ती हैदराबादला असल्यापासून व्हर्च्युअल संपर्कात होती. तिच्या पोस्ट वाचणं आनंददायक होतं. तिच्या काही खास शब्दरचना होत्या. स्वातीने लिहिल्याप्रमाणे फिकर नॉट, मामीने लिहिलेले दोशे, इन्व्हेस्टमेंटबद्दल लिहिताना मुकेसभाई, 'आटोवाल्याकडून' सुट्टे पैसे घेतले असे अजून कितीतरी.. ती हटकून हे शब्द असेच लिहीत असे.
हैदराबादहून मुंबईला येतानाची तिची पोस्ट अजून आठवते आहे. मुलुंडला स्थायिक व्हायचं ठरल्यावर मराठी वस्तीत राहायला मिळणार ह्याचा तिला आनंद झाला होता, कारण कालिदास नाट्यगृह घराजवळ होतं, आणि ठाण्यातलं गडकरी रंगायतन सहज येण्यासारखं होतं. मधली बरीच वर्षे तिचा मराठी संस्कृतीशी संबंध बहुधा तुटला असावा, त्याबद्दलची तिची तहान लहान पोस्टमधूनही दिसून यायची. लेक जावयाचा दिवाळसण, जावयाला चांदीचं ताट, संक्रांतीला जावयाला हलव्याचा मोबाईल, अधिक महिन्यात चांदीचा दिवा अशी तिची हौस प्रकट होत होती. महाराष्ट्रात आल्यावर तिच्या करिअरला वेगळं परिमाण मिळालं असं एकदा तिने लिहिलं होतं. बऱ्याच पोस्टींमध्ये तिचा 'खिक्' असा शब्द असायचा, लिहिता लिहिता ती मिश्किल हसते आहे असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहायचं. ती इंग्रजीतून कॉपीरायटिंग करण्यात अग्रेसर होती त्याबद्दल मला तिचा भयंकर कुतूहल मिश्रीत आदर वाटायचा.
मध्यंतरीच्या काळात माझ्या एका पोस्टवरून त्यांनी गैरसमज करून घेतला होता, त्यावरून मोठी राळही उडाली होती.
पण चिनूक्सने लिहिल्याप्रमाणे सोशल मीडियावर लिहिणं म्हणजे आयुष्य सार्वजनिक करणं हे कळून चुकल्यानंतर अमाचे आणि माझे संबंध दृढ झाले होते.
एकदम हळवी पण कणखर आणि खंबीर, विक्षिप्त आणि विनोदी, उत्सुक आणि सर्वज्ञानी अशी होती अमा.
पुन्नी आणि माझी भाची दोघी दोन वर्षे एका वर्गात होत्या. दोघींनीही मायबोली टीशर्ट एकाच दिवशी घातल्यामुळे मी आणि अमा एकमेकींना ओळखतो हा शोध त्या दोघींना लागला होता. हे मला सांगताना अमाला अगदी लहान मुलासारखा आनंद झाला होता.
तसाच आनंद तिने स्वत:च्या हातांनी घडवलेला नेकलेस घातल्यावर त्यांना झाला होता.
मायबोलीवरचीच एक मैत्रीण माझा आणि अमाचा एक फोटो मला दर २१ एप्रिलला पाठवते, त्यादिवशी झालेल्या एका गटगमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. त्यानंतर पुष्कळ गटग झाली पण हाच फोटो तिच्या गूगल मेमरीमध्ये कायमचा क्लिक झालेला आहे. आता मी तो कधीही डिलीट करणार नाही.
You will always be missed Ama!
खूप सुंदर लिहिले आहे
खूप सुंदर लिहिले आहे सगळ्यांनीच.
अमांचे जाणे खूप चटका लावून गेलेय. लाईफ इज नॉट फेअर हे मान्य करत आनंदात कसे जगावे ते मी अमांकडून शिकले.
अमा, तुम्हाला मिस करत आहे, मिस करत राहीन.
अगदी साध्या
अगदी साध्या पिक्चरबिक्चरवाल्या पोस्टी टाकताना सुद्धा त्यांची आठवण येतेच. हमखास प्रतिक्रिया येत असे त्यांची.
(No subject)
वाह!!! खूप सुंदर मै.
वाह!!! खूप सुंदर मै.
क्यूट, मैत्रेयी.
क्यूट, मैत्रेयी.
Aww! असंच घडत असो!!
Aww! असंच घडत असो!!
Awwww the cutest Maichitra!
Awwww the cutest Maichitra!
क्युट आहे मै.
क्युट आहे मै.
मैत्रेयी, फारच छान ग,
मैत्रेयी, फारच छान ग,
छान चित्र.. tribute to अमा!
छान चित्र.. tribute to अमा!
फारच सुरेख.
फारच सुरेख.
ऑप्ट एकदम मैत्रेयी
ऑप्ट एकदम मैत्रेयी
maitreyee, सुन्दर
maitreyee, सुन्दर श्रद्धान्जली
मै, खूपच सुंदर!
मै, खूपच सुंदर!
मै, सुंदर श्रद्धांजली....
मै, सुंदर श्रद्धांजली....
मैत्रेयी, touching आहे चित्र.
मैत्रेयी, touching आहे चित्र.
अमा मुलुंडहून shift झाल्यावर तिकडली त्यांनी खाऊ घातलेली कुत्री मांजरी त्यांना शोधत असतील का काही दिवस?
मला अजून accept च होत नाहीये त्या आता नसल्याचं.....
मैचित्र apt आहे.
मैचित्र apt आहे.
थॅन्क्स सगळ्यांना. अश्विनी के
थॅन्क्स सगळ्यांना. अश्विनी के - तसेच काही डोक्यात होते, या जगातले त्यांनी लळा लावलेले प्राणी आता पोरके झाले , पण त्यांची लाडकी विनी रेन्बो च्या पलिकडे त्यांची वाट बघते आहेच!!
लाडकी विनी रेन्बो च्या पलिकडे
लाडकी विनी रेन्बो च्या पलिकडे त्यांची वाट बघते आहेच!! >>> दुसरी ती स्वीटी आहे बहुतेक अजून. स्वतः आजारी असूनही तिला उचलून डॉक्टरकडे नेत असत.
भारी आहे मै..
भारी आहे मै..
अमा भाग्यवानच तशी. माणसं आणि माबोकर असोच, पण कुत्रीही मिस करत असतील.
एकदा भटक्या कुत्रांच्या रात्रीबेरात्री ओरडण्याबद्दल मी एका पोश्टीत काही लिहिलेलं तर त्यांनी झापलं. म्हणे तुला असं कडाक्याच्या थंडीत उघड्यावर रात्र काढायला लावू. मग बघू.
अशा व्यक्तीची सेन्सेशन्स आणि सेन्सिबिलिटीज म्हणजे एखादी गॅलॅक्सी असते. कुणालाही, मग तो कितीही जवळचा असो, तो संच अख्खाच्या अख्खा कधीही कळत नाही आकळत नाही. आणि ते माणूस गेलं, की त्यासोबत एक अख्खी आकाशगंगा लुप्त.
>>> माणसं आणि माबोकर असोच, पण
>>> माणसं आणि माबोकर असोच, पण कुत्रीही
या धाग्यावर वात्रटपणा करायचा मोह टाळत होते, पण कदाचित अमांनाही हे वर्गीकरण माझ्याइतकंच आवडलं असतं असं वाटलं.
>>> माणूस गेलं, की त्यासोबत एक अख्खी आकाशगंगा लुप्त
खरं आहे.
छान मैचित्र!
छान मैचित्र!
Pages