महागाई

Submitted by वैशाली अ वर्तक on 26 December, 2024 - 13:57

महागाई थांब*

होती म्हणे एकेकाळी
खूप सारी ती स्वताई
आता दिसे महागाईचा राक्षस
सगळी कडीच महागाई

कोठे हरपले दिन
इतिहासी झाले जमा
कोठे कुणालाही त्याची
आहे का जराही तमा

साधे मीठ ते भाकर
असे सर्वची महाग
काय कसे जगणार
मनी येतोच ना राग

पैसे कितीही कमवा
महागाई तर फार
वाढतेच सदोदित
नाही पुरत पगार

पहा सध्याच्या काळात
मिळे धान्य मुठभर
पण द्यावे लागतात
पैसे मात्र पोतेभर

आहे जगी स्वस्त फक्त
काय तो येथे मानव
त्याच पैशाच्या कारणे
झाला आहे तो दानव

अन्न वस्त्र व निवारा
हुकूमाचे असे खांब
बाई महागाई तूची
आता कुठे तरी थांब

कसे जगावे काय खावे
दिन कंठणे झाले कठीण
महागाई नाकबूल करण्या
शोधूया उपाय नवीन

वैशाली वर्तक
अहमदाबाद

Group content visibility: 
Use group defaults