या कोरड्या विहिरीत

Submitted by नरेश रावताला on 26 December, 2024 - 10:10

या कोरड्या विहिरीत
या कोरड्या विहिरीत
लावायचीय् छलांग,
इथे शोधायचेय्
असंख्य अतृप्त आत्मे
जिंदगीला कंटाळून
जान दिलेले
डरपोक जीव...
दुनिया ज्यांना
म्हणते आसरा!
असहाय-बेसहारा,
गतप्राण झालेेले
इर्षेविरुद्ध, जबरीने
इच्छा नसताना
हे जीणेच नकोसे म्हणत
पाण्याच्या काठबंदात
ज्यांनी-ज्यांनी
आजवर केल्याय् आत्महत्या
त्या आत्म्यांचा
आता शोध घ्यायचाय्
या कोरड्या विहिरीत
लावायचीय् छलांग
काना-कोपर्‍यात लपलेल्या
अदृश्य जीवांना
काढायचेय् हुडकून
त्यांना विचारायचाय् जाब
जान देण्याच्या कारणांचा...
nareshrawatala@gmail.com
***

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users