Submitted by वैशाली अ वर्तक on 25 December, 2024 - 09:41
वस्त्र,पात्र,प्रक्षालिका..
किती हे शुद्ध मराठी
अर्थ लागेना सहज
पुणेकरांचेच डोके
शब्द -फोडची गरज
पाटी पहा समोरची
धैर्य, न करी ते मन
काय अर्थ लावायचा
वेडे समजतील जन
रोटी ,कपडा, मकान
जशा मुलभूत गरजा
वस्त्र ,पात्र ,*प्रक्षालिका*
पण गरजेचीच समजा
आता कळले मजला
शब्द आहे परिचित
*प्रक्षालिका* तर हवीच
वेळोवेळी सदोदित
पाट्या तर पुणेरीच
गोड शब्दी प्रक्षालिका
मोलकरीण न वदता
मान देण्याची प्रणालिका
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाप रे ! प्र-क्षा-लि-का
बाप रे ! प्र-क्षा-लि-का म्हणजे?
धुणारी.
धुणारी.
वस्त्रानि पात्राणि च प्रक्षलयति सा वस्त्रपात्रप्रक्षालिका।
धुणारी.
आह्ह्ह!!! गॉट इट. धन्यवाद
आह्ह्ह!!! गॉट इट. धन्यवाद मानव.
*प्रक्षालिका* तर हवीच
*प्रक्षालिका* तर हवीच
मान देण्याची प्रणालिका
या दोन ओळींत अष्टाक्षरी बिनसत आहे
बाकी कवितेचा आशय छान
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
प्रणालिका ऐवजी ही प्रथा असे लिहीले तर बेफिं नी दर्शवलेली उणीव दूर होइल का?
प्रक्षालिका पाहिजेच
प्रक्षालिका पाहिजेच
मान देण्या प्रणालिका
अशा सुधारणा करून अष्टाक्षरी साधता येईल.
बेफीकीर सर.
म्हणून च मी अषटाक्षरी वर लिहिले नव्हते. असो पण छान सूचना