कविता

Submitted by वैशाली अ वर्तक on 25 December, 2024 - 06:45

विषय .चौकट

चौकट शब्द उच्चारता
डोळ्या समोर येते बंदिस्त आकृती
चार कोन चार भुजांनी
बनलेली रचनाकृती

जीवन पण मानवाचे
अवस्थेत विभागलेले चार
त्याच चौकटीत वाढतो मानव
निसर्ग नियमानुसार.

नियमांच्या बंधनाची चौकट
पाळावीच लागते जीवनी
करत थोडा फेर बदल
मानव रचतो कल्पना मनी

बाजूस सारूया परंपरेची चौकट
घेऊया लक्षात पर्यावरण
थांबवुया -हास वृक्ष वनाचा
जाती भेद , राग द्वेषाचे करु होळीत दहन

वर्तनात असे कायद्याची चौकट
पाळावी लागते सातत्याने
न रहाता चौकटीत तियेच्या
शिक्षा भोगणे येते नियमाने

जगणे ठराविक चाकोरीत
कधी वाटते कंटाळवाणे
करुन चौकट आकुंचित
मानवाला आवडे जगणे स्वच्छंदाने

वैशाली वर्तक
अहमदाबाद

Group content visibility: 
Use group defaults