Submitted by वैशाली अ वर्तक on 24 December, 2024 - 06:42
- आठवून तरी बघ
अशी ग तू कशी सखी
कसे नाही तुझ्या ध्यानी
आठवून तरी बघ
खचितच आण मनी
गंध सांगेल तुजला
तुझ्या प्रथम भेटीचा
स्मरे मजला अजून
उरी जपला प्रीतीचा
भेट आपली पहिली
चंद्र साक्षीत घडली
तूज मज पहातोय
बघ तयाही स्मरली
येते का सय फुलांची
फुले होती फुललेली
आठवून तरी बघ
उमजून हसलेली
किती गोड आठवणी
जपलेल्या मनातूनी
कशी खंत नाही जरा
आठवेल क्षणातूनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई ग!!! काय गोड
आई ग!!! काय गोड
आई ग!!! काय गोड
आई ग!!! काय गोड
>>>आठवून तरी बघ
नको अश्रू वहायचे थांबत नाहीत मग
सुरेख अष्टाक्षरी!
सुरेख अष्टाक्षरी!
गहिरा आशय!
आश्वासक!
धन्यवाद सामो जी, बेफीकीरजी
धन्यवाद सामो जी, बेफीकीरजी