अरे भाय, 1960 के टाइम का मुंबई तो एकदम झकास होतं! दिवसभर गल्लीत क्रिकेट, सायकल पे रेस और संध्याकाळी चौपाटीवर जाऊन भेळ खाणं – वो सीन आज भी मेरे डोळ्यासमोर आहे. तेव्हा आम्ही डबल डेकर बसमधून फिरायचो, आणि बसमधून वरच्या सीटवर बसून खिडकीतून दिसणाऱ्या मुंबईच्या लाईट्स बघायचं एक वेगळंच सुख होतं.
सकाळी रेडिओवर ‘बिनाका गीतमाला’ सुरू व्हायचं, पण एक दोन मित्र होते जे त्यांच्या “Spotify” वर नवीन पॉप गाणी ऐकवायचे. आम्ही तितक्याच उत्साहाने गल्लीत क्रिकेट खेळायला जायचो. पण आमच्या एका मित्राकडे Nintendo होता, आणि तिथे “Mario Kart” खेळणं ही आमची दुसरी मोठी मजा असायची. एखाद्या रविवारी “Shaktiman” बघायचा प्लॅन असायचा, पण त्यात Netflix वर “Stranger Things” लावण्याचाही आग्रह कोणीतरी करायचं. आणि हो, “रेडिओवर ऐकू येणारं गाणं ‘Spotify’वर शॉर्टलिस्ट करतो” असा dialogue ऐकला की आम्हाला तेव्हा काय heavy वाटायचं!
संध्याकाळी गल्लीतलं क्रिकेट हे फिक्स होतं. पण त्याच वेळी “Candy Crush” वर स्पर्धा लावणं आणि पबजीच्या मॅचेसचा बॅकअप प्लॅनही ठरलेला असायचा. तेव्हा चहा-कॉफीच्या गप्पा म्हणजे ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ आणि ‘ट्विटर’पेक्षा काही कमी नव्हत्या.
गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर भेळ खाणं आणि “Bhel Selfie” काढणं हे त्या काळात मोठं कौतुकाचं काम होतं. कधी-कधी गिरगावमध्ये फिरत असताना एका मित्राच्या हातात नवीन “iPad” दिसायचं, आणि आम्ही सगळे त्याच्या आजूबाजूला गोळा व्हायचो.
शाळेत एक वेगळाच प्रकार होता. गणितासाठी आम्ही कधी-कधी “Khan Academy” चा वापर करायचो, गणिताचा गृहपाठ करताना एका मित्रानं “Calculator Watch” वापरली होती, आणि तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले होते.
गणपतीच्या उत्सवाला आमचं गल्लीतलं वाद्य पथक लीड करायचं, आणि “Spotify” वरून “DJ गणेश गाणी” वाजायची. त्या काळात लोकांना वाटायचं की रेडिओवर गाणी लावणं मोठं काम आहे, पण आम्ही आमच्या वाय-फाय स्पीकर्सवर गाणी वाजवायचो.
संध्याकाळी आमच्या गल्लीत चाय की टपरीवर भारी हंगामा असायचा. वडापावच्या जोडीला “Zomato” वरून ऑर्डर केलेलं पिझ्झा कधीही खाल्लं जायचं. आणि गप्पा असं काही रंगायच्या की “PUBG” च्या लेवलपासून ते “स्टार्टअप्स कसं करायचं” यावर सगळे तज्ज्ञ बनायचे.
रात्री मित्रांच्या घरी जाऊन LAN गेम्स खेळायचो. त्या काळी Wi-Fi कसा पकडायचा आणि नेटफ्लिक्स अकाउंटचा पासवर्ड कोणाला द्यायचा यावरही चर्चा रंगायच्या. कधी रात्री जागरण करायचं असलं की “Counter-Strike” खेळत बसायचो, आणि सकाळी उठून जणू काही आम्ही सायकलिंगसाठी गेलेलो होतो असं म्हणायचो.
त्यावेळी थिएटरमध्ये जाऊन “प्यासा”सारखा सिनेमा बघायचा, आणि घरी आल्यावर “Game of Thrones” चा सीजन सुरू करायचा. ही आमची रूटीन लाईफ होती.
माझं बालपण म्हणजे 1960 चं एकदम हटके लाईफ होतं—जुन्या काळाचा साधेपणा पण मुंबईचं ते खास वातावरणच असं होतं—ते काळाच्या पलीकडचं होतं!
1960s मधली माझी फेवरिट आठवण
1960s मधली माझी फेवरिट आठवण म्हणजे आम्ही सर्व मुलांनी शाळेला दांडी मारून नेपोलियनबरोबर जाऊन तोरणा घेतला होता, ती! दुसऱ्या दिवशी शाळेत पोलिस चौकशीला आले तेव्हा जाम फाटलेली. पण घोसाळकर मास्तरांनी ही पोरं काल माझ्याच वर्गात होती, म्हणून सांभाळून घेतलं. साला घोसाळकर मास्तर म्हणजे जंटलमन माणूस _/\_
भारी आहे
भारी आहे
बाकी चौपाटी वरची भेल माझी माझ्या आईसोबतची बेस्ट आठवण आहे. कधीतरी जरूर लिहेन त्यावर..
आणि डबल डेकरचे सुख क्या बात. त्यावर आधीच इथे धागा आहे आपला.
डबल डेकर !! मुंबईची शान - ८६ वर्षांचा हा प्रवास अखेर थांबला!
https://www.maayboli.com/node/84028
1960s मधली माझी फेवरिट आठवण
1960s मधली माझी फेवरिट आठवण म्हणजे आम्ही सर्व मुलांनी शाळेला दांडी मारून नेपोलियनबरोबर जाऊन तोरणा घेतला होता,
->>> गुड जोक
त्यावेळी झोमाटो होतं?
त्यावेळी झोमाटो होतं?
srd- विनोदी धागा आहे… माझा
srd- विनोदी धागा आहे… माझा जन्म २००० मधला आहे…
आणि हो प्रतिसाद पण विनोदी आहे
आणि हो प्रतिसाद पण विनोदी आहे.. नाहीतर पुन्हा विचाराल २००० कसे
हो ना ६० मध्ये आम्ही काळ्या
हो ना ६० मध्ये आम्ही काळ्या घोड्यावर बसून राणी बरोबर प्रो कबड्डी पाहायला जात असू. बरोबर वाटेत खायला स्मोकिंजो चे पिझ्झे पण घेत असू. त्या काळी डबल डेकर फार फेमस होत्या. त्यांच्यावर एक अजून मजला चढवून त्यांचे तीन मजली करता येईल का याचे प्रयोग सुरू होते. पण मिलन सबवे मध्ये पाणी शिरल्याने ते रद्द केले गेले
डफ
तुम्ही कबुतरांच्या पायाला बांधलेल्या चिठ्ठीतून

कुठे भेटायचं तें मला कळवलं, की मी ड्रोन तुमच्या चाळीवर उडवून होकार द्यायचे...
तुम्ही कबुतरांच्या पायाला
तुम्ही कबुतरांच्या पायाला बांधलेल्या चिठ्ठीतून
कुठे भेटायचं तें मला कळवलं, की मी ड्रोन तुमच्या चाळीवर उडवून होकार द्यायचे...>>
एखाद्या पिक्चर मध्ये अशी लव स्टोरी दाखवायला पाहिजे. शहर की लड़की गाव का छोरा.
भाऊ
भाऊ
भाऊ
भाऊ

विनोदी आहे हे विसरून जातो आणि
विनोदी आहे हे विसरून जातो आणि टेक्निकल चुका काढायची खोड वर येते.
>>>कबुतरांच्या पायाला बांधलेल्या चिठ्ठीतून
कुठे भेटायचं तें मला कळवलं,.....>> म्हणजे बंड्याने यमीला भेटून तिच्याकडची कबुतरं आपल्याकडे आणून पिंजऱ्यात ठेवायला हवी. एकेक सोडायची चिठ्ठी बांधून.
भाऊकाका भारी मस्तच, हाहाहा.
भाऊकाका भारी मस्तच, हाहाहा.
भाऊ जमले आहे…
भाऊ
जमले आहे…
भाऊ, मस्त!
भाऊ, मस्त!