Submitted by द्वैत on 19 December, 2024 - 10:55
तहान
श्वासांची जपतो माळ
हे पुण्य म्हणू की पाप
दारावर ठकठक करता
हा व्याकुळतेचा शाप
गात्रांना सुटतो कंप
अंधार उजळण्याआधी
पिकलेले पान गळावे
गळतात तश्या का व्याधी
हलकेच निसटते वाळू
देहाचे मिटता भान
ओढते गर्त खोलात
निजलेली सुप्त तहान
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कविता..!
छान आहे कविता..!
थोडीशी गूढ अर्थाची ..