Android मोबाईलचे फॅक्टरी रिसेट

Submitted by पियू on 11 December, 2024 - 12:14

प्रस्तावना

गेले जवळपास महिनाभर माझ्या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा बंद आहे. आणि सेल्फी कॅमेरा लागणारे ॲप (व्हॉटसअप व्हिडियो कॉल, झूम, गूगल मीट ई.) उघडले की ते ॲप ' नो कॅमेरा अव्हेलेबल ' अशी एरर देते.

हा खरे तर हार्डवेअर एरर असेल असे प्रथमदर्शनी वाटेल. परंतु याआधीही माझे या मोबाईलमधील हार्डवेअर प्रॉब्लेम असेल असे वाटलेले प्रॉब्लेम्स माझ्या नेहमीच्या दुकानदाराने सॉफ्टवेअर (ऑपरेटिंग सिस्टीम) अन्इंस्टॉल आणि री-इंस्टॉल करून सोडवले आहेत.

यावेळी मात्र तो मोबाईल फॉरमॅट मारावा लागेल असे म्हणत आहे. "घरच्या घरी मोबाईल फॅक्टरी रिसेट मारा. त्याने सेल्फी कॅमेरा चालू झाला नाही तर नक्कीच हार्डवेअर प्रॉब्लेम आहे असे धरून ते काम करावे लागेल" असे म्हणाला आहे.

प्रश्न / शंका

रेडमी नोट १० प्रो अँड्रॉइड फोन आहे.
२०२० मध्ये घेतलेला आहे.
MIUI व्हर्जन १४.०.१ आहे.
Android व्हर्जन १३ काहीतरी आहे.
फोन स्वतः कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट आलेले दाखवत नाहीये.

तर फॅक्टरी रिसेट मारण्याआधी काय काय काळजी घेऊ. कोणकोणत्या गोष्टींचा बॅकअप घेऊ? कसा घेऊ?

मी पीसी मध्ये फोटोज् घेतले आहेत.
कॉन्टॅक्ट गूगल अकाऊंट ला सिंक केलेले आहेत.
कोणकोणते ॲप डाऊनलोड केलेले आहेत ते नोंदवून नंतर पुन्हा टाकणार आहे.

याशिवाय काय करणे गरजेचे आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसाद वाचतोय.
माझी या फॉरमॅट रिसेट ने आधी band वाजवली आहे.
त्यामुळे इथे कामाची माहिती मिळेल असे वाटतेय.

बाई दवे,
माझाही फार फार पूर्वी सेल्फी कॅमेराचा सेम प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा तो कसा सुटला हे आता आठवत नाही. झोप आल्यामुळे असेल. उद्या आठवले तर लिहितो. शुभरात्री.

गूगल अकाऊंट सिंक असेल तर अ‍ॅप नोंदवण्याची गरज पडू नये. ती अकाउंट आला की आपोआप येतील.
अ‍ॅप मधला डेटा काय हवा का ते बघा. बाकी फॅक्टरी रिसेट बिंधास मारा. त्याने काय सुधारेल कल्पना नाही पण काही बिघडू नये.

गूगल अकाऊंट सिंक असेल तर अ‍ॅप नोंदवण्याची गरज पडू नये. ती अकाउंट आला की आपोआप येतील.
>>> हे मलाही माहिती नव्हतं!

पियू, इथे अपडेट देशीलच.

गुगल बॅकअप मध्ये टेक्स्ट मेसेजचा बॅकअप घेते पण रिस्टोर करत नाही जर काही महत्वाची माहिती हवी असेल तर बॅकअप (वेगळ्या प्रकारे गुगल नोट, एव्हरनोटला कॉपी ) घेऊन ठेवा. फोटो, अ‍ॅप तुमच्या गुगल अकाउंट ला जोडलेले असल्यामुळे ते येऊन जातील. व्हाट्सअँप चा फॉरमॅट करण्यापूर्वी एक बॅकअप घ्या आणि तो गुगल वर बॅकअप झाला आहे का कन्फर्म करा.

गुगल बॅकअप मध्ये टेक्स्ट मेसेजचा बॅकअप होतो पण रिस्टोर करत नाही जर काही महत्वाची माहिती हवी असेल तर बॅकअप (वेगळ्या प्रकारे गुगल नोट, एव्हरनोटला कॉपी ) घेऊन ठेवा. फोटो, अ‍ॅप तुमच्या गुगल अकाउंट ला जोडलेले असल्यामुळे ते येऊन जातील. व्हाट्सअँप चा फॉरमॅट करण्यापूर्वी एक बॅकअप घ्या आणि तो गुगल वर बॅकअप झाला आहे का कन्फर्म करा.

डेटा जाईल
महत्वाचा बॅक up घेउन ठेवा
App चे गुगल।प्ले स्टोअर मध्ये दिसते बहुतेक, ह्या device वर हे app अशी हिस्टरी.

4 वर्षे झाले तर नवीन मोबाईल घ्या असा टिपिकल माबोकर सारखा सल्ला द्यायला आलो खरंतर Happy

फोटो, अ‍ॅप तुमच्या गुगल अकाउंट ला जोडलेले असल्यामुळे ते येऊन जातील. व्हाट्सअँप चा फॉरमॅट करण्यापूर्वी एक बॅकअप घ्या आणि तो गुगल वर बॅकअप झाला आहे का कन्फर्म करा.

>> ओके. Thanks नरेन.

4 वर्षे झाले तर नवीन मोबाईल घ्या असा टिपिकल माबोकर सारखा सल्ला द्यायला आलो खरंतर

>> नवाच मोबाईल घ्यावा असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मी जनरली डिजिटल उपकरणे फक्त वय झाले किंवा नवा अपडेट आला म्हणून बदलत नाही. कारण कितीही नवीन व्हर्जन घेतले तरी सहा महिने-वर्षभरात अजून नवे काहीतरी येतेच.

बॅटरी खराब होतअसते जनरली आणि त्याचे सॉफ्टवेअर updates बंद होतात,
बॅटरी लवकर संपणे वै।प्रकार होतात जनरली 3 वर्षांनी म्हणून . अन्यथा जी वस्तू आहे तिचे युटिलिटी नीट सुरुय तोवर बदलायची गरज नाही.
हल्ली बनवताना 4 ते 5 वर्षात बदलावाच लागेल असे mobile बनवतात वाटतं.