Submitted by हर्षल वैद्य on 5 December, 2024 - 02:07
शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी
मुग्ध त्या साऱ्या स्मृती उठल्या मनी झंकारुनी
स्मरल्या किती रात्री गुलाबी तुजसवे ज्या वेचल्या
अरुणोदयी पक्षीरवाने कितिक आणी विलगल्या
याद त्यांची जागली मग अंतरी आसावुनी
आणि स्मरती त्याहि ज्या विरहानलाने पेटल्या
खिन्न हृदयाने किती मी भग्न गजला रचियल्या
आज स्मरते सर्व ते पुरले कधी जे मन्मनी
जादू कशी ही होतसे या चांदराती ना कळे
अंतरीच्या गूढगर्भी दडवलेले उन्मळे
विसकटे आयुष्य सारे एक मोहाच्या क्षणी
तीच नक्षत्रे नभीची तेच वृक्ष नि वल्लरी
मी न उरलो तोचि पण सरत्या ऋतू संवत्सरी
उरले अता ते चित्र का अश्रूभऱ्या या लोचनी
शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी
मुग्ध त्या साऱ्या स्मृती उठल्या मनी झंकारुनी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर विसकटे ठीक करा.
सुंदर
विसकटे ठीक करा.
आवडली
आवडली
समृद्ध भाषाशैली व गहिरा आशय
समृद्ध भाषाशैली व गहिरा आशय
(भाऊसाहेब पाटणकर यांची शैली आठवली)
अहाहा!!!
अहाहा!!!
आशय खूप छान.
आशय खूप छान.
कविता एकदम ओघवती झालेली आहे. कवीला काय म्हणायचे आहे ते लगेच समजत आहे.
पण एक सुचवू का? राग नका मानू हं.
इतक्या छान गोड वृत्तात कविता लिहिली आहे. पण इतकी सूट घेतली आहे ना (व्याकरणातून).
ती नसती घेतली ना तर अजून मजा आली असती.
असेच लिहित रहा. पुढील आशयगर्भ लिखाणास शुभेच्छा.