प्रयोजन भाग ६

Submitted by पर्णीका on 24 November, 2024 - 23:47

।।६।।

“तु प्रोफेशनल मदत घेण्याचा विचार नाही केलास? “

“मी केला नसेल असे वाटते का तुला अमृता? मी बराच रिसर्च केला ह्यावर. माझ्या न्युरोसायकिएट्री मधल्या मित्राकडुन पण काही गोष्टी समजावून घेतल्या. मग त्याने रेकमेंड केलेल्या एका सायकिऍट्रिस्टला भेटले”

“मग?”

“त्याने मला सांगितले की ही लक्षणे ‘Dissociative personality disorder (DPD)’ ह्या विकाराशी काही अंशी जुळतात. म्हणजे त्यातही रुग्णांना त्यांच्या आत दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती रहातात असे वाटते. सहसा अशा व्यक्तींनी लहानपणी अतिशय तीव्र स्वरुपाचा ट्रॉमा सहन केला असतो. त्यांच्या आत तयार झालेली व्यक्तिमत्वे ही त्या आघातामुळे स्वतःला होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्याच्या प्रयत्नांत निर्माण होतात. पण ही व्यक्तीमत्वे हिंसक असतात आणि त्या व्यक्तिंना सतत स्वतःला किंवा इतरांना इजा करायला भाग पाडतात.

माझ्या बाबतीत असा कुठलाही ट्रॉमा नसला तरीही लक्षणांवरून हीच शक्यता जास्त वाटत असल्याने आपण सुरुवात ह्या दिशेने करु असे त्याने मला सांगितले. ट्रीटमेंट चा एक भाग म्हणजे हिप्नॉसिस सेशन्स. ते त्याने सुरू केले”

“ मग काही कळले त्या सेशन्स मधुन?”

“नाही ना. आतापर्यंत तीन सेशन्स झालेत. पण सेशन्स मध्ये त्याला तिचे अस्तित्व जाणवत नाही असे त्याने मला सांगितले. मला ही जाणवले की सेशन होत पर्यंत तिच्या कडून काहीच संवाद साधला जात नाही त्या दिवशी. मला आणखी काही गोष्टी जाणवल्या, पहिली म्हणजे ती जी कुणी आहे ती माझ्यावर ताबा मिळवत नाही किंवा मला कुणालाही इजा करायला भाग पाडत नाही. ती फक्त सातत्याने मी तिच्याशी बोलावे किंवा टु बी मोअर प्रिसाइझ असे म्हणु की विचार एक्सचेंज करावे, अशी विनंती करते. मी जितका विचार करते, तितकी माझी खात्री पटत चालली आहे की, तिला सायकिएट्रिस्ट समोर स्वतःचे अस्तित्व प्रकट होऊ द्यायचे नाहीये. मी अजुन एक दोन सेशन्स करीन पण मला जाणवायला लागले आहे की त्यातुन काही निष्पन्न होणार नाही. तिच्याशी कुठल्याही सुपरविजन शिवाय संवाद साधण्याची मला भीती वाटते. आता पुढे कसे काय करायचे ते समजत नाहीये.”

“शांत हो यामिनी. असा धीर सोडू नकोस. तु म्हणालीस त्याप्रमाणे आपल्याला अजुन ही समस्या नेमकी काय आहे ते समजले नाहीये. पण जमेची गोष्ट अशी की हे जे काही चाललंय त्यातुन तु स्वतःला किंवा इतर कुणालाही इजा करशील अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही. आपण विचार करू ह्यावर, आणखी रिसर्च करु. काही तरी मार्ग नक्की सापडेल. पण आता इथून पुढे स्वतःला अशी आयसोलेट करुन घेऊ नकोस. माझ्याशी, आंटी अंकलशी नियमित बोलत रहा.”

“ऋता, थॅन्क्स यार, मला एकदम हलकं वाटतंय.”

“मग हे इतके दिवस एकटिने का सहन केलेस यामिनी?”

“अमृता…”

“काळजी करू नकोस मी नाही सांगत सध्या आंटीना. तुला करियर च टेंशन आलय, म्हणून तू जरा एकलकोंडी झाली आहेस असे काही तरी सांगीन, सध्या पुरते. तुही त्यांना फोन करून साधारण ह्याच लाईनवर काही तरी बोल. आणि चल आता, काही तरी खाऊ, भुक लागलीय मला मरणाची. म्हाताऱ्याने सकाळी मीटिंगमध्ये डोकं फिरवल्याने लंच स्कीप केले मी आज.“

“ऋता, तुला मी किती वेळा सांगितलंय, त्या कुजकट माणसाच्या बोलण्याचा स्वतः ला त्रास करुन घेत जाऊ नकोस म्हणून. वर्थ आहे का हे जेवण वगैरे स्कीप करणे? तो मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी बोलतो हे कळत नाही का तुला?”

“हल्ली नाही करुन घेत ग, पण आज चुक माझीच होती त्यामुळे एकदम लागले मला त्याचे टोमणे.”

“काय झाले?”

“अगं त्याने ते येत्या ग्रांट कॉल साठी प्रपोजल तयार करायला सांगितले होते ना , ते राहुनच गेले माझ्या कडुन.”

“ठीक आहे ग, होते असे एखाद्या वेळी. एवढे मनाला नको लावुन घेऊन. कधीपर्यंत देशील म्हणुन कमिट केलेस त्याला आता?”

“उद्या सकाळी “

“शीट”

“अगं तसं जवळपास ७०% लिखाण झाले होते माझे. उरलेले आज दुपारी तिरमिरीत बसून पुर्ण केले. आता मला फक्त पायलट डेटा एकदा चेक करुन जोडायचा आहे आहे आणि लिहिलेय ते थोडे पॉलीश करायचे आहे. आपला स्वयंपाक आणि जेवण झाले की करते. आज त्याला पाठवुनच झोपीन.”

“मग एक काम कर. आता बसुन करुन टाक तोपर्यंत मी तुला आवडतो तसा बिशीबेळे भात करते. सोबत भेंडीच्या काचऱ्या, पापड आणि लोणचे. आज आपली फुल कार्ब फीस्ट. तू तसंही दुपारचे जेवण स्कीप केले आहेस त्यामुळे तुझा कार्ब अलांउस डबल आहे आज.”

“पण…”

“नो पण, चल आटप लवकर. स्वयंपाकात तुझी मदत घेण्यापेक्षा नंतर निवांत गप्पा मारणे प्रेफर करीन मी, जा आता.”

“यामिनी…”

“काय ग बराच वेळ बसली होतीस, पाठवलेस इमेल?”

“हो, पण ते मरु दे.”

“काय झाले?”

“तुला आठवतंय, ह्या डेटा मधल्या कंट्रोल गृपमध्ये एक सॅंपल तुझे पण होते?”

“हो त्याचे काय?”

“यामिनी तुझ्या सॅंपल मध्ये दोन वेगवेगळे डी एन ए सिक्वेंसेस आहेत!”

“व्हाॅट? दोन जीनोम्स? इज दॅट इव्हन पॉसीबल?”

“ हो. टेक्निकली पाॅसीबल आहे. पहिली जास्त संभाव्य शक्यता म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांट मधुन किंवा गर्भाकडुन आईला/ आईकडुन गर्भाला दुसरा जेनेटिक सिक्वेंस पास केला जाऊ शकतो. ह्याला मायक्रोकायमेरिजम (Microchimerism) अशी टर्म आहे. इम्युन सिस्टीम ह्या दुसर्या डीएनएला बाहेरचा समजुन टार्गेट करते. त्यामुळे अशा व्यक्तींना ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतात बहुतांश वेळेला. दुसरी तुलनेत कमी असलेली शक्यता म्हणजे टेट्रागमॅटिक कायमेरिजम (Tetragametic Chimerism). एकाच वेळी दोन वेगळे गर्भ तयार झाले पण त्यापैकी एक थोड्याच दिवसात पेरीश झाला पण त्यापूर्वी त्यातील स्टेम सेल्स दुसर्या गर्भात सामावल्या गेले तर हे होऊ शकते. लेमन टर्म्स मध्ये ह्याला घोस्ट ट्वीन म्हणतात.

एक्स्पर्टसचा असा अंदाज आहे की साधारण १०% लोकांमध्ये कायमेरिजम असते. पण बर्याच लोकांमध्ये हे डिटेक्टच होत नाही, कारण तसाच काही प्रॉब्लेम आल्याशिवाय कुणी सिक्वेसिंग कशाला करेल?”

“सो मी एक दुर्मिळ किंवा नॉट सो दुर्मिळ जेनेटिक कायमेरा आहे. मग?”

“त्यातील पहिली शक्यता सध्या सोडुन देऊ कारण २/३ कारणे तुझ्या बाबतीत लागु होत नाहीत, शिवाय तुला आतापर्यंत काही ऑटोइम्युन कॅटेगरीतला त्रास झाला नाही. आपण दुसऱ्या शक्यतेवर फोकस करु. आपण इथे मल्टीपोटंट स्टेम सेल्स (multipotent stem cells) बद्दल बोलतोय. असे स्टेम सेल्स जे कुठल्याही स्पेशलाइज्ड सेल्स मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. अशा स्टेमसेल्सच प्रमाण कमी असते सहसा पण ~३०% पर्यंत रिपोर्ट झालंय लिटरेचर मध्ये.”

“मला तुझा मुद्दा नाही कळला.”

“तुझ्या केस मध्ये ते मल्टीपोटंट स्टेम सेल्स न्युरॉन्स मध्ये कन्व्हर्ट झाले असतील तर?”

“तुला असे वाटतेय की माझ्या मेंदुच्या आतमध्ये असलेली ‘ती’ माझी कधीही जन्माला न आलेली जुळी बहीण आहे?”

“कन्फर्म नाही पण हो हाच विचार आला मनामध्ये. लिटरेचर मध्ये रिपोर्ट झाले नसले तरीही थिअरॉटिकली हे शक्य आहे हे माझ्या पेक्षा जास्त खात्रीने तू सांगु शकशील. शिवाय तू आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी पण ह्या शक्यतेशी जुळतात.”

“पण तसे असेल तर ती इतकी वर्षे गप्प का होती? आता अचानक अशी ऍक्टिव का झालीय?”

Group content visibility: 
Use group defaults

पीळ?

अरेरे, शब्द चुकला का? ती शास्त्रीय भाषा समजायला जरा कठीण गेली हो! जरी त्यामागची कल्पना लक्षात आली होती तरीही. म्हणून पीळ.
बरं, ट्विस्ट वा कलाटणी या अर्थाने घ्या. पण ती खरी कलाटणी नाहीये, तर समस्येची उकल आहे.
पण अजूनही या उकलीतून जन्मजन्मांतरीचे हिशोब, जे विज्ञान संमत नाही, ते कसे जमणार (वा नाही) ही उत्सुकता आहेच!
बढिया आहेच!

धन्यवाद बुवा. पीळ हा शब्द पुण्यात 'पाल्हाळ' ह्या अर्थाने वापरताना ऐकलाय , म्हणून एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारले.

शास्त्रीय संज्ञांबद्दलच तुमचं म्हणणं आलं लक्षात. तसं होऊ शकेल ही आयडिया होती म्हणून कंसात स्पेलिंग दिले होते जर गुगल करायचे असेल तर. काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर जरुर विचारा, मी एक्स्पर्ट नाही पण यथामती उत्तर देईन.

मस्त मस्त!
शास्त्रीय माहिती नाही, पण गोष्टीतून जेवढं कळलं तेवढं पुरेसं आहे.
'पीळ' हा शब्द डीएनएचा पीळ या अर्थानेही घेता येईल Lol

Dissociative personality disorder (DPD) ह्या कल्पनेवर मी एक कथा लिहिली होती.
"कॉस्मिक सेंसॉरशिप." तेव्हा ह्यावर रिसर्च केला होता.
आता अचानक अशी ऍक्टिव का झालीय?”>>> त्याला एक ट्रिगर लागतो. उदा.Hulk. Banner is physically transformed into the Hulk when subjected to emotional stress, at or against his will. Change Agent नावाच्या कादंबरीतही हा थीम आहे.
येऊ द्या पुढचा भाग.

हा भाग जबरी झालाय. कळायला थोडा कठीण होता आणि वैज्ञानीक संकल्पना पूर्णपणे समजल्या नाहीयेत पण कथेकरता जेवढे गरजेचे होते तेवढे समजले त्यामुळे मजा आली.

अजुनही यामिनीचा ट्रॅक आणि शिखंडीचा ट्रॅक एकत्र कसे येणार हे समजले नाहीये - म्हणजे ३-४ धूसर शक्यता वाटताहेत पण नक्की अंदाज नाही येत. सस्पेन्स मस्त वाढत चालला आहे.

धन्यवाद माधव. अमृता यामिनिला जे सांगतेय ते पोहचवण्यात मी कमी पडले बहुदा म्हणुन तो भाग क्लिष्ट वाटतोय. तिला काय सांगायचे होते ते जरा विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करते.

बीजांड (egg/oocyte) आणि शुक्राणु (sperm) ह्यांच्या संयोगातुन जी जनुकियदृष्ट्या परिपुर्ण पेशि (fertilized egg/zygot) तयार होते ती पुढे १ ते २, २ ते ४, ४ ते८,... अश्या भुमितिय गुणोत्तरात वाढत जाते. जेन्व्हा हा पेशि समुह १० - ३० पेशिंचा असतो तेन्व्हा ह्या पेशिंमध्ये मानवी शरीरातील कुठलिहि पेशि तयार करण्याचे सामर्थ्य असते. ह्या अवस्थेला नाव आहे omnipotent/totipotent stem cells. हा पेशिसमुह जेन्व्हा ५०- ३०० पेशिंचा बनतो तेन्व्हा त्यात तीन वेगळे भाग तयार होतात. एकाभागापसुन त्वचा, केस, दात, चेता पेशी (nerve cells), इत्यादी. दुसर्‍या भागापासुन स्नायु, हाडे, रक्त इत्यादि आणि तिसर्‍या भागापासुन पचनसंस्था, यकृत, श्वसनसंस्था इत्यादि. थोड्क्यात अमर्याद क्षमता हि विशिष्ट पेशि तयार करण्याच्या क्षमतेत परिवर्तित होते. ह्या अवस्स्थेला नाव आहे pluriotent stem cells. हाच क्रम पुढे कायम रहातो आणि शेवटी unipotent म्हणजे एकाच प्रकारच्या पेशि तयार होण्याच्या अवस्थेला येउन थाम्बतो.

अमृता यामिनिला असे सांगतेय की तिचि जुळि बहिण (जुळ्या बहिणिचा गर्भ) फक्त ह्या pluriotent अवस्थेपर्यंतच जगु शकला. पण तो पुर्णतः नष्ट होण्याऐवजी त्यातील ~३०% स्टेम सेल्स यामिनिच्या शरीरात सामावले गेले. त्यातुन एक मेंदुचा एक असा भाग तयार झाला ज्याची स्वतंत्र अशि ओळख आहे. त्यामुळे यामिनिला तिच्या मेंदुत कुणितरी दुसरी स्त्री असल्याचे जाणवतेय.

पुढे येणार्‍या उल्लेखासाठी: omnipotent and pluripotent stem cells ह्यांचे वर्गिकरण embryonic stem cells असे केले जाते. तर त्याच्या पुढच्या अवस्था म्हणजे multipotent, oligoptent and unipotent stem cells ह्यांचे वर्गिकरण non embryonic stem cells असे केले जाते. फलितपेशि (fertilized egg/zygot) हा एक स्वतंत्र जीव आहे आणि म्हणुन त्यांचा सम्शोधनात वापर करणे अनैतिक आहे अहि अमेरिकेतल्या उजव्या पक्षाची धारणा आहे. त्यामुळे embryonic stem cells चा वपर सम्शोधनात केला जाउ शकत नाहि. non embryonic stem cells मधिल काहि पेशि बाळाच्या जन्मानंतर नाळ आणि प्लासेंटा मधुन मिळु शकतात फक्त त्याम्चाच वापर सम्शोधनात केला जाउ शकतो.