“जेवणातला भात बंद करून टाकायचा, मग मधुमेहाची चिंता नको”,
“चहाबाज आहात का तुम्ही ? काही हरकत नाही ; मेंदूच्या आरोग्यासाठी ते चांगलंच”
“रोज तासभर चालत जा, मग हृदय कसे ठणठणीत राहील बघा”
"चॉकलेट भरपूर हादडत रहा; ती दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे”,
वगैरे. . .
वरील प्रकारची असंख्य विधाने आपल्या अवतीभवती रेंगाळत असतात. पारावरच्या गप्पा, निरनिराळी सामान्य वृत्तमाध्यमे आहे आणि आंतरजालाची ज्ञानगंगा हे त्यांचे प्रमुख स्त्रोत. अशा फुकटच्या आरोग्य सल्ल्यामध्ये आहारविषयक सल्ले हे सर्वोच्च स्थानावर आहेत हे सांगणे न लगे. गेल्या दोन दशकांमध्ये व्हाट्सअप सारख्या प्रसार आणि प्रचार विद्यापीठांनी देखील असल्या उथळ विधानांना फैलावण्याचे जोरदार काम केलेले आहे. अशी विधाने वारंवार अवतीभवती आदळत राहिल्याने जनमानसात काही गैरसमज/ मिथके दृढ होतात.
एखाद्या आजाराची कारणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण व्हावे लागतात. ते निकष तपासून पाहण्याच्या वैज्ञानिक पद्धती प्रस्थापित आहेत. एखादा आजार जेव्हा मानवजातीत प्रथमच समजून येतो तेव्हा पहिली वैज्ञानिक पायरी म्हणजे त्या आजाऱ्याचे बारकाईने निरीक्षण करणे. अशा अनेक रुग्णांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांची जीवनशैली आणि आरोग्य इतिहास यातून त्या आजाराच्या संभाव्य कारणांचा प्राथमिक अंदाज येतो.
मात्र, अमुक एक कारणामुळे तमुक आजार होतो, असे सप्रमाण सिद्ध करायचे झाल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणावरील शास्त्रशुद्ध संशोधन हाती घ्यावे लागते (randomised control trial, RCT). या संशोधनादरम्यान आजाराशी संबंधित मुख्य घटक समजून येतो तसेच त्या घटकावर परिणाम करणारे तब्येतीतील अन्य काही उपघटकही (confounders) विचारात घेतले जातात. असे सर्व घटक एकमेकांशी घासूनपुसून पाहिल्यानंतरच आजाराचा कार्यकारणभाव (causation) सिद्ध होतो. या सर्व प्रक्रियेनंतर विज्ञान हे मानते की ‘अ’ या घटकामुळे ‘ब’ हा आजार होतो (किंवा होत नाही).
परंतु काही आजारांच्या बाबतीत अशी वैज्ञानिक सिद्धता झालेली नसते. त्या आजारांचे अभ्यास निरीक्षण याच पातळीवर रेंगाळलेले असतात. ही संशोधनामधील अधलीमधलीच पायरी (correlation) ठरते. परंतु अनेक वृत्तमाध्यमे या महत्त्वाच्या मुद्द्याला सरळ बगल देऊन अशी अर्धवट अवस्थेतील माहिती बेधडकपणे वैज्ञानिक सत्य म्हणून सांगून मोकळी होतात.
आजाराचा कार्यकारणभाव समजून घेताना एका पूर्णपणे विरुद्ध संकल्पनेचा देखील विचार करावा लागतो. यालाच उलटा कार्यकारणभाव ( reverse causation) असे म्हणतात.
हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी एक उदाहरण पाहू :
समजा, “अ या घटकामुळे ब हा आजार होतो”
असे विधान जेव्हा आपण करतो, तेव्हा अ हा घटक किंवा घटना संबंधित माणसात आधी घडावी लागते आणि कालांतराने त्याचा परिणाम म्हणून ब हा आजार दिसून येतो.
याचे एक प्रयोगसिद्ध भक्कम उदाहरण म्हणजे, अनेक वर्ष केलेले धूम्रपान (अ) आणि फुफ्फुसांचा कर्करोग(ब).
( हे विधान 90% सत्य आहे. समजा, धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य काही कारणामुळे जरी हा कर्करोग झालेला असला तरी कर्करोग आधी झाल्यानंतर ती व्यक्ती काही धुम्रपानास प्रवृत्त होत नाही हे उघड आहे. म्हणूनच त्या 90% केसेसमध्ये अ मुळे ब होतो हा कार्यकारण भाव पक्का होतो).
परंतु उथळ आरोग्य सल्ला देणारी काही विधाने असतात त्यांच्या बाबतीत मात्र अ मुळे ब होतो असे अजिबात नसून ब हा परिणाम अ च्या आधीच घडलेला असतो. म्हणजेच, ब हा आजार अन्य कुठल्या तरी (अज्ञात) कारणामुळे आधी होतो आणि मग त्या रुग्णाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आपल्याला अ हा घटक सापडतो, जो त्या आजारानंतर जीवनशैलीत शिरलेला असतो. आहे की नाही हा उफराटा प्रकार ? ("cart-before-the-horse”).
हा नीट समजण्यासाठी आपण मानवी शरीरातील विविध आजार/बिघाड पाहू.
१.
नैराश्य : काही संशोधक असे समजतात की लठ्ठ माणसांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते. परंतु वास्तव तसे नसून बरोबर उलटे असते. कुठल्यातरी अन्य कारणामुळे व्यक्तीला नैराश्य येते. अशी व्यक्ती मग घरात सतत स्वतःला कोंडून घेते आणि टीव्ही आणि इंटरनेटमध्येच वेळ काढत बसते. त्यात रमलेले असताना वेफर्स आणि चिप्स खाण्याचे प्रमाण भरपूर राहते. तसेच व्यायामाकडेही दुर्लक्ष होते. याचा परिणाम म्हणून कालांतराने ती व्यक्ती लठ्ठ होते.
२.
चिंताग्रस्तता : कठीण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या कॉफी पिण्याच्या सवयीवरून एक गृहीतक मांडले गेले ते असे -
जे विद्यार्थी दिवसातून चार वेळा कॉफी पितात त्यांच्यात चिंतेचे प्रमाण अधिक असते. या उलट जे विद्यार्थी कॉफी पीतच नाहीत किंवा फार क्वचित पितात ते चिंतामुक्त असतात.
यानंतर शास्त्रशुद्ध प्रयोगांती लक्षात आलेले वास्तव मात्र वरील गृहीतकाच्या बरोबर विरुद्ध होते. ज्या विद्यार्थ्यांचा मुळातच चिंताग्रस्त होण्याचा स्वभाव होता, ते त्यावर उपाय म्हणून वारंवार कॉफी पीत होते असे लक्षात आले. आणि जे विद्यार्थी स्वच्छंदी होते, त्यांना मुळातच उठसूट कॉफी पिण्याची आवश्यकता वाटली नव्हती. म्हणजेच, अतिरिक्त कॉफीपानामुळे माणूस चिंताग्रस्त होत नाही.
३.
कोविड आणि ड जीवनसत्व : कोविड१९ पर्वाच्या सुरुवातीस असे लक्षात आले, की ज्या लोकांची ड जीवनसत्वाची पातळी कमी होती त्यांना झालेला कोविड गंभीर स्वरूपाचा होता. हे निव्वळ निरीक्षण होते. परंतु यावर काही संशोधकांनी घाईने मत मांडले, की ड जीवनसत्व हा कोविड सौम्य राहण्याचा उपाय होऊ शकतो.
त्यानंतर शास्त्रशुद्ध प्रयोग झाले. त्यातून असे समजले, की ज्या लोकांमध्ये ड जीवनसत्व कमी होते ते मुळातच वृद्ध, प्रतिकारशक्तीने दुबळे आणि कुपोषित होते. या सर्व घटकांमुळे ड जीवनसत्त्वाची पातळी कमी होते आणि अशा व्यक्तींमध्ये जरी ड जीवनसत्त्वाची पातळी नॉर्मल असली तरीही त्यांना झालेला कोविड तसाही गंभीर होण्याचा धोका राहतोच.
या घटनेतून confoundingची संकल्पना स्पष्ट होते. कुठल्याही एका घटकामुळे दृश्य परिणाम होत नसून जीवनशैलीतील अनेक घटकांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधातून तो आजार होतो आणि त्याची तीव्रता ठरते.
. . .
आता पुन्हा आहार आणि आरोग्य यासंबंधीच्या उथळ आणि फोल सल्ल्यांकडे येऊ. हे समजून घेण्यासाठी या लेखाच्या सुरुवातीच्या संवादांमध्ये दिलेले चॉकलेटचे उदाहरण सर्वोत्तम ठरावे. आधुनिक जीवनशैलीत भोजनोत्तर चॉकलेटयुक्त पदार्थ खाण्याची सवय आढळते. त्यामध्ये डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे काही प्रकार असतात. या संदर्भात चॉकलेटची आरोग्यासाठी भलामण करणारे संशोधन अत्यंत सामान्य स्वरूपाचे आहे. त्याची नीट चिकित्सा केली की त्यातील फोलपणा स्पष्ट होतो.
त्या प्रकारचे संशोधन असा दावा करते, की चॉकलेट खाणे हे हृदय आणि मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता यातील वास्तव बारकाईने पाहू.
चॉकलेटमधील महत्त्वाचा घटक म्हणजे कोकोच्या बिया. त्यांच्यात काही ‘अँटिऑक्सिडंट’ घटक असतात. या घटकांचे आरोग्यदायी परिणाम तपासण्यासाठी केलेल्या शास्त्रीय संशोधनांमध्ये या बियांचा शुद्ध अर्क वापरला जातो. अशा संशोधनातून सुद्धा हा अर्क हृदय किंवा मेंदूसाठी आरोग्यदायी असल्याचे निर्विवाद सिद्ध झालेले नाही.
आता दुसरा मुद्दा. चॉकलेटप्रेमी लोक काही थेट बियांचा अर्क खात नाहीत. त्यांच्यासाठी मूळ कोकोमध्ये दूध व साखर घालून चविष्ट चॉकलेट प्रकार बनवले जातात. या प्रक्रियेमुळे दोन गोष्टी होतात :
१. शुद्ध कोकोत दूध मिसळल्यानंतर त्याच्यातील अँटिऑक्सिडंट घटक निष्प्रभ होतात, आणि
२. त्यातले दूध व साखरेचे प्रमाण बघता हा खायचा पदार्थ भरपूर उष्मांकयुक्त होऊन बसतो !
वरील मुद्दे लक्षात घेता चविष्ट चॉकलेटमुळे रोगप्रतिबंधाचे फायदे होण्याची शक्यता राहत नाही.
. . .
रोगजन्य घटक आणि काही आजार या संदर्भात कार्यकारण भाव आणि उलटा कार्यकारण भाव हे दोन्ही समजून घेतल्यानंतर आता एका रोचक मुद्द्याकडे वळतो आणि तो आहे ‘ द्विदिशात्मक (bidirectional) कार्यकारण भाव’. म्हणजेच,
अ मुळे ब घडते हे जितके खरे असते, तितकेच
ब मुळे सुद्धा अ वर परिमाण होतो.
याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा यांचा संबंध. काटेकोर शास्त्रशुद्ध संशोधनातून जे निष्कर्ष निघालेत ते समजायला अगदी सोपे आहेत.
“बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढतो” हे विधान आता दोन्ही बाजूंनी तपासून पाहू
१. भरपूर बैठेपणा >>> व्यायामाचा अभाव >>> लठ्ठपणा.
२. लठ्ठपणा जर कुठल्याही उपायांनी कमी केला तर आपोआपच शारीरिक चपळता वाढते आणि बैठेपणा आपोआप कमी होतो.
या प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे उच्चरक्तदाब आणि दीर्घकालीन मूत्रपिंड विकार यांचे एकमेकांशी असलेले नाते.
उच्च रक्तदाब दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते. तसेच मूत्रपिंडाचे कार्य जसे खालावू लागते तसा रक्तदाबही वाढता राहतो.
. . .
मधुमेह, लठ्ठपणा, काही प्रकारचे हृदयविकार आणि कर्करोग इत्यादी आजार जीवनशैलीशी निगडित आहेत. त्यांची कारणमीमांसा गुंतागुंतीची असते हे वरील विवेचनावरून लक्षात यावे. जीवनशैलीतील कोणत्याही फक्त एकाच घटकामुळे (अतिरेक किंवा न्यूनता) ते होत नाहीत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या जनुकीय संरचनेबरोबरच अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आजार होण्याच्या किंवा न होण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरतो. या आजारांची कारणे अथक शास्त्रशुद्ध संशोधनातूनच सिद्ध होतात. असेच संशोधन यथायोग्य उपचारांचा पाया ठरते. अर्धवट माहिती, सामान्य निरीक्षण किंवा हितसंबंध गुंतलेल्या उद्योजकांनी प्रायोजित केलेल्या तथाकथित संशोधनातून फसवी आणि बऱ्याचदा अशास्त्रीय माहिती पसरवली जाते. त्यापासून आपण सर्वांनी सावध रहावे, हा या लेखनाचा हेतू.
******************************************************************************************************
संदर्भ :
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
. . .
* omega-3 >>> चांगला प्रश्न.
चांगला प्रश्न.
ओमेगा-3 ही एक प्रकारची मेदाम्ले आहेत. ती माशांच्या तेलांमध्ये विपुल प्रमाणात असतात. त्यांच्यामुळे रक्तातील TG या मेदाची पातळी कमी होते. म्हणून ती हृदयसंरक्षक असल्याचा दावा केला जातो. त्यांच्या जाहिरातीही भरपूर होत असतात आणि अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याविना थेट औषधी दुकानातून त्या गोळ्या घेतानाही दिसतात.
आता त्यातले विज्ञान पाहू. सुरुवातीच्या निव्वळ निरीक्षण अभ्यासामधून असे वाटले होते की यांच्या गोळ्या नियमित दिल्या असता (विशेषता मधुमेहीना) हृदयविकारापासून संरक्षण मिळेल. तसेच काही संशोधकांचा असाही होरा होता की त्यांचे सेवन कर्करोगप्रतिबंधकही ठरेल.
परंतु जेव्हा RCTचे सखोल अभ्यास करण्यात आले तेव्हा लक्षात आले की निव्वळ प्रतिबंधात्मक म्हणून त्यांचा वापर करणे अनावश्यक आहे; त्यापासून फायदा होत नाही.
https://www.nejm.org/doi/10.1056/NEJMoa1811403
https://www.nejm.org/doi/10.1056/NEJMoa1804989
जेव्हा शरीरातील ओमेगा 3च्या अभावामुळे काही विशिष्ट लक्षणे दिसतात तेव्हाच त्यांच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायच्या असतात.
धन्यवाद डॉ. समजले.
धन्यवाद डॉ. समजले.
https://marathi.indiatimes
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/health-news/navjot-singh-s...
और क्या चाहिये !!!!!!
*और क्या चाहिये !!!!!!
*और क्या चाहिये !!!!!!
>> असो !
या विषयाचा चांगला शास्त्रीय आढावा येथे आहे https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9971193/
सध्या अनेक वनौषधींचा पूरक उपचार म्हणून वापर होत असतो परंतु अजूनही अशा बऱ्याच गोष्टींचा RCT प्रकारचा सखोल अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
सामान्य निरीक्षण किंवा
सामान्य निरीक्षण किंवा हितसंबंध गुंतलेल्या उद्योजकांनी प्रायोजित केलेल्या तथाकथित संशोधनातून फसवी आणि बऱ्याचदा अशास्त्रीय माहिती पसरवली जाते.
==> थोपवली जाते, अश्याप्रकारे चिट्कवली जाते की सहज " proven facts " वाटतात .
सर, माहितीपूर्ण लेख !!!
थोडेसे अवांतर थोडेसे निगडित -
थोडेसे अवांतर थोडेसे निगडित - अतुल परचुरे यांना कॅन्सर झाला होता तेंव्हा त्यांनी होमिओपॅथीची पण उपचार घेतले होते. या व्हिडिओत त्यांचे डॉक्टर पण आहेत. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
येथे जे दावे केले गेले त्याचे पुढे काय झाले हा प्रश्न कोणी विचारत नाही. पर्यायी उपचारपद्धतीत अपयश आल्यास त्या उपचारांचा पुनर्विचार करण्याची आपल्याला सवय नाही. पर्यायी उपचारपद्धतीवाले जेंव्हा यश मिळते तेंव्हा त्याची खूप जाहिरात करतात. (भले ते यश केवळ त्यांच्यामुळे मिळाले याची खात्री नसली तरी. कारण बऱ्याचदा पर्यायी बरोबर मॉडर्न मेडिसिन ची औषधे पण चालू असतात. किंबहुना काही पर्यायीवाले "तुम्ही तेही चालू ठेवा असे सांगतात".) पण जेंव्हा अपयश येते तेंव्हा सोयीस्कररीत्या ती केस घडलीच नाही असे समजून आहे त्याच उपचारपद्धतीचा वापर व प्रसार चालू ठेवतात.
सरकारने केवळ पुराव्याने सिद्ध झालेल्या उपचारपद्धतींनाच मान्यता द्यावी. योग्य उपचार मिळणे हा रुग्णांचा अधिकार असावा असे मला वाटते.
उदा.
उदा.
जेंव्हा एखाद्याला डायबिटीस डिटेक्ट होतो, तेंव्हा त्याला कळते कि हा रोग ऍलोपॅथी औषधामुळे बारा होत नाही, आयुष्यभर गोळ्या / इंजेक्शन घ्यावे लागणार आहेत. याने फक्त शुगर कंट्रोल होणार आहे , मूळ रोग बारा होणार नाही.
तोपर्यंत त्याच्या व्हाट्सअप वर रिवर्स डायबेटीस / डायबेटीस पूर्ण बरा कसा झाला याचे धडा धड मेसेज येऊ लागतात. त्यात कडुलिंबाचा रस पिण्यापासून काही योगासने करण्यापर्यंत सगळी रेंज असते. माणसाची सायकॉलॉजि अशी असते कि याने नुकसान तर काही नाहीय ना , मग करून बघायला काय हरकत आहे. अश्या पद्धतीने लॉटरी काढलेल्या व्यक्तीला कसे वाटते असते, आपल्याल्या या वेळी नक्की लॉटरी लागणार , तसे या लोकांना आपल्याला बरे वाटणार याबद्दल वाटू लागते, त्यात पॉसिटीव्ह थिंकिंग / सब कॉन्शस माईंड यावर एखादा व्हिडीओ बघण्यात आला तर तो अगदी कॅटॅलीटीक इफेक्ट तयार होतो आणि ती व्यक्ती त्याच्या इतकी आहारी जाते कि गोळ्या / इन्सुलिन बंद करून टाकते.
शुगर चेक केली तर ती वाढते , म्हणून शुगर चेक पण केली जात नाही. यात त्यांची स्लो डेथ होत असते ती लक्षात येत नाही.
अशी उदाहरणे जवळच्या नातेवाईकांत पाहिली आहेत, सगळे उच्च शिक्षित आहेत. पण त्यांना सांगून पटत नाही. इतकी लोक फॉरवर्ड करतात म्हणजे काय चुकीचे असते काय इथपासून ते तूच लै शहाणा झालास काय इथपर्यंत ते बोलतात.
आमच्या काकांच्या पायाचे बोट कापण्यापर्यंत वेळ अली तेंव्हा त्यांच्या लक्षात आले पण लगेच माईल्ड ब्रेन स्ट्रोक पण येऊन गेला. आता गोळ्या औषधे व्यवस्तीत घेतात. साखर पूर्ण बंद केली आहे, आयुर्वेदिक औषध घेत होते तेंव्हा साखर खात होते,
आता सरकार तरी काय करणार आणि कोना कोणाला थांबवणार.
कराड मध्ये स्ट्रोक आला कि एक सो कोल्ड डॉ सलाईन मधून काहीतरी इंजेक्शन देतात , शेकडो लोकांची रीघ लागलेली असते , आणि तेथे जाऊन आलेला प्रत्येक जण खूप फायदा झाला म्हणून सांगतात. तसेच कर्नाटकात पॅरालीसीस वर उपचार करणारा एक होता आता अनेक झालेत , दवाखान्यातून बाहेर काढले कि डायरेक्त्त तिकडे नेतात. आणि येऊन त्याचा खूप फायदा झाला असे सांगतात. हे दुष्ट चक्र असेच सुरु राहणार. यात शिकलेला आणि अडाणी असा काही फरक नाही.
बरोबर आहे. चांगली चर्चा.
बरोबर आहे. चांगली चर्चा.
वरील प्रतिसादांमधून जो मुद्दा पुढे आलाय तो महत्त्वाचा असून त्याचेही शास्त्रीय संशोधन झालेले आहे :
https://jamanetwork.com/journals/jamainternalmedicine/fullarticle/2301146
निव्वळ दोन-चार रुग्णांच्या एखाद्या निरीक्षणावरून जे निष्कर्ष घाईने काढले जातात ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत. निरीक्षणात्मक अभ्यास आणि RCT प्रकारची सखोल चिकित्सा यांची तुलना केल्यावर असे लक्षात आलेले आहे, की सुमारे 50% निरीक्षणात्मक अभ्यास नंतरच्या सखोल चिकित्सेनंतर व्यर्थ ठरतात.
अजून एक , सध्या वजन कमी /
अजून एक , सध्या वजन कमी / जास्त करायला बऱ्याच आयटम चा चा खूप बोलबाला झाला आहे. तुम्हाला वजन कमी करायचा आहे ? काही करू नका , फक्त आमची औषधे घ्या, पूर्णपणे नॅचरल आहेत, कितीही खा / काहीही खा काही फरक पडणार नाही, काही पथ्यपाणी नाही. एकदा वजन कमी झाला कि आयुष्यात तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही / तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढेल त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही, वाढत्या प्रदूषणाचा तुम्ही सामना करू शकाल इत्यादी इत्यादी .... अजून नोबेल कसे मिळाले नाही याना देव जाणे, खऱ्याची दुनिया राहिलीच्च नाही.
तुम्हाला वजन कमी करायचा आहे ?
तुम्हाला वजन कमी करायचा आहे ? काही करू नका , फक्त आमची औषधे घ्या, पूर्णपणे नॅचरल आहेत, कितीही खा / काहीही खा काही फरक पडणार नाही, काही पथ्यपाणी नाही......
मोबाईलवर weight loss treatment चे मेसेजेस पाठवणारे लोक / कंपन्या असे दावे करत असतात!
सरकारने केवळ पुराव्याने सिद्ध
सरकारने केवळ पुराव्याने सिद्ध झालेल्या उपचारपद्धतींनाच मान्यता द्यावी. योग्य उपचार मिळणे हा रुग्णांचा अधिकार असावा असे मला वाटते. >> सहमत.
पण भारतात ते होणे केवळ अशक्य कारण मग फक्त मॉडर्न मेडिसिन उरेल. बाकी फडतूस Ayurveda, Yoga & Naturopathy, Unani, Siddha and Homeopathy (AYUSH) यांना आपले दुकान बंद करावे लागेल. इतकेच कशाला तुमच्या भविष्यात काय आहे, आजारपण बरे होईल का हे सांगण्यासाठी पत्रिका बघणारे, टॅरो कार्ड वाचणारे, खड्यांच्या अंगठ्या विकणारे हे पण बाराच्या भावात जातील. खुद्द मायबोलीवर अनेक सुशिक्षित अगदी आवडी आवडीने हे विषय चघळतात, तर असंख्य अशिक्षित भाबड्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? rational विचार न करणारे या जगात आहेत, तोपर्यंत alternative medicine, ज्योतिष्य आणि भंपकपणाला मरण नाही. (वेमांच्या टिपणीनुसार प्रतिसादात मूर्ख हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही.)
दर्पणी बघते मी गोपाळा...
दर्पणी बघते मी गोपाळा...
हलका फुलका आणि निरीक्षण आणि कार्यकारण भाव यातील परस्पर संबंध उलगडणारा, त्याचे महत्त्व विषद करणारा लेख. आवडला.
रच्याकने: ग्यानाबाची मेख शब्द नेहमी वापरतो, त्याची व्युत्पत्ती काय आहे? इथे किंवा इतर वाचायला आवडेल.
ग्यानबाची मेख
ग्यानबाची मेख
https://sansad.in/getFile
https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/1711/AU3984.pdf?source...
Yes, Medical Astrology has been introduced as elective course (online) in Ayurveda,
Siddha, Unani and Sowa-Rigpa curriculum.
At present no such proposal is under consideration to issue urgent instructions to the
NCISM for the withdrawal of Astrology as elective course (online).
----
माझी एक शाळा आणि कॉलेज सोबतीण आहे. माझी डिग्री बी कॉम आहे. तशीच तिचीही. दहा वर्षांपूर्वी ती शाळेच्या आमच्या बॅचच्या रियुनियनला भेटली तेव्हा तिने सांगितले की तिने एम डी नॅचरोपथी ही डिग्री correspondence course करून मिळवली. आणि ती त्यात प्रॅक्टिसही करते. " औषधे" आणि प्रसाधने विकते.
डॉ कुमार, अवांतर होत असेल तर सांगा. प्रतिसाद संपादित करायची मुदत असेल तर इथे फक्त टिंब देईन.
धन्यवाद मानव!
धन्यवाद मानव!
भरत यांनी चांगला मुद्दा
<< Medical Astrology has been introduced as elective course (online) in Ayurveda,
Siddha, Unani and Sowa-Rigpa curriculum. >>
<< तिने एम डी नॅचरोपथी ही डिग्री correspondence course करून मिळवली. >>
भरत यांनी चांगले मुद्दे मांडले आहेत.
इथे खुद्द मायबोलीवरपण एक सदस्य आहेत, ज्या स्वतःला डॉक्टर म्हणवतात. Qualification काय तर रजिस्टरर्ड डाएटीशियन , निसर्गोपचार तद्न्य, आहारतज्ञ , लेखिका ( हेल्थ-केअर रायटर ), पुष्पौषधी समुपदेशक
केवळ डाएटीशियनचा रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणून झाली डॉक्टर. :डोक्याला हात लावणारी स्मायली:
लेखावरील अभिप्राय, पूरक
लेखावरील अभिप्राय, पूरक माहितीची भर आणि छद्मविज्ञानावरील चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !
लेखावरील अभिप्राय, पूरक
दु प्र
डॉक्टर ओमेगा थ्री प्रमाणे
डॉक्टर ओमेगा थ्री प्रमाणे मल्टी व्हिटॅमिन च्या गोळ्या मनाने घेतलेल्या चालतात का? उपयोगी पडतात का?
पियू
पियू
चांगला प्रश्न.
जीवनसत्वांच्या गोळ्या या त्यांचा अभाव निर्माण झाला असतानाच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. निव्वळ टॉनिक म्हणून स्वतःच्या मनाने त्या घेणे चांगले नाही.
१३ जीवनसत्वांपैकी A, D, E, K ही चार पाण्यात विरघळणारी नसतात. त्यामुळे त्यांचा (गरज नसतानाचा) अतिरिक्त डोस हा कटकटीचा ठरतोच.
सर्व B (8) व C जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी असल्यामुळे ती मनाप्रमाणे घ्यावीत हा एक गैरसमज अनेक वर्षांपासून प्रचलित आहे, परंतु तोही चुकीचा आहे.
यासंबंधी अधिक माहिती पूर्वी जीवनसत्वांच्या लेखमालेत लेखानुसार लिहिलेली आहे (https://www.maayboli.com/node/68579)
त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद
त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टर.
https://economictimes
https://economictimes.indiatimes.com/news/india/navjot-sidhu-issues-clar...
नवज्योत सिद्धूचा यु टर्न. आता खुलासा केलाय - केमोथेरपी घेतली
खाण्यापिण्याच्या टाइमपास
खाण्यापिण्याच्या टाइमपास सल्ल्यांमध्ये ‘भरपूर’ पाणी पिण्याचे सल्ले अग्रस्थानी आहेत. अशा अशास्त्रीय दाव्यांमध्ये उल्लेख केलेले त्याचे फायदे म्हणजे त्वचा तुकतुकीत होणे, अंगात उत्साह संचारणे आणि एकंदरीतच तब्येत छान छान वाटणे, . . इ. वाट्टेल ते असतात.
या संदर्भातील शास्त्रीय अभ्यासाचे एक चिकित्सक महाविश्लेषण नुकतेच प्रसिद्ध झाले आहे (https://jamanetwork.com/journals/jamanetworkopen/fullarticle/2827021).
या अभ्यासात सुमारे 1500 संशोधनांपैकी 18 दखलपात्र ठरली. त्यापैकी 13चे निष्कर्ष विचारात घेण्याजोगे निघाले. प्रत्येक संशोधनातील सहभागींची संख्या सरासरी 200 आहे. भरपूर पाणी याचा अर्थ तहान भागल्यानंतरही ‘औषध’ या हेतूने प्यालेले जादाचे पाणी. अशा अतिरिक्त पाणी पिण्यामुळे आरोग्याच्या विविध घटकांवर झालेला परिणाम अभ्यासण्यात आला तो खालील तक्त्यात आहे :
जास्तीचे पाणी पिण्याने UTI
जास्तीचे पाणी पिण्याने UTI अर्थात युरीन इन्फेक्शन ला आळा बसू शकतो का?
पियू,
पियू,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी वर दिलेल्या तक्त्यात आलेले आहे. या विषयावरील प्रयोगांचे निष्कर्ष संमिश्र आहेत.
सर्वसाधारणपणे मूत्रदाह झाल्यानंतर औषधे चालू असताना नेहमीपेक्षा जास्त पाणी प्या हा सल्ला दिला जातो. परंतु सर्व वयोगटांमध्ये होणाऱ्या या त्रासाचा भरपूर पाणी पिल्याने खरंच प्रतिबंध होतो का, या विषयावरील RCT प्रकारचे अभ्यास अद्यापही कमी आहेत.
अनेक संदर्भ चाळले असता या पाण्याच्या सल्ल्यापुढे ? काढलेले आढळते. स्त्रियांच्या बाबतीत वयोगट रजोनिवृत्ती पूर्वीचा आहे की नंतरचा, असे काही मुद्दे विचारात घेतल्यानंतर पाण्याच्या जोडीने अन्य काही गोष्टीही कराव्या लागतात.
"Increased hydration is widely advocated for preventing UTI; however, evidence for its effectiveness is unknown".
(https://read.qxmd.com/read/31449918/increased-fluid-intake-for-the-preve...)
Diabetes, bp यासाठी रोग्यांनी
Diabetes, bp यासाठी रोग्यांनी काय उपचार घ्यायचे यावर ठाम राहावे. गप्प बसावे. आधुनिक औषधे तो रोग फक्त पुढे रेटतात बरा करत नाहीत. कारण रोग बरा करण्याची औषधं शोधली तर धंधे बसतील सर्वांचे. संशोधनाला अर्थशास्त्रीय जोड असते. नको ते संशोधन ते करतच नाहीत.
आपण आपलं हित बघावं.
आधुनिक वैद्यक न आवडणार्यांनी
आधुनिक वैद्यक न आवडणार्यांनी सुया टोचून रक्त काढू देऊ नये व त्याची तपासणी करू नये, बीपी मशीन वापरू नये, फक्त नाडीचे ठोके मोजून त्यावर निष्कर्ष काढावेत. आधुनिक वैद्यकात असलेल्या कोणत्याही चिकित्सापद्धती व यंत्रणांचा वापर करू नये.
क्राउड फंडिंग करून आपल्या आवडत्या पद्धतीतील संशोधन करून घ्यावे.
प्रतिजैविके तर मुळीच वापरू नयेत. कारण जंतू संसर्गाने आजार होतो, हेच आयुर्वेदात नाही. होम्योपथी काय म्हणते याबद्दल?
नेहेमी प्रमाणे माहितीपूर्ण
नेहेमी प्रमाणे माहितीपूर्ण लेख.
सामान्य माणसाला समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत वैद्यकीय माहिती देण्याची डॉक्टर साहेबांची हातोटी छान आहे.
आरोग्यपूर्ण जीवनासाठी आणि मुळातूनच रोग होऊ नये म्हणून आयुर्वेदातील तत्वांचा आधार घेतला तरी आजारपण आल्यास आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेणे चांगले हे वै म.
वेगवेगळ्या आजारांसाठी एकेक
वेगवेगळ्या आजारांसाठी एकेक जागतिक दिन ठरलेला आहे. त्या आजारांसंबंधी paid मजकूर वर्तमानपत्रात दिसला की हे लक्षात येतं. हे दिवस कोण आणि कसं ठरवतं? मी आता तीन आजारांबद्दलचे दिवस शोधले, ते तीनही मे महिन्यात आहेत.
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...
....
WHO, UN, UNESCO , इ.
Pages