याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/85849
'प्राजक्ता...
मी दिवस रात्र तुझा ध्यास करतोय, खूप प्रेम होतं ना ग आपलं एकमेकांवर.
आपल्या राघवला मला बेस्ट बनवायचं होतं. तुला जगातली सगळ्यात सुंदर मुलगी बनवायचं होतं. आपलं नातं जगात सुंदर झालं असतं ना?
राजा राणीचा संसार...'
तो प्राजक्ताच्या प्रेमात होता.
आकंठ प्रेमात...
इतका...की त्याला आता स्वतःची शुद्ध नव्हती.
दिवस रात्र त्याने झोपण्यात घालवले. त्याला स्वप्नात प्राजक्ता आणि राघव दिसायचे म्हणून.सगळं सोडून...
आईच्या कॉलला रिप्लाय नाही.
कुणाचेही कॉल तो उचलत नव्हता.
...मोठ्या प्रयत्नाने कमी केलेलं वजन आता पुन्हा वाढू लागलं होतं.
मात्र त्याला कशाचीही शुध्द नव्हती.
रडायचा तो...
...हताश व्हायचा. पश्चात्ताप व्हायचा त्याला...
...का? का तिला त्रास दिला आपण?
का प्रेमाची भीक मागितली? का रडलो आपण तिच्यासमोर?
मनिष का मजबूत राहिला नाहीस.
...तिच्या नजरेत तो साफ उतरला होता...
...किंबहुना तिला त्याची भीती वाटायला लागली होती. त्याच्या वेडेपणाची.
त्याचं स्वप्न, प्राजक्ता एंटरप्रायजेस, हळूहळू रसातळाला जात होतं...
...गौडा इकडे माल देऊ शकत नव्हता. मालाचा ओघ आटला होता.
*****
"खानसाहेब." एक माणूस हवेलीवर आला.
"बोल जुबेर."
"एक खबर आहे."
"काय खबर?"
"काल गंगेवर एक पोरगं मेथ विकत होतं."
"मग?"
"मी सहज चौकशी केली. किती आहे?"
"तुला हवं होतं?" खानसाहेब करड्या नजरेने म्हणाले.
"नाही खानसाहेब... पण मी शंभर ग्राम मेथ मागितलं..."
"एवढं?"
"हो. आणि त्याने आणून दिलं. पुढच्या वीस मिनिटात."
"शंभर ग्रॅम?"
"हो. नाशिकमध्ये काहीतरी भयंकर घडतय. आपल्याला थांगपत्ता लागत नाहीये."
"मी उद्याच दादासाहेबांना भेटतो.*
******
त्याचा मोबाईल वाजला.
एक मेसेज, निनावी नंबरवरून आलेला होता.
' त्या दिवशी हल्ला गौडाने केला होता.'
बस इतकाच तो मेसेज होता.
त्याला जग हलताना दिसलं.
*****
खानसाहेब वाड्यावर होते. दादासाहेब त्याच्या समोरच उभे होते.
"खानसाहेब आपलं अपयश आहे हे."
"हो दादासाहेब. पण आपलीही काही माणसे त्यांना सामील असल्याशिवाय हे शक्य नाही."
"पत्ता काढा..."
"काढला दादासाहेब..."
"कोण?"
"वसंता गौडा. सगळं तोच हॅण्डल करतोय, सातपूर मधून."
"उद्याच संपवून टाकूयात हे."
******
*का हल्ला केलात. माझं आयुष्य होती ती..."
"कारण तू वेडा झाला होतास तिच्यापायी."
"ती नाहीये म्हणून मी वेडा झालोय."
त्याने गन काढली.
"तमा, मला मारशील?"
*माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख तुम्ही हिरावून घेतलं आहे. तुम्हाला जिवंत सोडून काय करू?"
"एक बार गले लग जा, फिर मारना."
गौडाने त्याची गळाभेट घेतली, आणि त्याच्या मानेत इंजेक्शन खुपसले...
...तो जागीच बेशुद्ध झाला.
"इसको लेके जाओ, इसके दोस्त के पास. वही उसका इलाज करेगा."
त्याला घेऊन गाड्या निघाल्या.
*****
दादासाहेब फौज घेऊन उभे होते.
गौडा चार पाच लोक घेऊन बंदुका चालवू लागला...
...त्याचा पाडाव लागला नाही...
दादासाहेबांनी त्याच्या शरीराची चाळण केली, गौडा जागीच ठार झाला...
...त्या रात्री बॉम्बने पूर्ण फॅक्टरी उडवण्यात आली...
...तिकडे प्राजक्ताचा वेडा प्रियकर अजून बेशुद्ध होता...
...आणि दूर कुठेतरी निघाला होता.
क्रमशः
पूर्ण करा
पूर्ण करा
@ अजिंक्यराव - येस. पूर्ण
@ अजिंक्यराव - येस. पूर्ण करणारच आहे.