जुन्या पुस्तकांचे काय करता येईल?

Submitted by मीना१८३ on 7 November, 2024 - 06:25

माझ्याकडे NEET BIOLOGY परीक्षेच्या तयारीची अनेक पुस्तके आहेत. शिवाय काही कायदेविषयक पुस्तके देखील आहेत (टेक्स्ट बुक्स). आता घरी या पुस्तकांचा वापर करणारे कोणी नाही. त्यामुळे आता पुस्तकांचे काय करावे असा प्रश्न समोर ठाकला आहे.
सर्व पुस्तके सुस्थितीत असून नवीन / जुना अश्या दोन्ही अभ्यासक्रम संदर्भात आहे.

मायबोलीकर काही उपाय सुचवू शकतील का? पुस्तके योग्य ठिकाणी जावी अशी इच्छा आहे.Screenshot_20241107_165333_Gallery.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सांगू का ? तुम्हाला मोबदल्याची अपेक्षा नसेल तर सरळ दारावर येणाऱ्या रद्दीवाल्याला द्या. किरकोळ पैसे येतील पण एका दिवसात कपाट रिकामे, स्वच्छ!

ही पुस्तके १००% रीसायकल होतात, so they certainly go to someone who needs them.

ज्याला गरज आहे अशी व्यक्ती शोधत बसण्यात, जुनी पुस्तके विकत घेणाऱ्या दुकानापर्यंत ही जाडजूड बाडं उचलून नेण्यात फारसा अर्थ नसतो. Transport cost, our time and physical effort to carry them - Not worth the returns Happy

अनिंद्य सारखाच रिस्पॉन्स द्यायचा होता. पण माझीही अवस्र्था फार वेगळी नाही. टाकवत नाहीत आणि योग्य व्यक्ती सापडत नाही.
मार्केटप्लेसवर फुकट हवी का विचारत रहा.

जवळपास ज्युनियर सायन्स कॉलेज किंवा नीटचे क्लासेस असतील, तिथे सांगून ठेवता येईल.

Mumbai free giveaway नावाचा ग्रुप आहे. तिथे कोणीतरी रेडियोलॉजीच्या अशाच किलोने नोट्स + पुस्तकांबद्दल लिहिलंय, दोन दिवस झाले तरी अजून कोणी इच्छुक आलेला नाही अन्यथा इतर गोष्टींवर मिनिटांत उड्या पडतात.

हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्पात नीट परीक्षेची तयारी करून घेतात. त्यांना पुस्तकांचा उपयोग होईल.
त्यांना ही पुस्तकं स्पीड पोस्टाने पाठवू शकाल का?

पुण्यात असल्यास (पाहिले २):
१. अप्पा बळवंत चौकात कधी कामानिमित्त आलात तर आधी चौकशी करा आणि तेथील विक्रेते पुस्तक विकत घेणार असतील तर पुढील वेळी आलात तर पुस्तके घेऊन या
२. खंडोजी बाबा चौक (लकडी पुल) येथे काही जुन्या पुस्तकांचे विक्रेते असतात त्यांना विचारा
३. चिनूक्स यांनी सांगितले तसे संस्थेला द्या
४. रद्दी विक्रेत्यांना ही पुस्तके देणे सगळ्यात सोपा उपाय. वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. चिनूक्स यांनी सुचविल्या प्रमाणे हेमलकसा येथे संपर्क साधला.त्यांनी तुरंत प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नागपूर येथील सेंटरला पुस्तके नेऊन देण्यास सांगितले.हेमलकसाला पोहचण्याची व्यवस्था ते करतील.मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हास हेमलकसाला येण्याचे निमंत्रण दिले.सगळ्यांचे खूप खूप आभार नमस्कार.

पुस्तकांसाठी कुणी खरा गरजू व्यक्ती भेटल्यावर हायसे वाटते. टाकता येत नाही आणि जागेअभावी ठेवताही येत नाही.

पुस्तके फार साचू द्यायचीच नाही. दोन पुस्तके आल्यावर दोन घरातून जायला हवी... Happy कुणा गरजूला तरी द्यावी. पण या electronic जमान्यांत हे ओझे स्विकारणारी गरजू मंडळी दुर्मिळ होत आहे.

वा ! ७ नोव्हेम्बरला प्रश्न आणि १० नोव्हेंबर ला इशू क्लोज्ड !

Very impressed !

अनुकरणीय.

तुमचे खूप खूप अभिनंदन. कारण हे हजारो लोकांना करायचे असूनही इतके झटपट करता येत नाही.

१) पुस्तके स्वतः आणि कुटुंबियांना नको आहेत हे ठरवायला साधारण २ वर्षे.

२) मग कुणाला हवी आहेत का हे विचारूया - विचारतो - विचारले या स्टेज ला काही महिने

आणि

३) कुणालाच नको आहेत आता याचं काय करायचं या लेवलला तर कितीही दिवस-महिने-वर्ष.

सर्व ओळखीपाळखीच्या लोकांमध्ये हे महिनोन्महिने चाललेले बघतोय म्हणून तुमचा झपाटा बघून फारच आनंद झाला. पुस्तकेही योग्य जागी पोहोचली असावी एव्हाना. जय हो !

अगदी खरे बोललात, अनिंद्य.
आमच्याकडे तर खूप पुस्तके जमा झाली आहेत. मुलाने यूपीएससी करायचे म्हणून अगणित खरेदी केली, आणि आमची आधीची, मध्ये मध्ये कुणी दिलेली, विकत आणलेली.....
अधिक पोथ्या, धार्मिक पुस्तके, असंख्य स्त्रोत्रे - पाठ यांची पुस्तके, देवांचे फोटो, गणपतीचा फोटो आहे म्हणून न फेकलेल्या लग्न पत्रिका, दोन चार पाने लिहिलेल्या कोऱ्या कोऱ्या वह्या...
रद्दीत देववत नाहीत, कुणी होतकरू मुलगा पुस्तके द्यावी तर सापडत नाही....स्वतः वाचावी तर वेळ मिळत नाही!!
Happy

अनिंद्य, त्यांच्या पहिल्या पायरीत आणि इथे विचारण्यात, इथे विचारायच्या आधी इतरत्र शोध घेण्यात वेळ गेलाच असेल.

अर्थात पुस्तके सुस्थळी पडत आहेत, हे पाहून आनंद झाला.

नमस्कार. सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हेमलकसा बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून अनमोल ठेवा योग्य ठिकाणी आणि योग्य हाती पोहोचेल याची खात्री आहे.पुस्तकांच्या पसार्‍या संबंधि सांगावसे वाटत कि हा जमवलेला आणि विल्हेवाट नमस्कार लावलेला नाही तर दरवर्षीच विद्यार्थ्यांना शिकवण्या साठी घेतलेली पुस्तके आणि टेस्ट सिरीजच्या प्रश्नपत्रिका आहेत. वयोमानानुसार आवरणे आवश्यक आहे.पुन्हा एकवार सगळ्यांचे आभार.