याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/85956
रात्री एक वाजता पार्टी संपली.
गायत्री आणि तो आज हॉटेलवरच थांबणार होते. दोघांसाठी एक खास स्वीट बुक केलेला होताच.
हॉटेलच त्याचं होतं. त्यामुळे त्याला इथे काहीही करणं शक्य होतं.
आणि हा स्वीट फक्त दोघांसाठी बुक असायचा. त्यांच्या बंगल्याच्या बेडरूमसारखा हा स्वीट सजवलेला असायचा.
आता ती त्याच्या मिठीत होतं. वर एक पातळ व्हाईट चादर होती...
"...तुला टॉपिक काढायचा असेल तर काढू शकतोस."
"तुला आजच सांगायला हवं?"
"हो नाहीतर मी चिडेन आता..."
"...गायत्री... हे ऐकल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. किंवा तुला असं वाटेल की संपूर्ण जग तुझ्याभोवती फिरतय."
"असं काहीही होणार नाही."
"...होईल..."
...आणि त्याने सुरुवात केली.
*******
सुन्न...
गायत्री सुन्न होती.
कधीही कशानेही न डगमगता कायम लढाईला तयार असणारी गायत्री आज सुन्न होती.
"खरं आहे हे सगळं?"
"हो गायू."
"कसं सहन केलंस? कसा इतका शांत राहिलास?"
"ज्याक्षणी तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या क्षणापासून माझ्या आयुष्यात फक्त शांतता आहे. मी कशालाही घाबरत नाही. मला काहीही हलवू शकत नाही गायत्री...तू एकदा म्हटली होतीस, मनू कुठल्याही स्त्रीला सतत रडगाणं गाणारा नवरा आवडत नाही... त्या दिवसापासून मी रडगाणं सोडलं."
"मनू. मला फरक पडलाय रे. सगळं जगच बदलल्यासारखं वाटतय."
"नाही. काहीही बदलणार नाही. पण गायत्री, युद्ध सुरू होईल. आपल्याला सेनापती तयार ठेवावा लागेल."
"कबीर आहेच ना रेडी."
"मी कबीरविषयी नाहीये बोलत."
"मग?"
"...मी मोक्ष राजशेखर शेलार विषयी बोलतोय..."
"मनू. तू काय प्लॅन करतोय सांगशील?"
"आजची रात्र फक्त डिस्कशनमध्ये घालवणार आहेस गायत्री?"
"नाही... तू कॅफेन घेतलं आहेस?"
"हो ५०० mg. मला रात्रभर जागं रहायचंय."
"मीही घेतेय... मनू, एक गोष्ट लक्षात ठेव..."
"काय?"
"उद्या मी घरी चालत जायला नको..."
"...त्याने तिला घट्ट मिठीत आवळले, आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले..."
"त्यांचा प्रणय रात्रभर सुरूच होता."
कितीतरी उशिरा दोघेजण झोपले, आणि सकाळी त्यांना उशिरानेच जाग आली.
*****
सकाळी बंगल्यावर सर्वजण परतले.
विक्रम अजूनही झोपलेला होताच. त्याला कुणीही उठावायचं नाही असं त्याच्या आजीने सगळ्यांना बजावलं होतं.
"...गायत्री आणि त्याची आई एका खोलीत बसलेली होती."
"आई."
"हो."
"काल ती आली होती."
त्याची आई विषण्ण हसली...
"...सॉरी गायत्री."
"नो...नो... त्याने मला सांगितलं होतं."
"गायत्री जेव्हा त्याने मला तिच्याविषयी सांगितलं होतं, तेव्हा काळजात एक कळ गेली होती ग. एक लग्न झालेली बाई, आणि तिचा मुलगा... तिच्यासाठी हा वेडा झालाय?
मग मी मन घट्ट करून त्याच्या बाबांना सांगितलं, तिचं जरी दुसरं असेल, आपल्या मुलाचं पहिलं लग्न असेल. सो अगदी धूमधडाक्यात व्हायला हवं... तुमचा येणारा नातू हा कायम सुखाच्या राशीत लोळला पाहिजे...
...नाही झालं.
आणि जेव्हा तू आलीस. बीलीव मी, त्याच्या आयुष्यात सगळ्यात काही चांगलं घडलं असेल, त्याचं सगळ्यात सुंदर स्वप्न म्हण, किंवा इच्छा म्हण पूर्ण झाली असेल, ती तू होतीस गायत्री..."
गायत्री हसली.
"आई. मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही, आणि लपवत देखील नाही. माहितीये ना?"
"हो."
"मग आज मन घट्ट करून ऐका."
"काय?"
"त्याला माहितीये, त्याला सगळं माहितीये..."
त्याच्या आईचा चेहरा पडला.
"इतकी मोठी गोष्ट तू इतक्या सहज सांगतेय?"
"कारण त्याने देखील मला इतक्या सहजच सांगितली. मीदेखील सुन्न झाले. मीदेखील थोडावेळ भांबावले...पण त्याचं आयुष्य बघता, हेदेखील इजी वाटलं. नका चिंता करू, काहीही बदलणार नाहीये. उलट जे होईल, ते छान होईल. नाती अजून बळकट बनतील, घट्ट होतील...
...आणि हो, तो त्याच्या आईसाठी काहीही करू शकतो, हे कायम लक्षात ठेवा."
त्याच्या आईने गायत्रीला न राहवून मिठी मारली.
*****
त्याचा सासरा आणि तो बसलेला होता.
"चेन्नई आणि कोचीन पोर्टची रेनेवल आली आहे." ते म्हणाले.
"डोन्ट वरी, विनिंग बीड माझीच असेल."
"यावेळी जैन जोर लावेल."
"हो पण त्यालाही मर्यादा आहेत. गुजरात त्याला सांभाळू देत."
"तुम्ही तिघेही चांगला बॅलन्स ठेवतायेत. जैन कधीही मुंद्राला रीचेस्ट एशियन मध्ये ओवरटेक करेल..."
"...ज्या स्पीडने गायत्री पळतेय ना, ती या दोघांना ओवरटेक करेल." तो हसला. "पण मला ते नकोय. कुठेही मीडियाच्या नजरेत येऊन मला माझा बिजनेस खराब करायचा नाही."
"...हा बीजनेस नाही, साम्राज्य आहे." सीके म्हणाले.
"एक अदृश्य साम्राज्य. तो म्हणाला. चलायचं?"
दोघेजण उठले.
आत मीटिंग भरलेली होती.
"कबीर, तरन, सीके आणि अमित सर, चौघेजण बसलेले होते."
गायत्री देखील हजर होती.
"थॅन्क्स फॉर कमिंग. होप रात्रीची उतरली असेल."
ते हसले.
"आज थोडं बोलू. थोडी रिविजन ओके?"
इतरांना काही कळत नव्हतं.
"सुरुवातीला आपलं कोर प्रॉडक्ट होतं मेथ. प्युर मेथ. त्यानंतर आपण कोकेन, मरियुएना, एलएसडी, सगळच बनवायला लागलो.
टुडे अवर एम्पायर इज वर्थ फिफ्टी बिलियन डॉलर्स. आपल्या आफ्रिकेत आठ फॅक्टरी आहेत आणि रशियात अकरा. ब्राझील मध्ये एक, मेक्सिकोत एक, इटलीत एक आणि नाशिकमध्ये एक.
शेलारांची बंदुका बनवायची फॅक्टरी बघून मीदेखील त्या बिजनेसमध्ये पडलो. गायत्रीने त्याला डिफेन्स अँड एरोस्पेस बनवलं. प्राजक्ता एंटरप्रायजेस आज साठ बिलियन डॉलर वर पोहोचलं आहे, तरीही कुणाला थांगपत्ता नाही. गायत्रीने लीगल काम करून देखील मला ओवरटेक केलं. मी अजून किती प्राऊड व्हायला हवं?"
तो हसला.
"अजूनही लोक म्हणतात, नाशिक फक्त शेलार चालवतात. का? मोक्ष शेलार नाशिकला येऊन किती वर्षे झालीत?
तीन वर्षे.
पहिल्या वर्षातच त्याने माझी फॅक्टरी उडवली, राईट? दीड वर्षात त्याने लग्न केलं शरावतीशी.
...आणि तेव्हापासून मी त्याला मारण्याचा विचार सोडला."
"माझ्या बंदुका रेडी होत्या दादा. तुम्ही तेव्हा मला थांबवलंत."
"पॉवर बॅलन्स बिघडला असता नाशिकचा."
"लेम एक्सक्युज..." गायत्री म्हणाली. "तू त्याला फक्त यासाठी सोडलंस की तो शरावतीचा नवरा आहे म्हणून."
"...गायत्री." तो विषण्ण हसला.
"माझं ना असं झालंय, की सगळं जग जिंकून जीव नाशकात अडकलाय...
...असो, मीटिंग यासाठी, की आपण सगळे कोर मेंबर आहोत. डिसिजनची वेळ आली आहे."
"कोणता डिसिजन?" अमित सरानी विचारले.
"टू अपॉइंट अ न्यू कमांडर...अँड न्यू काँकरर...
काँकरर रेडी आहे, कमांडरला रेडी करावं लागेल.
गायत्री इज युवर न्यू काँकरर, एमआरव्ही इज नो मोअर...
...आणि नवीन कमांडर रेडी करा,
मोक्ष शेलार."
तो उठला. आणि निघूनही गेला.
...आणि गायत्री त्याच्या खुर्चीवर बसली.
"तुम्हाला सगळ्यांना एक स्टोरी सांगते...
स्टोरी... नाशिकमध्ये घडलेली.
स्टोरी... नाशिकचा इतिहास बदलणारी.
स्टोरी... मोक्ष शेलार, दादासाहेब शेलार आणि मुमताजची...
स्टोरी एका अज्ञातवासीची! पहिल्या अज्ञातवासीची..."
तिने सांगायला सुरुवात केली.
गायत्रीने संगितलेली कथा इथे!!!!
©अज्ञातवासी! - आरंभ
https://www.maayboli.com/node/77125
©अज्ञातवासी! - भाग २ - प्रवेश
https://www.maayboli.com/node/77129
©अज्ञातवासी - भाग ३ - शेवटची भेट!
https://www.maayboli.com/node/77137
©अज्ञातवासी - भाग ४ - वेताळ!
https://www.maayboli.com/node/77152
©अज्ञातवासी - भाग ५ - सहा भुते!
https://www.maayboli.com/node/77156
©अज्ञातवासी - भाग ६ - वेताळ आणि सहा भुते!
https://www.maayboli.com/node/77161
©अज्ञातवासी - भाग ७ - नायक!
https://www.maayboli.com/node/77171
©अज्ञातवासी - भाग ८ - अपहरण!
https://www.maayboli.com/node/77188
©अज्ञातवासी - भाग ९
https://www.maayboli.com/node/77201
©अज्ञातवासी - भाग १० - द बर्निंग चेयर!
https://www.maayboli.com/node/77204
©अज्ञातवासी! - भाग ११ - गंगापुत्र!
https://www.maayboli.com/node/77251
©अज्ञातवासी! - भाग १२ - संशयकल्लोळ
https://www.maayboli.com/node/77267
©अज्ञातवासी - भाग १३ - पिंगळ्याची भेट!
https://www.maayboli.com/node/77286
©अज्ञातवासी! - भाग १४ - पिंगळ्याची भेटवस्तू व नवा वेताळ!!!
https://www.maayboli.com/node/77293
©अज्ञातवासी! - भाग १५ - समाप्त!
https://www.maayboli.com/node/77353
©अज्ञातवासी - भाग १६ - नवीन सुरुवात!
https://www.maayboli.com/node/77385
©अज्ञातवासी - भाग १७ - नवी गणिते!
https://www.maayboli.com/node/77421
©अज्ञातवासी! - भाग १८ - मुमताज!
https://www.maayboli.com/node/77470
©अज्ञातवासी! - भाग १९ - वो कौन थी?
https://www.maayboli.com/node/77543
©अज्ञातवासी! - भाग २० - आग आणि बर्फ!
https://www.maayboli.com/node/77598
©अज्ञातवासी! - भाग २१ - गोळीबार
https://www.maayboli.com/node/77652
©अज्ञातवासी! - भाग २२ - MRS 76!
https://www.maayboli.com/node/77776
©अज्ञातवासी - भाग २३! - रहस्यभेद!
https://www.maayboli.com/node/77928
©अज्ञातवासी - भाग २४! - जुनी गणिते, नवीन खेळ!
https://www.maayboli.com/node/78040
©अज्ञातवासी - भाग २५! - जुळवाजुळव
https://www.maayboli.com/node/78052
©अज्ञातवासी! - भाग २६ - खेळ सुरू!
https://www.maayboli.com/node/78102
©अज्ञातवासी!! - भाग २७
https://www.maayboli.com/node/78162
©अज्ञातवासी! - भाग २८!
https://www.maayboli.com/node/78213
©अज्ञातवासी - भाग २९ - प्रेमवेडे!
https://www.maayboli.com/node/78262
©अज्ञातवासी! - भाग ३०!
https://www.maayboli.com/node/78358
©अज्ञातवासी - भाग ३१ - रात्र वैऱ्याची आहे!
https://www.maayboli.com/node/78381
©अज्ञातवासी! - भाग ३२ - रात्रीस खेळ चाले!
https://www.maayboli.com/node/78527
©अज्ञातवासी - S2E01 - तयारी!
https://www.maayboli.com/node/80439
@अज्ञातवासी - S2E02 - मृतात्म्याचे मनोगत!
https://www.maayboli.com/node/80454
©अज्ञातवासी - S02E03 - फैसला...
https://www.maayboli.com/node/82778
©अज्ञातवासी S02E04 - राखीपौर्णीमा!!
https://www.maayboli.com/node/82797
©अज्ञातवासी S02E05 - जुनी खुर्ची, नवा सम्राट!
https://www.maayboli.com/node/82822
©अज्ञातवासी S02E06 - चाल!
https://www.maayboli.com/node/82829
©अज्ञातवासी - S02E07 - नाशिक!
https://www.maayboli.com/node/82831
©अज्ञातवासी - S02E08 - नाशिक - २
https://www.maayboli.com/node/82838
©अज्ञातवासी - S02E09 - अग्नये स्वाहा!
https://www.maayboli.com/node/82843
©अज्ञातवासी - S02E10- पाच भुते!
https://www.maayboli.com/node/82848
©अज्ञातवासी - S02E11- चार भुते!
https://www.maayboli.com/node/82857
©अज्ञातवासी - S02E12- सीजन फिनाले
वाचतेय. मस्त सुरुये
वाचतेय. मस्त सुरुये
अज्ञात वासी series वाचली नाही.
जरा वेळ द्या वाचते
काल दातांच्या डॉक्टरकडे नंबर
काल दातांच्या डॉक्टरकडे नंबर यायला एक तास लागला .. हाताशी वेळ होता तेव्हा कथेचे सगळे भाग वाचले. कथा चांगली सुरु आहे ..
अज्ञातवासीचे भाग आधी वाचले आहेत .. तुमची पाटील VS पाटील ही कथा नाही वाचली अजून ..
ह्या कथेत सगळ्या कथांतल्या पात्रांची सरमिसळ जाणवते .. त्यामुळे लिंक लागायला वेळ लागेल ..
वैयक्तिक सल्ला : यापुढे मनाला आणि विचारांना मळभ आणणाऱ्या दुष्टचक्रात अडकण्याची चूक करू नका .. लेखनशैली उत्तम आहे .. खूप छान मालिका होतील तुमच्या कथांवर .. लेखन कौशल्याला पुढे वाव मिळेल यासाठी प्रयत्न करा.. सतत लेखन करणं खरंतर कठीण काम आहे पण तुम्हांला ते लीलया जमतंय ..
पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा ..!
@किल्ली - धन्यवाद. नक्की वाचा
@किल्ली - धन्यवाद. नक्की वाचा
@रुपाली विशे पाटील. - You know. You know.