©वाइल्डलाईफ! - भाग ८ - सोबती!

Submitted by अज्ञातवासी on 6 November, 2024 - 02:54

याआधीचा भाग!

https://www.maayboli.com/node/85950

"आम्हाला वेळ देत जा ना."
एक स्त्री समोर उभी होती.
सायली पटवर्धन. एक अतिशय प्रगतशील शेतकरी...
...किंबहुना यशस्वी उद्योजिका सुद्धा. शेतीच्या कामासाठी अतिशय कमी वयात पद्मभूषण मिळालेली.
"तुला विसरलो मी."
"हो विसरलास. पण मी कशी विसरू देईन?"
"सॉरी सॉरी सॉरी."
"इट्स फाईन." तिने त्याची गळाभेट घेतली. "हॅपी बर्थडे दादा."
"थँक्यू छोटी." त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला.
"गायत्रीकडे जातेय आता. आम्हाला थोडं बोलायचं आहे पुढच्या डेव्हलमेंट साठी."
"येप्प."
ती निघूनही गेली.
काही ' नातीगोती ' देवच बनवतो.
*****
तो एका माणसाकडे गेला. तो बाकीच्यांना काहीतरी सांगत होता.
त्याच्या सोबत मिहिर होता...
"...दादा नको ना."
"थांब रे." तो म्हणाला.
त्याने त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला, आणि तो माणूस मागे वळला.
मागे वळताच त्याने दोन्ही हात बॉक्सिंगच्या पवित्र्यात घेतले...
"..डोन्ट फॉर्गेट रशिया मिस्टर मोहन..." तो म्हणाला.
दोन्ही हात मागे घेऊन.
"यू चीटर..."
...हरलेले लोक असच म्हणतात.
"पुन्हा एक राऊंड?"
"नाही. माझा भाऊ लढेल आता. मिहिर..."
"...दादा. तुम्ही दोघेजण माझे भाऊ आहात."
"होऊ दे की मग, ' पाटील v/s पाटील. ' तो म्हणाला.
"गप. तुम्हाला फक्त मारामाऱ्या करायच्या असतात. जरा तुमच्या मुलांचा आदर्श घ्या, सुप्रिया आणि विक्रम किती छान खेळत असतील..."
...ही होती सोनाली पाटील, मोहनची बायको.
*****
एक जोडपं बसलेलं होतं. शांत, निवांत.
तो त्यांच्याकडे आला.
"तू जगलास. अरे व्वा, छान!"
"अरे सगळेजण हेच का म्हणताय?"
"तुझे उद्योग बघितले, तर खरच हेच म्हणायला हवं."
"गौरी मी काय केलय असं?"
"मला निम्हांस चा चांगला जॉब सोडून इथे नाशिकला कुणी बोलावलं?"
"तू एका सेशनचे पाच हजार घेतेस. आणि माझ्याकडून दहा हजार."
"एक लाख घ्यायला हवेत. तू गेलास ना, माझे पुढचे सेशन घ्यायची हिम्मत होत नाही."
"प्रकाश. सांभाळ हिला."
"हो सांभाळतो. पण तू प्लीज सेशनला दुसरी सायकॉलॉजीस्ट शोध ना."
"सांभाळ हिला, गरज आहे मला हीची..." तो बेदरकारपणे म्हणाला.
*****
स्नेहल देखील एक ग्लास घेऊन उभी होती. सोबत मनू होता.
"कसा आहेस." तो मनूजवळ गेला." शेवटी स्नेहलने तिचा मनू शोधलाच."
"तो आधी आला आहे, तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तो." स्नेहल म्हणाली.
"मनू कॉलेजमध्ये हीचा एकच प्रश्न असायचा, तू माझ्यावर का प्रेम करत नाहीस. फक्त शरावर का?"
"आणि तुझं उत्तर काय असायचं?"
"माझं उत्तर असायचं... प्रेम एकदाच होतं आयुष्यात..."
"असं? किती चुकीचा होतास ना तू?"
"हो मान्य आहे होतो. बरं हाऊ इज बिजनेस गोइंग ऑन."
"प्राजक्ता एंटरप्रायजेस आणि पाटील स्टील... दोन इतक्या मोठ्या फर्म असल्यावर मला टेंशन नाही.
...आणि मिहिरची पीआर सुद्धा. हे विसरू नकोस." स्नेहल म्हणाली.
"थॅन्क्स स्नेहल." तो म्हणाला.
"का रे?"
"माझी मैत्रीण असल्याबद्दल. आणि तू, माझा मोठा भाऊ असल्याबद्दल."
"मी कायम असेन रे. तू नीट वाग. छोटा मनू..."
पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू उमटलं.
******
एक लांब नाकाची, उंचपुरी, गोरी स्त्री उभी होती.
गायत्रीच्या शेजारी.
"गायत्री... अभी भी दर्द होता है."
"क्यू?" तिने विचारले.
"तूने मेरा शौहर चुरा लिया."
गायत्रीने तिला गुद्दा मारला...
"सच में. मेरी शादीमें तुम लोग मिले नहीं होते तो?"
"फिर भी वो तुम्हारा नही होता. क्यूकी हम मिले ही तुम्हारी शादीमे थे..."
"मी लग्न तोडायचा तयारीत होते."
"गुड, नाही तोडलं. नाहीतर हा प्राणी सहन करावा लागला असता."
"फक्त प्राणी की बीस्ट," तिने डोळा मारला.
"...यू विल नेव्हर नो तनाज," गायत्री हसली.
******
एक अकरा बारा वर्षांचा मुलगा.
आणि त्याची आई.
दोघेजण उभे होते.
तो तिच्या जवळ आला, आणि तिला कडाडून मिठी मारली.
त्याचे डोळे आता भरून आले होते...
"...माझ्या छोट्या भावा." तिचेदेखील डोळे भरून आले.
"डेव्हिड. हाऊ आर यू बेटा."
"आय एम फाईन अंकल." तो मुलगा म्हणाला.
"यू शुड. आणि मॉमला जास्त त्रास द्यायचा नाही. कळलं?"
"येस अंकल."
"दीदी. तुला खूप मिस केलं सकाळपासून मी." "अरे मी स्नेहल, शरा सगळ्यांना भेटले आधी जाऊन. मला बंगल्यावर यायचं होतं पण..."
"...मग आली का नाहीस."
"आज रात्री येते रे. गडबड असेल काल खूप..."
"...दीदी, तू आलीस असतीस तर छान झालं असतं ना? सगळेजण भेटले असते."
"मनू... मी फक्त तुला भेटायला आले रे. माझ्या भावाला. ज्याने मला..."
"गप्प बस. जुन्या आठवणी काढशील, तर फक्त त्रास होईल."
"कधीकधी ती रात्र आठवते, मॅजेस्टिकच्या पुलावर..."
"शांत. पार्टी एन्जॉय कर ओके?" तो म्हणाला. "आणि रात्री बंगल्यावर जाऊयात. रितूला तिची ज्युलीदीदी भेटायला हवी." तो म्हणाला.
"नक्की रे."
"आज डोळ्यात अश्रू नको दीदी. हो सकाळी मीही माझ्या सिनियरच्या आठवणीत रडलो... एक ना एक दिवस मीही त्याला भेटेन. पण आज नको रडायला. तोदेखील स्वर्गात बघून बघत असेल, त्याचा मनू किती मोठा झाला..."
"येस." ती भारावून म्हणाली.
*****
"याला इथून बाहेर काढा."
एक माणूस चिकन टिक्का तोंडात टाकत होता.
"अरे. मिहिर. तू केव्हा आलास."
"पार्टी मीच दिलीय. तू केव्हा आलास?"
"केव्हाचा, दादाचा डान्स भारी होता ना?"
"असं?"
"हो. मी बघितला."
"याला प्लीज बाहेर काढा. हा माणूस मला डोळ्यासमोर नकोय. "
"अरे बस कर बाबा."
"काय बस कर? अज्ञातवासी पार्ट तीन ची स्क्रिप्ट कधी लिहितोय? अजून मी प्री प्रोडक्शन ही स्टार्ट नाही केलं रे."
"तुला ना हाव सुटलीय मिहिर, त्या ' चंदेरी ' जगाने तुझ्यावर भुरळ घातली आहे. त्यात तू मला महाभारताचीदेखील स्क्रिप्ट लिहायला सांगतोय."
"मग?"
"मग काय? माझं डोकं चालायला हवं ना. त्यात माझी बायको, ती देखील सीए ची प्रॅक्टिस सोडून लिखाण करायचं म्हणतेय."
"गुड. मी तिच्याकडूनच लिहून घेईल मग."
"जा जा, कॉलेजला असताना तू वचन दिलं होतं मला, की माझ्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाची स्क्रिप्ट तू लिहिशिल."
"ओके. मग अज्ञातवासी पार्ट ३ लवकर लिही."
"ओके..."
... मिहिर तिथून निघून गेला.
अज्ञातवासी त्याच्याकडे बघत राहिला...
*****
मनू पाचव्या फ्लोअरवर आला.
तिथे एका हॉलच दार उघडं होतं.
तिथे एक स्त्री बसलेली होती.
अडतीस वयाची...
...लांब नाकाची, क्लेफ्ट चीन असलेली, काळ्याभोर डोळ्यांची, गोबऱ्या गालांची.
"प्राजे, तू मला प्रॉमिस केलं होतं ना? की मी कॉलेजची प्राजक्ता बनेन असं."
"नाही जमलं." ती म्हणाली.
"तुझ्यासाठी मी बनलो होतो."
"कळलं होतं मला. पण काय करू, भीती होती तू पुन्हा वेडा होशील."
"झालोच होतो." तो हसला.
"मी दीड वर्ष फाईट करत होतो. स्वतःशी. त्यानंतर तुझा रिप्लाय आला नाही, पुन्हा दोन तीन महिने फाईट करण्यात गेले."
"का इतका वेडा होतास? आय मीन मी तेव्हाही जाड होते, चेहरा काळवंडला होता, ढीगभर स्ट्रेच मार्क्स होते... एका मुलाची आई होते."
"एकेकाळी प्राजक्ता, एक राधा होती. एक मोहन होता. दोन्हीही रंग रूपाने बदलले होते. मन तेच राहिलं होतं ना? तू म्हटली होतीस, मी उष्टी पत्रावळ आहे, मी कुठेही टाईट नाही, मला ते हवं होतं?
माझ्यासाठी तु देवाचा नैवेद्य होतीस. मला फक्त माझी प्राजक्ता हवी होती... मला माझा राघव हवा होता. तू खूप खुश हवी होतीस."
"...मनिष..."
त्"याला कधीच संपवलं मी, प्राजक्ता. नंतर फक्त वेड होतं, तुझ्या स्वप्नातला मनू बनण्याच. तो आला, तू नव्हतीस. पण मनू राहिला..."
."..एकदा असं वाटलं होतं, सगळं सोडून तुझ्या जवळ यावं. नाही जमलं..."
"....आणि मी सगळं सोडून गेलो होतो तुझ्यासाठी... फक्त तुझ्यासाठी."
थोडावेळ कुणीही काही बोललं नाही.
"पुढच्या जन्मात नक्की... ओके?" मनूच म्हणाला.
...कितीतरी दिवसांनी आज तो तसं हसला. अगदी लहान मुलासारखा.
"मनू खळी पडते रे." ती म्हणाली.
""बाय प्राजक्ता. गायत्री वाट बघत असेल. तिला तिचा नवरा नाशिकला असला तर क्षणभर नजरेआड झालेला चालत नाही." तो उठला. तीदेखील...
आज तब्बल दहा वर्षांनी ते भेटले होते.
...त्याची प्राजक्ता त्याच्या चाळीसाव्या वाढदिवसाला आली होती.
*****
तो निघाला. तीदेखील.
"...झाली भेट मनू?" गायत्रीने त्याला विचारले.
हो गायत्री.
"पुन्हा वेडा होशील ना आता? तिच्यासाठी?"
"वेडा होईन मी, पण... फक्त तुझ्यासाठी"
सर्वांसमोर त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.
...ती चकित झाली.
"आय लव यू गायत्री." तो म्हणाला.
...आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावरचं तेज द्विगुणित झालं.
खरच, गायत्री जगातली सर्वात सुंदर मुलगी होती...
...आणि तो जगातला सगळ्यात बेस्ट प्रियकर, मित्र आणि नवरासुद्धा...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक ट्री बनवा.. आणि प्रत्येक व्यक्तीरखे संदर्भात जे लिहिलं असेल मायबोलीवर त्याची लिंक द्या

फक्त स्वतःसाठी लिहित असाल तर छान चाललय..

वाचकांसाठी कथा म्हणून लिहित असाल, तर आम्हा सामान्य वाचकांना तुमच्या आधीच्या पूर्ण अपूर्ण कथा, त्यातील पात्रे व त्यांची ही सरमिसळ आता कळेनासी व त्यामुळे कंटाळवाणी होऊ लागली आहे. तुमच्या लिहिण्याची पद्धत अगदी निराळी व उत्कंठा वाढवणारी आहे त्यामुळे नवीन भाग आला कि उत्साहानी वाचायला येतो पण कुठेतरी कथानक नीट सांगा ना. आठ भाग झाले तरी सगळं कसं भव्य दिव्य, अफाट पण बेकायदेशीर कर्तुत्व, वेड्या आशिकाचे परिवर्तन, त्याचे १० नातेसंबंध आणि एकावर एक कुरघोडीचे संवाद एवढच परत परत चालू आहे. यापुढे कंटाळा आल्यामुळे लोक वाचेनासे होतील... हे माझे वैयक्तिक मत. इतर वाचक असहमत असू शकतात.
तुमच्यावर टिका करण्याचा हेतू नाही पण वाचक म्हणून अभिप्राय नोंदवावासा वाटला. शुभेच्छा !!

फक्त स्वतःसाठी लिहित असाल तर छान चाललय..

वाचकांसाठी कथा म्हणून लिहित असाल, तर आम्हा सामान्य वाचकांना तुमच्या आधीच्या पूर्ण अपूर्ण कथा, त्यातील पात्रे व त्यांची ही सरमिसळ आता कळेनासी व त्यामुळे कंटाळवाणी होऊ लागली आहे. तुमच्या लिहिण्याची पद्धत अगदी निराळी व उत्कंठा वाढवणारी आहे त्यामुळे नवीन भाग आला कि उत्साहानी वाचायला येतो पण कुठेतरी कथानक नीट सांगा ना. आठ भाग झाले तरी सगळं कसं भव्य दिव्य, अफाट पण बेकायदेशीर कर्तुत्व, वेड्या आशिकाचे परिवर्तन, त्याचे १० नातेसंबंध आणि एकावर एक कुरघोडीचे संवाद एवढच परत परत चालू आहे. यापुढे कंटाळा आल्यामुळे लोक वाचेनासे होतील... हे माझे वैयक्तिक मत. इतर वाचक असहमत असू शकतात.
तुमच्यावर टिका करण्याचा हेतू नाही पण वाचक म्हणून अभिप्राय नोंदवावासा वाटला. शुभेच्छा !!>>>>>
100%
मी तर सगळंच वाचतोय त्यांचं मायबोलीवरील लिखाण तरी देखील लिंक लागत नाय पुरेशी
मी अज्ञातवासी यांच्या लिखाणाचा चाहता आहे,पण फारच क्लिष्ट लिहीत चाललेत असं वाटतं

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

खरं सांगायला गेलं, तर प्लॉट खूप खूप खूप मोठा आहे, या जन्मात पूर्ण होईल का नाही माहिती नाही.
पण...

मोहन पाटील आणि सोनाली पाटील म्हणाल तर - पाटील vs पाटील मध्ये आला आहे.
मनू आणि स्नेहल - संततधार आणि अंमली मध्ये स्नेहल आली आहे.
मिहिर - चंदेरी मध्ये येईल.
बाकी जे कुणी आहेत, ते अंमली आणि अज्ञातवासीच्या पुढच्या भागात येतील.
सो... वाचत राहा. प्रत्येक गोष्टीची लिंक लागेल.
आफ्टर ऑल, अज्ञातवासी काहीही विसरत नाही, आणि काही बाकीही ठेवत नाही.