याआधीचा भाग
https://www.maayboli.com/node/85945
"दादा. केक इथेच कापूयात? सगळेजण तर वर येणार नाहीत."
"...सगळ्यांनी ऐका रे." तो म्हणाला.
"अपोलो हॉलमध्ये तुमच्या पार्टीची व्यवस्था केली आहे. तरन आणि कबीर माझ्या सोबत हायेस्ट हॉलमध्ये थांबतील. सिक्युरिटी म्हणून कमी घ्यायची असं आजिबात करायचं नाही आणि जास्त घ्यायची असंही नाही...
...रायफल जवळ ठेवा. आणि कुठल्याही सिच्युएशनसाठी रेडी रहा."
"ओके दादा."
"गुड. केक आणा."
एक छोटासा केक आणला गेला.
...आणि पुढच्याच क्षणी गायत्री अक्षरशः वेडीपिशी झाली.
"कुणी हा मेसेज लिहिला केकवर? कुणी. मूर्ख... अक्कल गहाण ठेवली आहे का सगळ्यांनी? मनू..."
....त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता.
...एक आत्यंतिक वेदना त्याच्या चेहऱ्यावर होती.
"...भाभी सॉरी..." तरन अक्षरशः रडायच्या बेतात होता.
"तलवार आण."
"काय?"
"तलवार."
"तलवार नाहीये भाभी..."
₹गायत्री. माझ्या कुऱ्हाडी आहेत गाडीत." तो सुन्नपणे म्हणाला.
ती धावतच गाडीजवळ गेली.
आणि तिथून कुऱ्हाडी घेतल्या...
"...बाजू व्हा."
सर्वजण बाजूला झाले.
आणि पुढच्याच क्षणी तिने केकवर घाव घालायला सुरुवात केली...
...केकच्या अक्षरशः चिंध्या झाल्या होत्या.
तिने त्याला घट्ट मिठी मारली.
तो हसला. त्यातही ती सुखावली.
तिच्या केसातून त्याचा हात फिरत होता. तिची आश्वासक नजर त्याला सुखावत होती.
"सर्वजण तोंड का पाडून बसलेत?" त्याने विचारले?
"तुमची भाभी आणि मी आज डान्स फ्लोर वर आग लावणार आहोत. चला..."
...मळभ दूर गेलं होतं.
...आणि आता पुन्हा एक उत्साह संचारला होता.
पार्किंगमधून पाच जण लिफ्टमध्ये आले.
आणि वरच्या हॉलमध्ये निघाले.
"दादा कोणत्या गाण्यावर डान्स करणार?" मिहिरने शांतता भंग करत विचारले.
तो काहीही बोलला नाही..
...तो हॉलच्या आत येताच एक जल्लोष झाला, आणि त्याने हात वर करताच शांतता पसरली.
तेवढ्यात इलेक्ट्रिक गिटारवर एक धून वाजली.
हमिंग चालू झालं...
...गायत्री आणि त्याने दोघांनी शूज काढून ठेवले, आणि ते डान्स फ्लोअरवर गेले.
...क्षणार्धात डान्स फ्लोअर रिकामा झाला.
आता फक्त मनू आणि गायत्री, दोघेजण फ्लोअर वर होते...
बेखयाली में भी तेरा ही ख्याल आये
क्यूँ बिछड़ना है ज़रूरी ये सवाल आये.
त्याने तिला मिठीत घेतलं,
तेरी नजदीकियों की ख़ुशी बेहिसाब थी
हिस्से में फासले भी तेरे बेमिसाल आये
आता तो तिच्या मागे होता.
मैं जो तुमसे दूर हूँ क्यूँ दूर मैं रहूँ तेरा गुरुर हूँ.. आ तू फासला मिटा तू ख्वाब सा मिला क्यूँ ख्वाब तोड़ दूं...
त्याने अक्षरशः तिला उचलून घेतलं होतं, तीदेखील तशीच त्याला साथ देत होती, आणि तो स्वतःभोवती वर्तुळाकार फिरत होता.
ये जो लोग बाग हैं जंगल की आग हैं क्यूँ आग में जलूं..
आये नाकाम प्यार में खुश हैं ये हार में इन जैसा क्यूँ बनूँ
दोघेजण अक्षरशः एकजीव होऊन थिरकत होते.
कित्येक वर्षापासून ते सोबत नाचत होते, मात्र आजपर्यंत एकदाही त्यांच्या नाचात चूक झाली नव्हती.
नज़र के आगे हर एक मंजर रेत की तरह बिखर रहा है
दर्द तुम्हारा बदन में मेरे ज़हर की तरह उतर रहा है
पुन्हा त्याने तिला वर उचलून घेतलं होतं, आणि शेवटी तिला हळूवारपणे खाली उतरवलं.
दोघांचे डोळे एकमेकात गुंतले...
...आणि टाळ्यांच्या कडकडाट झाला.
"गाणं संपलं सर." साक्षी म्हणाली.
"साक्षी तुझं डीमोशन करेन मी." गायत्री तिच्याकडे न बघता म्हणाली.
"यू कान्ट." तुलाच माझी जास्त गरज आहे. साक्षीही बेफिकीरपणे म्हणाली.
"तर हाच तो घोस्ट आहे का?" एका कोपऱ्यात उभा असलेला मोक्ष शरावतीला विचारत होता.
हो...
"...ही इज मासिव..." त्याच्या तोंडातून अनाहुत शब्द बाहेर पडले.
"बघ आणि तू स्वतःला खूप मजबूत समजतोस."
"मी एकावेळी वीस जणांना एकहाती संपवू शकतो शरा. त्याच्यामध्ये आहे का हिम्मत? जस्ट फिजीक बनवून काही नाही होत."
"अरे. रिलॅक्स हो बरं."
तेवढ्यात तो वर गेला...
"...तुम्ही सर्वजण इथे जमलात. खूप आनंद झाला. आज मी चाळिशी पूर्ण करतोय. जे माझ्यासाठी स्वप्न आहे."
"मला सिरीयसली वाटत नव्हतं मी जगेन. मग माझ्या आयुष्यात एक डॉक्टर आली. डॉक्टर गायत्री. जिने मला आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं...
...आणि नंतर तिचं माझं आयुष्य बनली. छान ना?"
गायत्री हसली.
"माझ्या या प्रवासातले सगळे सोबती इथे जमलेले आहेत. थॅन्क्स. तुमच्या सोबतच आयुष्य मी जगलोय, यापुढेही जगेन.
लोक म्हणतात चाळिशीनंतर आयुष्य बदलतं. मला नाही वाटत. गायत्री आणि मी तर दिवसेंदिवस डीएज होतोय, आणि आय फिल, माझा परफॉर्मन्सदेखील बेस्ट आहे.
सो गाईज. थॅन्क्स फॉर कमिंग. एन्जॉय द पार्टी."
ग्लास उंचावले गेले.
तो खाली उतरला.
*****
"थॅन्क्स फॉर कमिंग शरा." तो खाली उतरत म्हणाला.
"तू चाळिशी गाठलीस, हेच मोठं आश्चर्य आहे." ती म्हणाली.
"साक्षी... आजतरी ऑफिसचं काम बाजूला ठेवून आली आहेस ना?"
"हो सर."
"गुड."
"मिस्टर मोक्ष... हाऊ आर यू?" तो मोक्षकडे बघून हसला.
मोक्ष त्याच्याकडे बघत राहिला.
"आय एम गुड. जस्ट तुमच्या ताफ्यामुळे थोडं लेट झालं."
"आय एम सॉरी फॉर दॅट. जर मला माहिती असतं तर मी आधी तुमच्या गाड्या पुढे जाऊ दिल्या असत्या. आफ्टर ऑल, वी कॅन नॉट अफॉर्ड टू मेक शेलार वेट." तो म्हणाला.
...आणि मोक्ष थोडासा चकित झाला.
एकतर जशी त्याची ख्याती होती तसा तो अजिबात नव्हता. अगदी प्रेमाने जवळच्या मित्राशी बोलावं असं तो बोलत होता.
"मि. मोक्ष, सॉरी आपली याआधी भेट नाही झाली. दादासाहेब शेलार यांनीच प्राजक्ता एंटरप्रायजेसच्या पहिल्या ऑफिसचं उद्घाटन केलं होतं. माझे वडील राजेश विद्याधर आणि ते मित्र होते."
मोक्षला एक प्रसंग आठवला.
"मी ओळखतो त्यांना." तो म्हणाला.
"मला सगळे दादा म्हणतात. आय थिंक तुम्हालाही म्हणतात... आता आपण एकमेकांना दादा म्हटलं, तर कन्फ्युजन होईल. म्हणून आय रिक्वेस्ट, मी वयाने मोठा आहे तुमच्यापेक्षा. मला दादा म्हटलं तरी चालेल. तसही माझं माझ्या लहान भावांवरच प्रेम जगजाहीर आहे." तो मिहीरला जवळ ओढत म्हणाला...
"...चालेल दादा." मोक्ष म्हणाला. "पण मग लहान भावाला अरे कारे केलं तरी चालेल."
"दॅट्स माय बॉय." त्याने मोक्षला मिठी मारली. अचानकच...
आजपासून मला तुझा मोठा भाऊच समज.
... एकाच क्षणात मनूने मोक्षला आपला लहान भाऊ बनवलं होतं...
...शरावती आणि गायत्री दोघांकडे बघत होत्या.
मोक्षदेखील कुठेतरी हलल्यासारखा झाला...
...कारण त्याला सगळं मिळालं, तरी मोठ्या भावाचं प्रेम अजून मिळालं नव्हतं.
एन्जॉय द पार्टी भावा. भेटू पुन्हा. तो म्हणाला आणि तिथून निघूनही गेला.
गायत्रीही हसून निघून गेली.
शरा. मोक्ष म्हणाला. यांच्याविषयी माझं थोडं चुकीचं मत केलं तुम्ही दोघीजणीनी असं नाही वाटत तुला?
मोक्ष. त्याला कुणीही ओळखू नाही शकत. मी मिस नाशिक होते कॉलेजला असताना. तरीही सगळं कॉलेज दीदी शिवाय हाक मारायचं नाही. कारण हा होता, माझा बॉयफ्रेंड.
...याचा राग ना अख्या कॉलेजमध्ये फेमस होता. सहा महिने रेस्टीकेट केलं होतं त्याला, निम्मी कॅन्टीन तोडून फोडून ठेवली होती म्हणून...
...मी लेट झाले होते एकदा, तर सरळ पूर्ण ज्यूसचा ग्लास त्याने डब्यात फेकला होता... कितीतरी वेळ त्याच्या हातात हात घेऊन समजवावं लागलं. शेवटी माझीही मर्यादा होती रे... हा नाही सुधारला. याचा राग, याचा अहंकार वाढत गेला आणि शेवटी मीच बाहेर पडले. मोक्ष हा खूप खूप वेडा आहे. तो मला त्रास होईल असं काहीही करत नव्हता, कॉन्टॅक्ट देखील नाही, पण नंतर कळलं तो सगळा राग स्वतः वर काढत गेला.
...मोक्ष त्याच्या आयुष्याच्या सगळ्यात बेस्ट, आणि सगळ्यात वर्स्ट फेजमध्ये मी त्याला बघितलं आहे. पण आय थिंक, सगळ्यात बेस्ट फेज आता सुरू झाली आहे. म्हणून तो इतका शांत आहे.
शरा. इतकं कसं माहिती तुला?
कारण मोक्ष, एकेकाळी माझा सगळ्यात जवळचा मित्र हाच होता. तुझ्याशी लग्न करण्याच्या आधी मी यालाच विचारलं होतं.
सिरीयसली?
हो रे. तो कितीही वेडा असला तरीही सल्ले बेस्ट देतो. फक्त स्वतः वर अंमलात आणू नाही शकत.
मोक्ष हसला.
अजब रसायन आहे...
...माझ्यासाठी रडलाय तो, अगदी लहान मुलासारखा. खूपदा सावरलं त्याला मी. पण शेवटी माझाही अंत झालाच रे.
समजू शकतो. मोक्ष म्हणाला.
जर त्याच्यासारखा भाऊ तुला मिळणार असेल ना मोक्ष, भाग्य समज. कारण या दादाच्या नावावर त्याचे लहान भाऊ कॉलेजमध्ये सेफ असायचे.
मोक्ष हसला. सकाळपासून असलेलं मळभ दूर झालं होतं....
तिकडे तो अजून काही लोकांशी बोलत होता.
मिहिर गायत्रीजवळ आला.
"भाभी."
"बोल मिहिर."
"त्या केकचा इतका राग का?"
गायत्री दोन मिनिटं शांत राहिली.
"कारण त्या केकवर त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूच नाव लिहिलं होतं...
हॅपी बर्थडे मनिष दादा!!!"
क्रमशः
छान फ्लो ठेवलाय कथेचा...
छान फ्लो ठेवलाय कथेचा...
"कारण त्या केकवर त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूच नाव लिहिलं होतं...
हॅपी बर्थडे मनिष दादा!!!"
>>>>> हे नाही समजलं
चांगल चाललंय !!
चांगल चाललंय !!
केक शराने आणला का दादा लिहून ?
@ आबा - धन्यवाद
@ आबा - धन्यवाद
@अनघा - धन्यवाद
पुभाप्र पुलेशु
पुभाप्र पुलेशु