Submitted by sneha1 on 3 November, 2024 - 15:34
नमस्कार,
मला काही प्रश्न विचारायचे होते. एखाद्या इन्ग्रजी भाषेतील पुस्तकाचा अनुवाद करायचा असला, तर मूळ लेखकाची / प्रकाशकाची अनुमती मागणे वगैरे कोणाला करावे लागते? अनुवाद करणारा लेखक, की जो पुस्तक प्रकाशित करणार आहे तो प्रकाशक? अनुवाद करणार्या लेखकाला काही खर्च करावा लागतो का?
अजून काही माहिती असल्यास सांगा प्लीज.
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या अनुवाद प्रकाशित
एखाद्या अनुवाद प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेशी संपर्क साधावा. कारण तुम्ही परवानगी जरी मिळवली तरी अनुवाद झाल्यानंतर करायचे संस्कार, म्हणजे एडिटिंग, प्रूफिंग, मुखपृष्ठ आणि छपाई व नंतर मार्केटिंग आणि वितरण हे सर्व आपापले करणे अवघड असते.
अनुवादाचे व्यवहार प्रकाशक
अनुवादाचे व्यवहार प्रकाशक करतो.
तुम्ही लेखकाशी संपर्क साधला तरी तो / त्याचा एजंट तुम्हाला प्रकाशक कोण, असं विचारतील.
धन्यवाद सहेली आणि चिनुक्स.
धन्यवाद सहेली आणि चिनुक्स. पुस्तक अनुवादित करायची इच्छा तर आहे, पण बाकीच्या गोष्टी काहीही माहित नसल्यामुळे गोंधळ होतो आहे खरा!
स्नेहा, तुमच्या मनात असलेल्या
स्नेहा, तुमच्या मनात असलेल्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा!
एडिटिंग-प्रूफिंगची वेळ येईल तेव्हा नक्की संपर्क साधा. गेली अठरा वर्षे हेच काम करते आहे.
धन्यवाद सहेली. त्या लेव्हल ला
धन्यवाद सहेली. त्या लेव्हल ला गोष्टी गेल्या तर नक्की सांगेन तुम्हाला .