याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/85940
तो बाहेर आला.
मिहिर, आर्या, सीके आणि वंदना सीके. सर्वजण अजून तिथेच होते.
"नमस्कारा सर!" त्याने त्यांच्या पायांना स्पर्श केला.
"तू असा वाकताना चांगला नाही दिसत. तुला सवय नाही ना म्हणून."
तो शांत राहिला.
"नमस्कारा मॅडम." त्याने त्याच्या सासूला वाकून नमस्कार केला.
त्यांनी हसून आशीर्वाद दिला.
मिहिर आणि आर्या, दोघेजण उभे राहिले.
"तुम्ही दोघेजण असेच उभे राहणार की?"
त्या दोघांनी धावत जाऊन त्याला मिठीच मारली...
...तो कॉलेजच्या दिवसापासूनच मिहिरचा दादा होता.
...आणि आर्याचा जवळचा अण्णा. त्या दोघांमध्ये एक वेगळीच बाँडींग होती.
"तुझी मैत्रीणदेखील आलीये आज."
"रितू?"
"येस."
"सगळेच आले आहेत की काय?"
"हो." गायत्री म्हणाली. "चला जेवण करून घ्या, संध्याकाळची तयारी करायची आहे."
"ओके डॉक." आर्या म्हणाली.
सर्वजण आपापल्या खोलीत गेले.
"बाबांशी बोललास का तू?"
"अरे विसरलो. खरच."
"मनू..."
"...नाही जातोय मी. लगेच."
तो वर गेला.
गायत्री आता कितीतरी वेळाने रिलॅक्स झाली होती.
******
"विक्रम."
"हो बाबा..."
विक्रम छानपैकी एक डिझायनर कुडता पायजमा घालून बसला होता.
"चल पूजेची तयारी करुयात. मिहिर अंकलला, ओम अंकलला आणि दोन्ही आजोबांना बोलव."
तो धावत गेला.
देवघरात नऊ चौरंग मांडले होते.
मधल्या चौरंगावर लक्ष्मीची एक सोन्याची मूर्ती होती.
...आजूबाजूला चांदीच्या समया तेवत होत्या.
मध्येच नागवेलीच्या पानांवर दोन सुपाऱ्या व हळकुंड ठेवले होते.
तो पूजा मांडू लागला.
तेवढ्यात विक्रम सर्वांना घेऊन आला.
"...बाबा. बसा."
मी कशाला?
"अहो बसा. तुमच्यासारखी पूजा इथे कुणाला मांडता येत नाही."
त्याचे बाबा हसले आणि पूजेला बसले.
"मिहिर. ओम, विक्रम चला." तो म्हणाला.
ते तिघेजण त्याच्या सोबत निघाले.
तो एका रूमसमोर गेला. तिथे एक थंब स्कॅनर होता.
"विक्रम."
विक्रमने तिथे अंगठा टेकवला.
आणि एक अवजड लोखंडी दरवाजा उघडला गेला.
...आत बघून सर्वांचे डोळे विस्फारले.
सोन्याच्या, चांदीच्या विटा, नोटांच्या थप्प्या...
अफाट, अगणित पैसा...
"चला थोडं पूजेला नेऊ."
...सगळ्यांनी अक्षरशः मनाला वाटेल ते उचललं, आणि पूजेला घेऊन गेले.
"सर, तुम्हीही पूजेला बसा." त्याने विनंती केली.
सीकेदेखील बाजूला पूजेला बसले.
कितीतरी वेळ मांडामांड चालू होती.
शेवटी पूर्ण पूजा मांडून पूर्ण झाली.
*****
गुलाबी खास कांचीपुरमहून मागवलेली साडी. त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज पण त्यावर सोन्याच्या बारीक नक्षीकाम.
तिने केसांचा घट्ट अंबाडा बांधला. त्यावर रोशनीने एक सोन्याचीच झालर चढवली.
गळ्यात शाही हार. आणि कंबरेला सोन्याचा कंबरपट्टा...
...पायात चांदीचे न वाजणारे पैंजण.
तिने लाल रंगाच्या पाण्यात पाय बुडवले. तेच पाय एका कापडावर ठेवले...
...पायांच्या कडा लाल झाल्या.
दीदी.
बोल रोशनी.
"प्लीज इतना खुबसुरत मत दिखिये. प्लीज, सबकी नजर आपको लग जाएगी."
ती जीवघेणी हसली...
'रितू आणि आर्या बघ तू," त्यांनाही नजर लागेल.
"नही दीदी, सॉरी. आपके जैसा कोई नही."
"चलायचं?"
"हो."
पूजा मांडून झाली होती. आरतीची वेळ झाली होती.
"आजचा आरतीचा मान कुणाला? त्याने आईला विचारले."
"सर्वात छोट्या जोडीला." ती म्हणाली.
"...मिहिर आणि आर्या."
दोघे आनंदाने पुढे आले, आणि त्यांनी आरतीचं तबक हातात घेतलं...
...सुखकर्ता दुःखहर्ता सुरू झाली.
तो नेहमीप्रमाणे शेवटी उभा होता. शेजारी गायत्री उभी होती.
त्याने तिच्या खांद्यावर मान टेकवली, तिने प्रेमाने त्याच्या गालावर हात लावला...
...कितीतरी वेळाने आज तो हसला होता. अगदी मनापासून.
त्याचा संपूर्ण परिवार त्याच्या सोबत होता. काहीजण त्याच्या कर्माने आले होते, काहीजण जन्माने, पण आज हे सर्वजण त्याच्या सोबत होते...
...तो अनेक लढाया लढला आणि जिंकला देखील.
आरती संपली.
जयघोष सुरू होता.
*****
विक्रम फटाके फोडत होता...
मिहिर आणि आर्या, रितू आणि ओम, सगळे मनसोक्त फटाके फोडत होते.
आई बाबा, त्याचे सासू सासरे, सर्वजण मागे एका खुर्चीवर बसून गंमत बघत होते.
हा सर्वात शेवटी बंगल्याच्या पायऱ्यांवर बसला होता. गायत्री त्याच्या शेजारीच होती.
त्याने पुन्हा एकदा तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं.
"थकलास का रे खूप?"
"हो ग."
"काय झालं असं? सगळं मनातच ठेवशील का?"
"गायत्री ही पार्टी कॅन्सल करायची?"
"अरे." ती शॉक झाली.
"मनू. असं वेळेवर कुणाकुणाला परत पाठवशील?"
"सगळे आपलेच आहेत ना?"
"हो, पण तू बाहेरचे देखील ऍड केलेत ना?"
त्याच्याकडे उत्तर नव्हतं.
"मनू..."
"बोल ना."
"झोप थोडावेळ असच. माझ्या मांडीवर डोकं ठेऊन."
त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. ती त्याच्या केसातून हात फिरवत होती.
"लेट्स चेंज गायत्री." आपल्याला पार्टीला जायचंय...
...चल उठ मग.
"वेट. मिहिर, आर्या." त्याने आवाज दिला.
ते दोघेजण त्याच्या जवळ आले.
"एक विचारायचं होतं."
"हो विचार ना."
"पुढचे वीस दिवस, तुमचं काही शूट वगेरे?"
"अजिबात नाही. अज्ञातवासीने अजून स्क्रिप्ट रेडी नाही केली आहे. टाईमपास करतोय. नुसता. आज पार्टीला येणार आहे ना तो?"
"हो बोलवलं आहे त्याला."
"आर्या व्हॉट अबाऊट यू?"
"यू नो माय थंब रुल, सो... मिहिर इज नॉट बीजी, मीसुद्धा नाहीये."
"दादा. स्क्रिप्ट मध्ये काही ऍड करायचं? म्हणजे काही सांगण्यासारखं?"
"हो. एकच गोष्ट ऍड करायची आहे."
"कोणती."
"दुबईचं युद्ध..."
...मिहिर शांत राहिला.
"दादा, मला ऑस्कर मानससाठी मिळालं. मानस नागरेच्या कॅरेक्टर साठी."
"ओके. मग?"
"पण ते ऑस्कर हँडसम मानस साठी नाही, तर फॅट मानस साठी मिळालं..."
"...त्याच्या छातीत कळ गेली."
"अनीका आणि मी तो सिन शूट करत होतो, सिन कट झाला, आणि अनीका मला म्हटली..."
"...मिहिर, माझ्यावर कुणी इतकं प्रेम केलं असतं, तर मी आयुष्यभर त्याच्या सोबत राहिले असते. मग तो कसाही असला तरी."
तो हसला...
"...आयुष्य वेडेपणा नसतं मिहिर. नाहीतर मानसची कथा अनुराधा गेल्यानंतरच संपली असती."
...मिहिरदेखील हसला.
"आर्या. विक्रम जर वीस दिवस तुम्हा दोघांसोबत राहिला तर इश्यू नाही ना."
"झालंय ना आपलं बोलणं? मग का पुन्हा."
"अग विचारतोय."
"नका विचारू. आणि विक्रम आम्हाला वीस दिवस नाही, तर आयुष्यभर हवाय..."
"तो तुमचाच आहे. मी जस्ट एक केयरटेकर आहे."
"काय चाललय तिघांचं?" रितू मध्येच येत म्हणाली.
"विक्रम यांच्यासोबत जातोय थोडे दिवस."
"त्यापेक्षा एलएला का पाठवत नाही मग?"
"तिथे आम्ही तिघेजण सोबत येऊ... चालेल?"
"नाही. मला विक्रम पाहिजे फक्त."
"बरं. पुढच्या दिवाळीच्या सुट्या तुझ्याकडे. ओके?"
"बघ हं."
"हो माझी सिस्टर. आणि काय गं? माझी भाची का आणत नाहीस?"
"कारण तिला यायचं नसतं ना, म्हणून..."
"मामाची आठवण येत नाही का तिला?"
"तसं नाही रे, त्यांच्या या काळात खूप वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत. तिचं म्हणणं आहे, मोठी होऊन ती मामासारखं प्लेन उडवणार..."
"...तिला सांग तिचा मामा क्रॅश लँडिंग चा एक्सपर्ट आहे..."
...ती जोरात हसू लागली.
"दीदी. तू आज का शांत आहेस?" आर्याने विचारले.
"...तुझे अण्णा बोलताहेत ना, म्हणून."
"तुला त्यांनी बोललेलं आवडत नाही का?" तिच्या स्वरात खट्याळपणा डोकावला.
"त्याने माझी परमिशन नाही घेतली ना, म्हणून." गायत्री म्हणाली.
"आर्या माझ्यासाठी एक करशील?" तो म्हणाला.
"बोला ना अण्णा."
"आज प्लीज, गायत्री चिडेल असं काहीही करू नकोस."
सॉरी अण्णा.
"इट्स फाईन. शी इज जस्ट टायर्ड टुडे."
"आय कॅन अंडरस्टँड." ती म्हणाली.
"चला, पार्टीला निघूयात."तो म्हणाला...
"...हो, आम्हीदेखील तयार होतो." मिहिर म्हणाला.
"रितू आणि ओम. तुम्ही आई बाबांबरोबर थांबा. आर्या तूसुद्धा. मिहिर तू फक्त सोबत ये."
"दादा पण?"
"या पार्टीला फक्त मी, गायत्री आणि मिहिर जाणार आहोत. गायत्री, लेट्स गेट रेडी."
त्याच्यासोबत गायत्री निघाली...
...दोघेजण वर आले. त्याच्या बेडरूममध्ये गेले.
तिने त्याचा हात पकडला.
"शांत हो. कळलं? अगदी शांत... मी आहे ना? पार्टी संपू दे एकदा, मग तू मला मिठीत घे. अगदी घट्ट, आणि सांग, काय झालंय नेमकं."
"गायत्री."
त्याने न राहवून तिचा एक डीप किस घेतला,
कितीतरी वेळ दोघांचे ओठ ओठात होते. कितीतरी वेळ त्यांचा जिव्हा एकमेकांशी खेळत होत्या.
ती बेडवर पडली, तो तिच्यावर होता.
तिच्या मानेपासून, बेंबीपर्यंत तो चुंबने घेत होता...
...तिचे स्पष्ट उसासे त्याला ऐकू येत होते.
आणि आता हळूहळू तो बेंबीच्या खालीदेखील सरकत होता.
तो तिथे पोहोचल्याची तिला जाणीव झाली.
...तिच्या अनुप सुंदरतेचं तो रसपान करत होता...
हळूहळू गायत्री मुक्त होत होती...
क्रमशः
मस्त चालू आहे. एकदम स्पीड
मस्त चालू आहे. एकदम स्पीड पकडला आहे.
छान भाग!
छान भाग!
फक्त ते ऑस्कर ऐवजी फिल्मफेअर असतं तर जास्तं पटलं असतं
छान भाग!
छान भाग!
@bhakti - थॅन्क्स
@bhakti - थॅन्क्स
@आबा - थॅन्क्स. ते ऑस्कर प्रकरण पुढे येणार आहे.