मातृत्वाचा शृंगाररस
चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार
कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान
ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ
हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार
अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन
गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान
कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम
कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार
तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार
विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण
जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस
कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार
मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक
मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल
आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक
स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ
- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस
मद्य-भक्षूला वेधून घेते
मद्य-भक्षूला वेधून घेते
खंब्यासोबत चारमिनार
............
काही ओळी समजल्या नाहीत तरी कविता आवडली
@सामो, धन्यवाद
@सामो, धन्यवाद
@स्वाती_आंबोळे, कवितेचा अर्थ जाणून घेण्याची शिगेला पोचलेली तुमची उत्कंठा बघून कविता सफल झाल्यासारखे वाटत आहे. कवीला आणखी काय पाहिजे असते?
@ऋन्मेऽऽष, मला माहित आहे की ती ओळ पूर्णपणे तुम्हाला उलगडलेली आहे. आता सर्वांना ती ओळ उदाहरणासहित सविस्तर समजून सांगाच लोकांना.
@सॉक्स, धन्यवाद
@सॉक्स, धन्यवाद
मद्य-भक्षूला वेधून घेते
खंब्यासोबत चारमिनार ...... लई भारी
प्रचलित शब्दच जोडले आहेत>>
प्रचलित शब्दच जोडले आहेत>>
त्वाध्यालास की म्याध्यालो?
असे?
अभय,
अभय,
अजून लोकांना लाऊ देत अर्थ. घाई नाहीये.
(उगाच मला लागलेला अर्थ चुकला तर मारलेल्या फुशारक्या अंगाशी यायच्या )
बाई दवे,
एका शब्दावर अख्खी कविता समजणे न समजणे, आवडणे न आवडणे, हे सारे अडले नाहीये.
लोकं उगाच तो एक शब्द पकडून बसले आहेत.
पण मला मायबोलीचे हेच आवडते
बाई दवे क्रमांक दोन,
माझी इंजीनियरिंग झाली तेव्हा आता सारखे हातात मोबाईल आणि गूगल नव्हते. त्यामुळे कित्येक इंग्लिश शब्दांचे अर्थ डोक्यावरून जायचे जे कधीच समजले नाहीत. पण त्या शब्दांनी काही अडले नाही. त्यांच्याशिवाय देखील सुखासुखी इंजिनीयर झालो
येनी वेज,
ती ओळ स्किप करून सुद्धा कविता छान आहे. चर्चा तिथेच अडून धागा भरकटू नये अशीच इच्छा.
त्वाध्यालास की म्याध्यालो?
त्वाध्यालास की म्याध्यालो?
तू आधी आलास की मी आधी आलो. इतके वाक्य जर थोडक्यात बोलता येत असेल तर त्याचे स्वागतच असायला पाहिजे. ज्या भाषा पंडितांना असे संक्षिप्त मराठीचे रूप चालत नाही त्यांना मात्र इंग्रजी मधलं can't चालते.
@ऋन्मेऽऽष
@ऋन्मेऽऽष
तुम्हाला नेमका अर्थ गवसला आहे याची मला खात्री आहे. कारण एकतर अर्थ लागणार नाही आणि लागला तर चुकणार नाही. असे ते वाक्य आहे.
थोडक्यात गूढ वगैरे काही अर्थ
थोडक्यात गूढ वगैरे काही अर्थ नसून एकच अर्थ आहे आणि तो चारचौघांत सांगण्यासारखा नाही. तो अर्थ कवीला सांगायला तर हवाय पण स्वतः न सांगता इतरांनी कथन करावा अशी अपेक्षा दिसते आहे.
बाकी मी फक्त शारीर नसून हाडामासाची असल्याने लैंगिक अवयवांव्यतिरिक्त माझे इतर अवयवही वाढले आहेत. जे असायचेच. पण हे सांगायला आणि नेहेमीचं स्त्री गुणगान गायल्याने फीलगुड वाटून स्त्रीसमतेच्या युद्धातील माझा आजचा चेकमार्क करुन झाला असं जगाला सांगताना पुढे ढकलायला हुकमी कविता आहे.
जिजाबाई आणि अहिल्या म्हटल्यावर मृणाल कुलकर्णी आणि पंकजा मुंडे मला पण आठवतात. बाकी कविता वाचून हाती काही पडलं नाही. इतके प्रतिसाद बघुन उघडली तर इतकं फिक्सेटेड होण्यासारखं काही दिसलं नाही. सध्या स्त्रीशक्ती चलतीत आहे... जागराला जरा उशीरच झाला पण व्हॉट्सअॅपवर होईल अजुन कॅशइन.
एवढा लांबलतच प्रतिसाद बघून
एवढा लांबलचक प्रतिसाद बघून वाचायला हाती घेतला तर "थोडक्यात गूढ वगैरे काही अर्थ नसून एकच अर्थ आहे आणि तो चारचौघांत सांगण्यासारखा नाही." ह्या वाक्या खेरीज हाती अन्य काहीच पडलं नाही.
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
@अमितव
@अमितव
<<< सध्या स्त्रीशक्ती चलतीत आहे >>>
युगोनयुगे स्त्री शक्तीचीच चलती आहे, तीच सृष्टीची जनक आणि पालक आहे पण तिच्या मातृत्वाचा आणि ममत्त्वाचा पद्धतशीर गैरफायदा घेऊन संरक्षणाच्या नावाखाली पुरुषांच्या पुरुषी शक्तीची चलती झाली आहे.
फिट्टंमफाट!
फिट्टंमफाट!
येनी वेज,
येनी वेज,
ती ओळ स्किप करून सुद्धा कविता छान आहे. चर्चा तिथेच अडून धागा भरकटू नये अशीच इच्छा. >> एव्हढी इच्छा आहे तर अर्थ सांग म्हणजे लोक होतील मूव्ह ऑन.
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार > ह्यात मी पहिल्या शब्दावर पण अडकलो आहे . जर चौथ्या शब्दाचा अर्थ जो वाटतो तो असेल तर हृदय मधेच कुठे आले ते कळत नाही. जर लिटरल अर्थ घेतला नाही तर चक्षू कशाला ते कळत नाही.
हृदय-चक्षूंना वेधून घेते
हृदय-चक्षूंना वेधून घेते
>>>>
ह्रदय आणि चक्षु (डोळे) दोघांना वेधून घेणारी असा मला अर्थ वाटला. नमनमिनार मात्र समजले नाहीये. काहीतरी "पोझीशन" आहे काय असे वाटले.
@असामी
@असामी
कवीने आपलीच कविता उलगडून दाखवणे किंवा तिचे अर्थ सांगणे निषिद्ध मानले जाते.
पण
कविता कळण्याऐवजी अनेकांच्या समोर कवितेने नुसतेच प्रश्न उभे केल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी अर्थ सांगणार नाही व उलगडूनही दाखवणार नाही, त्याऐवजी थोडीफार माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो.
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार
हृदयाच्या डोळ्यांना "काहीतरी" वेधून घेत आहे . ... अशी ती पहिली ओळ आहे.
कोणती वस्तू / दृश्य / प्रतिमा हृदयाच्या डोळ्यांना वेधून घेत आहे... हे "काहीतरी " दुसऱ्या ओळीत आले आहे.
ओळ लिहायची तर खरी, पण
ओळ लिहायची तर खरी, पण ‘वाचकांना न कळली तर बरं’ असं लाजून म्हणायचं या प्रतिभेच्या चमनमिनाराला माझं नमन.
सदर कवीला देवनागरी लिपी नीट वाचता किंवा लिहिता येत नसावी. माझं नाव ‘आंबोळी’ असं मुद्दाम चुकीचं लिहिण्याइतके ते खवचट नसावेत असं आपलं माझ्यातल्या मातृशक्तीला वाटतंय. त्यांना नीट लिहिता येवो असा आशीर्वाद!
ओह. आता समजले बहुतेक.
ओह. आता समजले बहुतेक.
@कॉमी,
@कॉमी,
प्रतिसादाबद्दल आभार. तुमचा प्रतिसाद थोडा आधी आला असता तर माझा वरील @असामी यांना दिलेला प्रतिसाद मला टाळता आला असता .
असो.
[तन्मीलनाच्या वेळी जिचे नमन केले जाते/आपोआप नमन होते / जिथे माथा झुकतो तो टॉवर किंवा तन्मीलनाच्या प्रारंभ वेळी ज्या टॉवरला स्पर्श करून (प्रारंभी नमन करून) कार्यारंभ सुरु होतो ते टॉवर) हा शब्दशः अर्थ नसून केवळ त्रोटक माहिती आहे.
हृदय-चक्षूंना वेधून घेते....
हृदय-चक्षूंना वेधून घेते....
हृदयाच्या डोळ्यांना "काहीतरी" वेधून घेत आहे . .
>>>
अच्छा तुम्हाला हृदयाच्या डोळ्यांना असा अर्थ अभिप्रेत होता का, त्या ऐवजी मी हृदय आणि डोळ्यांना असा अर्थ घेतला होता.
अर्थात त्याने काही फरक पडला नाही म्हणा..
@स्वाती_आंबोळे,
@स्वाती_आंबोळे,
मी आपला चार ठिकाणी उल्लेख केलाय पण तिथे चूक झाली नाही. एका वाक्यात लिहिताना तशी चूक झालेली आहे. आपण आधीच माफी दिली असल्याने माफी न मागता आभार मानतोय.
@ऋन्मेऽऽष
@ऋन्मेऽऽष
हृदयाच्या डोळ्यांना आणि हृदय व डोळ्यांना असे दोन्ही अर्थ निघतात. दोनपैकी तुम्ही घेतलाय तो अर्थ जास्त तंतोतंत आहे.
मी व्याकरणात ढया आहे हे १ ३ वर्षांपूर्वीच्या माबोकरांना पक्के ठाऊक आहे. मला वाटते तुमचा माबोप्रवेश नंतरचा आहे.
हृदय-चक्षूंना = हृदय व डोळ्यांना
हृदयचक्षूंना = हृदयाच्या डोळ्यांना
असे काहीसे बहुधा असेल ते .
बरोबर
बरोबर
मधल्या आडव्या दांडीमुळे मी तो अर्थ घेतला.
काहीच स्पेस दिली नसती दोन शब्दात तर तुम्ही म्हणता तो अर्थ घेतला असता.
बाकी मी मराठीच नाही तर इंग्लिशमध्ये सुद्धा तितकाच ढ आहे. सुदैवाने हे फार कोणाला माहीत नाही
हृदय-चक्षूंना म्हणजे हृदय व
हृदय-चक्षूंना म्हणजे हृदय व डोळ्यांना असा अर्थ मी घेतला होता म्हणून वरची शंका होती. तुम्हाला "हृदयाच्या डोळ्यांना "काहीतरी" वेधून घेत आहे." हे अपेक्षित असेल तर मधला - काढून टाकला तर कंफ्यूजन दूर होईल. "तन्मीलनाची नमनमिनार" मधे पण असेच काहितरी खटकते आहे. संधी अथवा समास नीट बसत नाहीये.
@ऋन्मेऽऽष
@ऋन्मेऽऽष
मी @कॉमी यांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्रोटक माहिती दिली. तुम्ही लावलेल्या अर्थाशी मेळ लागतोय का ते सांगा .
अभय हो.. मेळ लागतोय
अभय हो.. मेळ लागतोय
@असामी,
@असामी,
हृदय व डोळ्यांना हेच तंतोतंत आहे त्यामुळे मधला - काढून टाकायची गरज नाही.
"तन्मीलनाची नमनमिनार" यात मात्र काहीच बदल करायचा नाही. हे दोन शब्द (अर्थात चार शब्द ) घेऊन प्रत्येकाने आपापल्या आवडीने एक कथानक डोळ्यासमोर उभे करावे, अशी अपेक्षा आहे.
प्रत्येकाने आपापल्या आवडीने
प्रत्येकाने आपापल्या आवडीने एक कथानक डोळ्यासमोर उभे करावे, अशी अपेक्षा आहे.
>> त्यासाठी पुढील कधीतरीच्या वर्षी येणाऱ्या STY स्पर्धेत पाराग्राफ भरून स्टोरी देण्याची आता काही गरज लागणार नाही संयोजक मंडळाला जर ..
फक्त ते दोन जोडशब्द टाकले गेले तर.
अभय आर्वीकर, माझा आधीचा
अभय आर्वीकर, माझा आधीचा प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नव्हता.
ऋन्मेषला उद्देशुन होता.
त्याला सुद्धा अर्थ लागलेला नाही असे मला वाटलेले.
नाही नाही म्हणत शेवटी
नाही नाही म्हणत शेवटी कवीमहाराजांनी टॉवरवरून खाली उतरून त्यांना अभिप्रेत असलेला उलगडा केलाच. तो पहिल्याच प्रश्नकर्त्यासाठी केला असता, तर पुढची चर्चा टळली असती. तेव्हा ती चर्चा व्हावी याच उद्देशाने ते टॉवरवर बसून होते असं मानायला वाव आहे. आतातर ‘तुम्हाला लागलेला अर्थही सांगा गडे, त्याचा माझ्या अर्थाशी मेळ लागतो का ते पाहू’ असा लाडिक हट्टही करताहेत. कमाल आहे!
@स्वाती_आंबोळे
@स्वाती_आंबोळे
मी अजून उलगडा केलेलाच नाही. फक्त त्रोटक माहिती दिली आहे.
अजिंक्यरावांचा पहिला प्रतिसाद सोडला तर त्यानंतरचे काही प्रतिसाद कवीच्या पोटाला चाकू लावून आणि मानेवर तलवार ठेवून प्रश्न विचारावा किंवा जाब मागावा अशा तऱ्हेने प्रतिसाद आलेले होते.
तुम्ही तर कवितेच्या बाफवर येऊन कवितेविषयी काहीच न बोलता चक्क कवीलाच उलटे टांगायला सुरुवात केली.
तलवारीला भिऊन उत्तर देणे योग्य आहे का, तुम्हीच सांगा.
कुणी प्रेमाने जग जिंकायला निघाले तर मी त्याला मदत करेल पण तलवारीच्या धाकावर कोणी जग जिंकायला निघाला असेल तर त्याच्याशी युद्ध करायला नको का?
सरते शेवटी :
त्या एका ओळीचा अर्थ जाणून घ्यायची तुमची शिगेला पोचलेली उत्कंठा बघून कवीचे हृदय वितळले असावे. नसेल कशावरून?
कोणी गळ्यावर तलवार ठेवा किंवा
कोणी गळ्यावर तलवार ठेवा किंवा प्रेमाने विचारा.. लगेच काहीच सांगायचे नसते. प्रत्येक लेखकाला, धाग्याकर्त्याला हा संयम जमायलाच हवा.
आणि हे धागाकर्त्याच्या फायद्यासाठीच म्हणत नाहीये तर वाचकांच्या सुद्धा हिताचे असते हे..
आपल्या आयुष्याचेही असेच नसते का.. पटपट सारे उलगडत गेले तर जगण्यात मजा ती काय उरली
Pages