Submitted by aksharivalay 02 on 19 October, 2024 - 04:32
घेते दळून कविता...
मजला हवीहवीशी, येते जुळून कविता
ओठी तुझ्या कशी अन् , जाते रुळून कविता
लोंढे निघून जाती, मी एकलाच उरतो
पाहून खिन्न मजला, येते वळून कविता
साऱ्या तरुण चिंता, बसती उशास माझ्या
शाईत मिसळुनी त्या, घेते गिळून कविता
मूर्च्छित भावनांना, घेते कवेत आणि
देऊन श्वास त्यांना, जाते जळून कविता
तो का सदैव हसरा?, तो का सदैव कष्टी?
पडतात प्रश्न त्यांना, येते कळून कविता
घेतो तुला लिहाया, जातो वसंत वाया
फाडून कल्पनेला, जाते छळून कविता
डोळ्यात वेचलेले, जात्यात घालतो मी
जात्यात अनुभवांना, घेते दळून कविता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह..!!
वाह..!!
धन्यवाद
.
धन्यवाद
धन्यवाद
फार सुंदर!!
फार सुंदर!!
छान आहे
छान आहे
छान आहे.
छान आहे.
अफाट सुंदर !! अप्रतिम !!!
अफाट सुंदर !! अप्रतिम !!!
मस्तच.
मस्तच.
मस्त जमलीये कविता ..
मस्त जमलीये गझल ..
वाह, एकदम झकास.
वाह, एकदम झकास.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
खूप छान.
खूप छान.
धन्यवाद समो
धन्यवाद सामो