तीन नवीन मराठी शब्दखेळ - शब्दवेध, शब्दशोध आणि सुडोकू

Submitted by माबो वाचक on 19 September, 2024 - 11:22

शब्दखेळांमध्ये तीन नवीन सदस्यांचा समावेश केला आहे. माबोकरांना ते आवडतील अशी आशा आहे.
शब्दवेध - https://marathigames.in/index3.html
हा खेळ काहीजण शाळेत असताना खेळले असतील. यामध्ये एक विद्यार्थी एक शब्द मनात धरून फळ्यावर त्या शब्दाच्या अक्षरसंख्येइतक्या रेषा ओढायचा. (त्या शब्दात किती अक्षरे आहेत ते कळण्यासाठी) आणि बाकीचे विद्यार्थी तो शब्द ओळखण्याचा प्रयत्न करायचे. त्यासाठी ते अंदाजे एक-एक अक्षर सांगायचे. जर ते अक्षर त्या शब्दामध्ये कोठेही असेल तर त्याच्या जागी ते फळ्यावर लिहायचे. अशा रीतीने मर्यादित प्रयत्नांमध्ये तो शब्द ओळखला जायचा.
तोच हा खेळ संगणकीय रूपात. इंग्रजीत त्याला Hangman म्हणतात असे समजले.
शब्दशोध - https://marathigames.in/index4.html
यामध्ये सात शब्दांच्या अक्षरांची फोड करून ते एका १०x १० च्या ग्रिड मध्ये भरली जातात व उर्वरित जागा रँडम अक्षरांनी भरल्या जातात. खेळाडूला ते शब्द ओळखायचे असतात. हा खेळ वर्तमानपत्रांमध्ये असायचा.
सुडोकू - https://marathigames.in/Sudoku/sudoku.html
लोकप्रिय सुडोकू खेळ मराठी आकड्यात उपलब्ध. आपल्याकडील सुडोकू तुलनेने सोपी आहेत. ती पटकन सुटतात, त्यामुळे नवीन खेळाडूंना सुद्धा मजा येते.

या तीनही खेळांच्या इंग्रजी आवृत्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व खेळ दैनिक आहेत, म्हणजे रोज नवीन व सर्वांना समान. आणि सर्व खेळ खेळल्यानंतर दवंडी पिटविता येते.

या सर्व शब्दखेळांना माबोकर खूप छान प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल माबोकरांचे धन्यवाद.
एका खेळाने सुरुवात होऊन आता बरेच खेळ वेबसाईट वर जमा झाले आहेत. शब्दखेळ आवडणाऱ्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत ते पोचावेत हि इच्छा आहे. त्यासाठी याचा प्रसार करावा हि माबोकरांना विनंती.
हे नवीन शब्दखेळ कसे वाटले ते जरूर सांगा. धन्यवाद.
hangman.pngsearch.pngsudoku.png

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक यांच्या मनातील मराठी शब्द ओळखा
भारतातील सात राज्ये शोधा
कठिण, वेळ - 13 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

शेवटच एक राज्य शोधायला बराच वेळ गेला.

छन्दिफन्दि , छान.
शेवटच एक राज्य शोधायला बराच वेळ गेला. >>>> अच्छा. पण खेळायला मजा आली का ?

Pages