शोध

Submitted by - on 17 September, 2024 - 23:57

तू हरवली आहेस कुठेतरी .
तू हवी आहेस मला. अगदी पूर्वी सारखी. अवखळ स्वभावाची तरीही शांत.
तुला शोधते आहे.
गाण्यांमध्ये शोधले तुला. अगदी मराठी हिंदी आणि इंग्रजी. तू भेटलीस मला फार थोडी. अगदी पुसटशी ...अशी पुसटशी नको हवी होतीस तू.
मग शोधायला लागले तुला ... पुस्तकांमध्ये .... अगदी रोज ....ऐकणाऱ्या पुस्तकातून ... वाचणाऱ्या पुस्तकातून ...

कारण तुला पुस्तके वाचायला आवडतात ना..

तू भेटलीस मला ... अगदी रावण , सीता , १९९०, आई समजून घेताना, सत्याचे प्रयोग, अश्या खूप साऱ्या पुस्तकातून.
तरीही एकतर्फा ... मला तू चोवीस तास माझ्या बरोबर हवी आहेस.

अगदी पूर्वीसारखी. जरी तू आणि मी बदलले आहे थोडेसे. हा बदल नको मला. काळ नाही थांबत कुणासाठी माहित आहे मला.

पण तरीही मी अव्यक्तच राहिले आणि तू भरभरून बोलून मोकळी झाली.

.
.
.
.

आणि माझाच माझ्याशी असलेला अपूर्ण संवाद परत थांबला.

Group content visibility: 
Use group defaults