चटण्या.. भेंडीची चटणी... मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 15 September, 2024 - 03:33

भेंडीची चटणी

नाव बघून न वाचताच पुढे जाऊ नका भेंडी न आवडणाऱ्या आणि
आवडणाऱ्या मंडळींनी ही. खुप मस्त लागते ही चटणी. कोणी कोणी ठेचा ही म्हणत असतील पण आम्ही चटणीच म्हणतो.

साहित्य

अर्थातच धुऊन पुसून कापलेली एक मोठी वाटी भेंडी ( फार बारीक चिरायची नाही. ) लसूण पाच सहा पाकळ्या , हिरव्या मिरच्या दोन तीन मोठे तुकडे करून (किंवा आवडीप्रमाणे ) , भाजून सालं काढलेले शेंगदाणे दोन चमचे , कोथिंबीर थोडी ( काड्या होत्या घरात म्हणुन मी त्याच घातल्यात) जिरं, मीठ ,लिंबू
( ऐच्छिक )

कृती

शक्यतो लोखंडी कढईत अर्धा चमचा तेलात लसूण आणि मिरच्या मिरच्या त्यावर तपकिरी डाग येई पर्यंत परतून घ्या आणि काढून घ्या.
पुन्हा अर्धा चमचा तेल घालून मोठ्या गॅसवर भेंडी भराभर सतत हलवत परतून घ्या. म्हणजे ती चिकट होत नाही. थोडया वेळाने मीठ घाला म्हंजे भेंडी लवकर शिजते.
भेंडी, लसुण, मिरच्या, शेंगदाणे, जिरं, मीठ ( लागेल तसं ) कोथिंबीर सगळं पल्स मोडवर फिरवून घ्या. जास्त बारीक करायचं नाहीये. आता अर्धा चमचा तेलावर हे मिश्रण पुन्हा दोन मिनिटं परतून घ्या. चव ऍडजस्ट करा. आवडत असेल तर लिंबू पिळा. भेंडीची चटणी तयार आहे.

अधिक टिपा
ही चटणी मोकळी होते, चिकट अजिबात होत नाही.
भेंडीची भाजी आणि ही चटणी ह्यांच्या चवीत खुप फरक आहे. भेंडी न आवडणारे ही खातील एवढा.
भाकरी बरोबर सर्वात बेस्ट लागते पण भात, पोळी ह्या बरोबर ही छान लागते.

हा फोटो

20240915_121643.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन ममो..
मी बनवून पाहिली छान होते घरात सर्वांना आवडली..

अभिनंदन ममो..
मी बनवून पाहिली छान होते घरात सर्वांना आवडली..

Anu, ऋ, Sharmila, कविन, ऋतुराज, jui , धनि, आरती आणि मत दिलेल्या सर्वांचे आभार .
प्रशस्तीपत्रक ही छानच झाले आहे.

Pages