अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {असंच काहीपण २}- {अतरंगी}

Submitted by अतरंगी on 13 September, 2024 - 22:15

विद्यार्थी ७:-
“मुळात जरा खाण्यावरच संयम ठेवला ना बयो की जन्मभर फिट रहायला बाकी जास्त कष्ट लागत नाहीत. “

विद्यार्थी ८:-
“बयोऽऽऽ मी जन्मात कधी अशी खाण्यासाठी वखवखलेली माणसं पाहिली नाही, जरा म्हणून संयम नाही….”

विद्यार्थी ९:-
“आपला तर जन्मच खाण्यासाठी झालाय
बयो, जरा थोडे खायचं किंवा संयम ठेवायचा हा आपला प्रांतच नाही.”

विद्यार्थी १०:-
“फक्त खाण्याचाच प्रश्न नाही गं बयो, ह्यांना जन्मभर कोणत्याच बाबतीत जरा म्हणून संयमच नाही

विद्यार्थी:- ११
“दोन मुलांना पुरेल एवढे खायचंय तुला, त्यांचा जन्म होई पर्यंत जरा संयम ठेव मग कर परत डाएट अन फिएट.”

विद्यार्थी १२:-
“खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users