अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {असंच काहीपण १}- {अतरंगी}

Submitted by अतरंगी on 13 September, 2024 - 22:07

खालील शब्दांचा वाक्यात प्रयोग करा

खाणे, जन्म, बयो, संयम, जरा.

विद्यार्थी १:-
“जरा संयम ठेऊन खावे, एकच जन्म आहे बयो. “

विद्यार्थी २:-
“जरा संयम ठेऊन जन्म द्यावा बयो, खाण्यासाठी पुरायला हवे. “

विद्यार्थी ३:-
“बयो जरा खाण्याचे बघा, मोबाईल बघण्यासाठी जन्म पडलाय, त्यावर जरा संयम ठेवा.”

विद्यार्थी ४:-
“जन्मभर बसून खाता येईल एवढा पैसा मिळेल बयो, जरा योग्य वयात गुंतवणूक कर आणि फक्त compounding ची वाट बघ.”

विद्यार्थी ५:-
साहेबांना कालच पाच लाख पोचवले, “ बयो जन्मभर बसून खाशील अशा ठिकाणी बदली देतो, जरा संयम ठेव” म्हणालेत.

विद्यार्थी ६:-
“खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users