उंच डोंगरावरून वाकून बघणाऱ्या चेटकिणी-
कट्रिना : ...ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच! म्हणे.
प्रियांका : छत्री असेल. ('क्रंची' चिप्स तोंडात टाकत)
कट्रिना: खाण्यासाठी जन्म आहे का बयो?संयम असावा जरा !”
प्रियांका: पण आपल्याला शरीर कुठाय? जन्मच नाही तर संयम कशाला.
कट्रिना: ते दोघे ववीला गेले पण हा नमुना आला आहे या शशकात.
प्रियांका: आता याचे तरी संत्रे सोलणे नको. संत्रे-मोसंबी करता करता फ्रूट सॅलड झाले आहे.
कट्रिना: संयोजकही कुणाकुणाला 'ते दृष्य' बघायला पाठवत आहेत, आपल्याला हलायचीही योय नाही. चिकवा करून टाकलाय आपला.
प्रियांका: चल, उडत जाऊन घाबरवूया त्याला.
कट्रिना: काही गरज नाही, तेच यडे वर बघते आता बघ.
प्रियांका: शंभर शब्दांच्या प्रोग्राम मधे अडकलेला पॅलिनड्रोम झालाय त्याचा. वर बघणं भाग आहे. तोपर्यंत मान खाली ठेवून फोनवर मायबोलीवर इतरांची शशके वाचेल. व्यसनी आहे दुसरे काय..!
कट्रिना: ए, झाले शंभर शब्द. वर बघतंय बघ हेंद्रट...
आणि
"उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली."
- अस्मिता
गणेशोत्सवात काहीतरी हलकेफुलकेच लिहावे असे ठरवले होते, त्यामुळे तीनही शशकांचे शेवटचे वाक्य वापरून काहीतरी गमतीदार लिहायचे प्रयत्न केले आहेत.
आवडले…..
आवडले…..
क्या बात है लूप मस्त रचलाय
क्या बात है
लूप मस्त रचलाय
(No subject)
लूप कन्सेप्ट येकदम झकास!
वा.. वा.. मस्तच..
वा.. वा.. मस्तच..
खतरी झालय एकदम
खतरी झालय एकदम
चक्र पूर्ण झालं
चक्र पूर्ण झालं
आभारी आहे. शशकात एक तरी
आभारी आहे. शशकांत एक तरी प्रवेशिका द्यावी असे वाटल्याने आज दहा मिनिटात गंमत म्हणून सहजच खरडून टाकली.
आवडलेच…...!
आवडलेच…...!
पूर्ण संदर्भ लागण्याइतक्या
पूर्ण संदर्भ लागण्याइतक्या शशक वाचलेल्या नाहीत पण काही ओळींचा संदर्भ लागला "क्रंची" ला एक लोल आहेच.
सध्या डोक्यातून 'क्रंची' जात
सध्या डोक्यातून 'क्रंची' जात नाहीये, ते आपोआपच आले.
तीन वेगवेगळ्या शशकांतली संयोजकांनी सांगितलेले शेवटचे वाक्य घालून त्याच्या अवतीभवती संवाद तयार केले आहेत. त्याचा लूप आहे. प्रयोग आहे विचित्र.
भरपूर शशके वाचली की मनावर परिणाम होऊन असे शशक तयार होते.
छानच.
छानच.
छान..
छान..
प्रियांका आणि कतरीना चेटकीणी
प्रियांका आणि कतरीना चेटकीणी होय?
आमच्या भावना दुखावल्या!!!!!
निषेध तुमचा !!!!!!!
आवडलं हलकं फुलकं
जमलीय शशक पण पीसी आणि कॅट
जमलीय शशक.. कोणीतरी तीन वाक्यांचा प्रयोग करणार याची वाटच बघत होतो पण पीसी आणि कॅट चेटकीण झाल्या तरी मी कधी त्यांना बघून रस्त्यावर धाव घेतली नसती.. शशक स्पर्धा गेली तिकडे, डोंगर चढायला सुरुवात केली असती
ऋन्मेऽऽष >>
ऋन्मेऽऽष >>
मस्त
मस्त
डोंगर चढायला सुरुवात केली असती >> आणि जाळायला
आबा हो
आबा हो
ते तर मीच पेटलेल्या अवस्थेत असल्याने असेही झालेच असते
ऋन्मेष
ऋन्मेष
ऋ ला या शशकात दडलेले जीवनाचे सार कळले आहे हे बघून टडोपा होऊन सार तर नाही पण माझ्या एकपात्री प्रयोगातले सूप त्याला बक्षीस.
झकासराव आणि आबा
मला लोक हसायलाच हवे होते, Finally...
कळली, कळली आता आधी वाचली
कळली, कळली आता आधी वाचली तेव्हा कळली नव्हती पण जरा अजून. गणेशोत्सवात शिरले तेव्हा ही डोक्यात शिरली.
(No subject)