Submitted by प्राचीन on 12 September, 2024 - 13:38
स्वाहा
आक्रोशानं अवघा आसमंत झाकोळलेला. एक्या बाजूस ती..थिजल्या नजरेने सारं पाहत असलेली.. किती आठवत होतं. असाच आकांत पूर्वीही झालेला. तिचा सहचर होता तो..त्याच्याबरोबर निश्चयपूर्वक पावलं टाकणारी ती.. मात्र तिचा निर्धार ढ्ळला, तो सासर्याच्या आर्त विनवणीनं ! दूषणं सोसतच तिनं मळलेली वाट सोडलेली. सुभेदार आणि बाईजींच्या भक्कम पाठिंब्यानं !
आज पुन्हा मळलेल्या वाटेने चालणारी एवढी पावलं. काही तर अवघ्या सात- आठ वर्षांच्या चिमुरड्यांची ! का? इंदूरच्या सुभेदारांघरची रीत म्हणून ? मग आता आपणच पुढे व्हायला हवं ! सुभेदारांसारखं ..
या विचारासरशी बळ एकवटून ती विचारती झाली, त्या धडाडून पेटलेल्या चितेस,
“ही इवली निष्पाप जीवनपुष्पं खाण्यासाठी जन्म आहे का बयो?संयम असावा जरा !”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमली आहे! मस्त
जमली आहे! मस्त
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
सुंदर…
सुंदर…
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
वा ! सुंदर…
वा ! सुंदर…
जबरा..
जबरा..
जबरदस्त!!
जबरदस्त!!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
छान आहे
छान आहे
छान जमली आहे शशक
छान जमली आहे शशक , आवडली
छान!
छान!
अमितव, छल्ला, माझेमन, झकासराव
अमितव, छल्ला, माझेमन, झकासराव, डॉक्टर, शर्मिला, सामो, मंजूताई, भक्ती, ऋन्मे@§ष, देवकी.. कौतुकाबद्दल आभारी आहे.
:दुसरी शशकही वाचायला हरकत नाही.
सुंदर
सुंदर
छान!
छान!
धन्यवाद ऋतुराज आणि भरत.
धन्यवाद ऋतुराज आणि भरत.