Submitted by अनन्त्_यात्री on 11 September, 2024 - 00:22
निबिडात दडलेल्या
निळ्याभोर पाखराची
लवलवती लकेर
जेव्हा कानावर येते....
निळ्यासावळ्या निर्झरा
फेसाळत, कवळून
पाणभोवर्याची माया
जेव्हा पैंजण बांधते...
मावळतीच्या बिलोरी
आभाळाला तोलूनिया
एक इवले पाखरू
जेव्हा पंखावर घेते...
काजळल्या नभावर
निळी रेष रेखाटत
दिशा, कोन झुगारून
जेव्हा उल्का कोसळते....
.....काळजात रुजलेल्या
कुण्या कवितेची ओळ
ध्यानीमनी नसताना
तेव्हा ओठावर येते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आ हा हा.... केवळ सुंदर....
आ हा हा.... केवळ सुंदर....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद शशांक!
धन्यवाद शशांक!
सुंदर!
सुंदर!
वाहवा!! नेहमीप्रमाणेच सुंदर
वाहवा!! नेहमीप्रमाणेच सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Abuva, स्वरूप धन्यवाद!
Abuva, स्वरूप धन्यवाद!
सुंदर...
सुंदर...
धन्यवाद द. सा.
धन्यवाद द. सा.
निव्वळ सुंदर आहे.
निव्वळ सुंदर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किंवा उलटेही होते एखादी कविता वाचताना, वरील गोष्टी आठवतात, अनुभवल्या जातात