Submitted by Abuva on 10 September, 2024 - 02:39
प्रसन्न सकाळ आहे. सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलाचा वास मनाला कसा प्रफुल्लित करतोय. कच्च्या रस्त्यावरून मी जीप हाकत या डोंगरावरच्या निरीक्षण केंद्राकडे निघालोय. समोरचा उंच डोंगरमाथा बाष्पाच्या ढगांत गुरफटलाय. मात्र त्या मोहक आवरणाखाली लाव्हाचं धगधगतं स्थंडिल आहे! त्यावरच तर लक्ष ठेवायचंय. मी पोहोचलो की डेव्हिड निघेल.
अचानक जीप थरथरली, जमीन हादरली, आणि गगनभेदी हुंकारानं कानठळ्या बसल्या! शिखर फोडून लाव्हा उसळला. आकाशाची निळाई दगड राखेच्या उंचच उंच मश्रूम ढगांनी झाकोळली.
ज्वालामुखी मातला होता, कालभैरवाचं तांडवच जणु!
जीपमधल्या रेडीओवर डेव्हिडचं किंचाळणं ऐकू आलं, "उद्रेक, उद्रेक, उद्.. र्............................."
त्या विस्फोटातून उठलेला आगीचा लोळ डेव्हिडच्या दिशेनं झेपावला. उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओह!
ओह!
सुंदर लिहिलीय!
सुंदर लिहिलीय!
थरारक ...!
थरारक ...!
मस्त आहे.
मस्त आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.