काय छोट्या दोस्तांनो?
कसे आहात सगळे?
मनावर दगड ठेऊन, थोडासा का होईना अभ्यास करताय ना? आई- वडीलांचं अधून मधून का होईना ऐकताय ना? ते तुम्हाला फार त्रास देत असतील तर यावर्षी माझ्या कानात हळूच सांगा हां. पुढच्या वर्षी मी तुम्हाला त्यांचा आईबाबा करतो.
तर आता आई-बाबा माझी बडदास्त ठेवण्यात व्यग्र आहेत तो पर्यंत तुम्ही मजा करुन घ्या. मस्तपैकी खेळा, हुंदडा, गोड-धोड खा...
हे सगळं करता करता अजून एक तुमच्या आवडीची छान गोष्ट करा, ती म्हणजे मस्तपैकी सुंदर चित्रे काढा, रंगवा आणि मला त्याचे छान फोटो पाठवा.
या वेळेस चित्रं काढायला विषय पण एकदम सोप्पा आहे. " माझी आवडती गाडी"
चला तर मग, पटापट कागद, पेन्सिल, रंग घ्या, तुमच्या आवडत्या गाडीचे चित्र काढा आणि तुमच्या आवडत्या रंगात रंगवा.
आणि हो चित्रं पूर्ण झाल्यावर सगळा पसारा आवरायला विसरू नका हं!
नाहीतर तुमचे आई-बाबा तुम्हाला सदबुद्धी द्यायचं साकडं घालून मलाच धर्मसंकटात टाकतील....
धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
चित्रकला उपक्रम : माझी आवडती गाडी - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
४) चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
५) चित्रं गणेश चतुर्थीपासून, ७ सप्टेंबर २०२४ (भारतीय प्रमाण वेळ) ते १७ सप्टेंबर २०२४ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२४" अशी शब्दखूण द्यावी
छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही काढलेली छान छान चित्र ?
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
४) चित्र स्वतः काढून रंगवलेले
४) चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
>>
हा नियम आहे का संयोजकक? कारण माझ्या लेकाने फक्त रंगवलं , काढलं नाही