Submitted by kunjir.nilesh on 26 December, 2007 - 02:47
वाटलं काही पानं
फक्त तुझ्यासाठी लिहावी,
कळत-नकळत कधीतरी
रातराणी फुलावी!
*******************************************
तुझ्याच आठवणींची ही पानं
मी माझ्या शब्दांत साकारतोय,
शब्द-शब्द जोडताना
फक्त तुलाच आठवतोय!
*******************************************
देखणेपणाचा सडा
कधी अंगावर फुलवायचा नसतो,
मनातल्या मनात साठवून
तो फक्त उधळायचा असतो
*******************************************
तुझ्या आठवणीच्या प्रत्येक पानाचा
कोपरा मी दुमडून ठेवतो,
पुस्तक उघडल्यावर वाचायला
सुरुवातही तिथूनच करतो
*******************************************
नाही म्हटलं तरी
आज सुर्य पुन्हा एकदा उगवेल,
मन होऊन कवडसा
पुन्हा कुठेतरी पालवेल
गुलमोहर:
शेअर करा
तुझ्या
तुझ्या आठवणीच्या प्रत्येक पानाचा
कोपरा मी दुमडून ठेवतो,
पुस्तक उघडल्यावर वाचायला
सुरुवातही तिथूनच करतो
आठवणीत ठेवण्यासारख्या चारोळ्या .... अडोर्न मिडीया?
छान
आवडल्या चारोळ्या.