जुनी कढई, नवीन उपमा

Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 17:42

कविता म्हणजे काय? कुणी म्हणेल 'जे गद्य नाही ते पद्य'. कुणी म्हणेल 'ट' ला 'ट' आणि 'प्राची' ला 'गच्ची' लावून जी होते ती कविता. कुणी म्हणेल पाऊस पडला, प्रेम जडलं आणि मग मोडलं ही की जे 'होतं' ती कविता, तर कोणी म्हणेल वक्रोक्ती हा तर कवितेचा गाभा.

कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अलंकार, प्रतिके, प्रतिमा, मिथके अशा गोष्टींचा वापर करुन छंदबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तशैलीत लिहिलेली रचना येते. बर्‍याचदा कविता वाचली की काहीतरी खोलवर जाणवते. अरे हे तर आपल्याच मनीचे गूज होते, त्याची कविता कशी बनली याची मौज ही वाटते आणि ती कविता त्या कवीची न राहता आपलीच बनते.

प्रेम हा कवी आणि कवयित्रींचा आवडता विषय. प्रेम म्हटलं की 'दीपकाचे वरी प्राण देणार्‍या पतंगाची खरी प्रीत' आलीच पाहिजे, चंद्र आला पाहिजे. पाठोपाठ चांदणे आले तर चकोर तर मागे उभाच आहे, मंगेशा सारखा! ओल्या पाकळ्या, ओले सुगंध, ओले ओठ आणि ओले डोळे. ह्या अशा ठोकळेबाज उपमांचा साठा केला की मग एआय सुद्धा त्यांना वेगवेगळ्या तर्‍हेने गुंफुन कविता करेलच की. पण मग अचानक 'प्रेम कर भिल्लासारखं' असं कुसुमाग्रज म्हणतात, 'नैवेद्य मागणारा काळ' असं आरती प्रभू लिहुन जातात आणि ती ओळ वाचल्यावर त्वरित पुढची ओळ वाचणे शक्यच नसते. ती ओळ मनात मुरवत त्याचे आयाम जोखत त्यावर काही काळ हिंदोळे घेण्यावाचुन दुसरा पर्याय तरी काय असतो!

अशाच धर्तीवर आम्ही एक गंमत खेळ घेऊन आलो आलो आहोत. आम्ही एक कवितेचा ढोबळ विषय देऊ. तुम्हाला त्या विषयावर कविता करायची आहे, वृत्तबद्ध करा किंवा मुक्तछंदात करा. पटकन चारोळी केलीत तरी हरकत नाही. अट फक्त एकच! त्या विषयात ज्या ठोकळेबाज उपमा नेहेमी वापरात येतात त्यांचा वापर करायचा नाही. कढई जुनीच, उपमा मात्र नव्या हव्यात.

१. पाऊस
२. प्रेम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम असावं कीबोर्ड सारखं,
बडवलं तरी अक्षरं उमटवणारं,
मेहनत करकरूनही कधीही न रडणारं,
कधी ताण कधी फक्त एंटर आणि इस्केप मारून पळणारं,
प्रेम असावं कीबोर्ड सारखं.
....
सहन करा हा उपमा
Lol

प्रेम
प्रेम असाव बाकरवडीसारखं
लाटी आणि सारणाप्रमाने एकमेकात गुंडाळलेलं
तुकडे केले, तेलात तळले तरी वेगळं न होणारं
उलट,
एकमेकांच्या साथीने आयुष्याची लज्जत वाढवणारं.
.........
हे ही करा सहन

ऑप्टिकल इल्युजनचा खेळ म्हणजे प्रेम
ओक्झिटोसीनने घातलेला घोळ म्हणजे प्रेम
डोपामीनचा जास्त झालेला डोस म्हणजे प्रेम
म्हंटलं तर या केमिकल्सचा लोचा म्हणजे प्रेम
तरी सगळंच नसतं फेक, ही जाणीव देखील प्रेम

find the odd मधलं odd म्हणजे प्रेम
नजर लागते तरबेज तरच दिसते प्रेम
व्हॉट्स ॲपवर बदाम देणे, म्हणजे नसते प्रेम
'बदाम' द्यावा असे 'वाटणे' याला म्हणती प्रेम

चौकटीतल्या साऱ्या उपमा, पल्याड त्याच्या प्रेम
शब्दाविण जे बोलून जाते असते निव्वळ प्रेम

एका डोळ्याच्या चौकट
राजावर,
त्याच्या फक्त त्याच्या, राणीने केलेले प्रेम
म्हणजे प्रेम!!
म्हणजे प्रेम!!

कविन _/\_

ऋतुराज खतरनाक आहे हे. व्हॉअ‍ॅ वर टाका.

किल्ली हाहाहा मस्तच गं.

प्रेम असाव बाकरवडीसारखं
लाटी आणि सारणाप्रमाने एकमेकात गुंडाळलेलं
तुकडे केले, तेलात तळले तरी वेगळं न होणारं
उलट,
एकमेकांच्या साथीने आयुष्याची लज्जत वाढवणारं.>>> Lol छान आहे हे. मग कोणीतरी म्हणेल
मला भूक लागली .... प्रेमाची Lol

वाह

एका डोळ्याच्या चौकट
राजावर,
त्याच्या फक्त त्याच्या, राणीने केलेले प्रेम
म्हणजे प्रेम!!
म्हणजे प्रेम!!>>>वाह! सामो. चौकट राजा सिनेमाशी जोडल मी याला म्हणजे अगदी तसं नाही पण व्यंगासकट स्विकारते प्रेम या अर्थाने

मला वाटते चौकट राजा सिनेमा, चौकट राजा या पत्त्याशीच निगडित असावा. कदाचित लेखक/दिग्दर्शकाला व्यंग असलेला राजाच दाखवायचा असावा.
कविन खूप आभार.

अबोल मूक कोकरु जसे प्रेम माझे नि तुझे तसे.
न बोलता कळते सारे
हवेत कुणाला शब्दांचे वारे!

माझ्याजवळ बस एकदा डोळेभरुन पाहू देत
खुशाल होउ देत विरह मग
पुरेल शिदोरी जीवनभर!

कलेक्टिव्ह मेमरीत कोरलेले लावण्य
अशारीरी आत्मिक सौंदर्य
म्हणजे प्रेम ... म्हणजे प्रेम!

माझी कविता परत टाकते आहे कारण विषयास धरुन आहे.-

कधीकधी वरवर सभ्यपणाचा आव आणुन
प्रेम येतं. अगदी दारावर टकटक करत
आपण म्हणतो "आत्ता वेळ नाही..... मग ये!"
.
"अरे काही काळ-वेळेचं भान? चालता हो!"
.
"लायकी नाही माझी. निघून जा."
.
पण हे बेटं! सभ्यपणाचा बुरखा टाकून,
धटिंगणासारखं आतच घुसतं.
आपलच घर असल्यासारखं,
ताणुन देतं.
खनपटीलाच बसतं
पूर्ण घराची उलथापालथ करुन,
जाताना मात्र, गर्भश्रीमंत करुन जातं.
--------------------------------
तर कधी प्रेम भिजलेल्या मांजराच्या
पिल्लासारखं,
वळचणीला सापडतं.
आपण आत घेतो
आणि हे लळा लावतं
आणि मारे एके दिवशी शेपूट वर करुन चालतं होतं,
परत न येण्याकरता.
-------------------------------
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.
-------------------------------------
कधीकधी तर पाऊस बनून अवेळी गाठतं.
पार भिजवुन टाकतं.
.
काय करावं या बहुरुप्याला
एक रुप असेल तर शपथ!
माणसाने आपला बचाव तरी कसा करायचा?

>>>>>>क्लिकला गं ब्ल्यूटूथ माऊस
.
.
.
घमेल्यातुनी फेकली घालमेल
तरी मन झाले.. गं भीजपाऊस

आचार्य Lol पूर्ण कविताच धमाल आहे

पाऊस आणि प्रेम
सारखेच तर असतात

अचानक गवसतात
मनसोक्त भिजवतात
जाताना हुरहूर लावतात
आठवणींत दरवळतात

पाऊस आणि प्रेम सारखेच तर असतात!

रमड मस्तच

जुन्या कवितेचा झब्बू देते तुला Proud

हुरहूर

बरसायची वाट पाहून
जिवाची काहिली व्हावी
आणि येतो येतो म्हणत
त्याने नुसतीच हूल द्यावी!

आता नाहीच बरसणार
म्हणत मनाची तयारी करावी;
तेव्हाच नेमकं त्याला
बरसायची हुक्की यावी...

मन पुन्हा हळवं हळवं,
बेटं तयार त्याच्या भेटीला...
परत ऊन पावसाचा
खेळ त्याच्या वाटेला!

खरं सांग, तू ढवळ्या
नि पाऊस पवळ्या आहे ना?

पावसाच्या प्रेमात तहान भूक विसरून
एकाच पायावर चालणारं ते ध्यान ..
कधी खुरडत कधी लंगडत..
ठरवलं जणू नाहीच थकायचं.

काटे किती रुतले दगड गोटे किती फुटले
हिशेब ठेवायला नव्हती तेव्हा अक्कल
आशेवर फक्त जगायचं...
केव्हातरी येईल पावसाला सुद्धा प्रेम.

आंजारेल गोंजारेल मला कुशीत घेऊन
प्रसवेल माझं मातृत्व त्या चार थेंबांनी
मिरवेन की मीही मग जरीकाठी
हिरव्या मखमली नवीन लुगड्यानी...!!

कुसुमाग्रजांची क्षमा मागून...

पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी-नाले पुरे झाला वारा!

प्रेम कर डेव्हलपरसारखं
स्प्रिंट भरून वाहिलेलं
बग्ज क्लोज करूनसुद्धा
इन्कम्प्लीट राहिलेलं

प्रेम कर मॅनेजरसारखं
नसूनसुद्धा असणारं
फक्त अप्रेजल तेवढं सोडून
वाटेल तिथे दिसणारं

पीएमसारखा छाती काढून उभा रहा
पीओसारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला, 'माझी टीम जॉइन कर
निदान यापुढचे क्वार्टर सहा'

डिलीट कर डॉक्युमेन्ट
ओकेआर लिहिलेलं
प्रेम कर डेव्हलपरसारखं
स्प्रिंट भरून वाहिलेलं...

Pages