पाककृती स्पर्धा ३: चटण्या

Submitted by संयोजक on 3 September, 2024 - 09:01

नमस्कार मायबोलीकरांनो,

जेवणाचं पान वाढताना त्यातली डावी बाजू महत्वाची, कारण त्यात असतात आपल्या आवडत्या चटण्या आणि कोशिंबिरी. त्यात इतकी विविधता असते की विचारू नका. चटपटीत चवीच्या, आकर्षक रंगाच्या, जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या आणि आरोग्यवर्धक अश्या चटण्या.
तर या वर्षी हाच विषय आहे आपल्या तिसर्‍या पाककृतीचा.

चला तर येऊद्यात चटपटीत, रंगीबेरंगी, रुचकर व सर्वांना आवडतील अश्या चटण्यांच्या पाककृती.

पाककृतीचे नियम अगदी सोप्पे आहेत.

१. साहित्य शक्यतो सहज उपलब्ध होणारे असावे.
२. चटणी बनविण्यासाठी फार वेळ लागणारा नसावा.
३. कृत्रिम/ रासयनिक preservatives चा वापर टाळावा.
४. मांसाहारी चटण्यांच्या पाककृती नकोत.

स्पर्धेचे नियम :
१) एक आयडी एका विषयाच्या कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता ७ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०२४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२४ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"चटण्या - {पाककृतीचे नाव}" - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) पाककृती स्वतः तयार केलेली असावी आणि पूर्वप्रकाशित नसावी.
९)'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
१०) प्रवेशिका ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या वेळेत पाठवता येतील. (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ)
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Following