नमस्कार मायबोलीकरांनो,
या वर्षीची दुसरी पाककृती स्पर्धा आहे 'आरोग्यवर्धक पेय' !
विविध पेये जेवणाची शोभा वाढवतात आणि संपूर्ण मेनूला एक खास खुमारी प्राप्त होते. जर ही पेये आरोग्यवर्धक असतील तर जेवणाच्या पोषणमुल्यात भर पडेल आणि मजाही येईल. चला तर मग, येउद्यात चवदार आणि आरोग्यदायी पेयांच्या व स्मूदींच्या पाककृती!
पाककृतीचे नियम अगदी सोप्पे आहेत.
१..साहित्य शक्यतो सहज उपलब्ध होणारे असावे.
२. स्मूदी/ पेय बनवताना फळे, फुले, भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, हर्ब्स यांचा वापर करावा.
३. साखरेचा वापर शक्यतो करू नये.
४. चवीसाठी मसाले वापरले तर चालतील.
५. कृत्रिम/ रासायनिक Preservatives वापरू नये.
६. अल्कोहोल युक्त पेय नकोत.
स्पर्धेचे नियम :
१) एक आयडी एका विषयाच्या कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता ७ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०२४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२४ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"आरोग्यवर्धक पेय- {पाककृतीचे नाव}" - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) पाककृती स्वतः तयार केलेली असावी आणि पूर्वप्रकाशित नसावी.
९)'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
१०) प्रवेशिका ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या वेळेत पाठवता येतील. (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ)
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया!!!
छान विषय आहे.
छान विषय आहे.
हो ना नवीन पेय प्यायला नाही
हो ना नवीन पेय प्यायला नाही मिळालं तरी पाह्यला मिळेल
: दिवे घ्या हो
छान उपक्रम.
छान उपक्रम.