पाककृती स्पर्धा १: One Dish Meal

Submitted by संयोजक on 3 September, 2024 - 08:48

नमस्कार मायबोलीकरांनो,

दरवर्षी गणेशोत्सवात तुम्ही साग्रसंगीत नैवेद्य, शिवाय रोजच्या जेवणात पोळ्या, भाज्या, वरण-भात, कोशिंबीर असा चारी ठाव स्वयंपाक करुन दमून जात असाल. निरोगी व सुदृढ शरीरासाठी चौरस आहार तर अत्यावश्यक! तुमच्या या 'रोज रोज जेवायला काय करु?' या त्रासातून तुम्हाला वाचवण्यासाठी आहेत One Dish Meal.

हाच आपल्या या वर्षीच्या पहिल्या पाककृतीचा विषय आहे.

चला तर करु या काही सोप्प्या, झटपट होणार्‍या, आबालवृद्धांना आवडतील आणि तरीही शरीराला आवश्यक असे सर्व पोषक घटक देणार्‍या One Dish Meal पाककृती.

पाककृतीचे नियम अगदी सोप्पे आहेत.
पाककृतीमधे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, चोथा (फायबर) यांचा समतोल असावा. शिजवलेले, उकडलेले, कच्चे घटक पदार्थ वापराता येतील.
धान्ये, डाळी, कडधान्ये, फळभाज्या, पालेभाज्या, फळे, बिया, दुधापासून तयार केलेले पदार्थ यापैकी कोणतेही घटक पदार्थ वापरुन पाककृती तयार करता येईल.
मांसाहारी पदार्थ/ साहित्य, अंडे यांचा वापर नसावा.

स्पर्धेचे नियम :
१) एक आयडी एका विषयाची कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता ७ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०२४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२४ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - "One Dish Meal - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) पाककृती स्व:त तयार केलेली असावी. आणि पूर्वप्रकाशित नसावी.
९)'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
१०) प्रवेशिका ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या वेळेत पाठवता येतील. (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ)
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय...
मी दरवर्षी ठरवतो एकदा तरी या पाकृ स्पर्धेत भाग घ्यायचा
पण....
पाककृतीमधे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, चोथा (फायबर) यांचा समतोल असावा....... हे असे बघूनच माझा भाग घ्यायचा मूड निघून जातो Happy

Following

पूर्वप्रकाशित म्हणजे मायबोली वर पूर्व प्रकाशित नको की दुसरीकडे कुठेही प्रकाशित नको.
मी पूर्वी केलेली एखादी दुसरीकडे ( फेसबूक किंवा इतर सोशल मिडिया) लिहिलेली पाककृती इथे स्पर्धेसाठी दिली तर चालेल का?

अल्पना,

पाककृती मायबोलीवर पूर्वप्रकाशित नसावी.