क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत! ह्यांचा आधुनिक अवतार आहे “ब्रेन इन अ व्हॅट!”
कल्पना करा कि एखाद्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाने (किंवा अतिप्रगत परग्रह वासियांनी) तुमचा मेंदू तुमच्या कवटीतून काढून फिश बाउल मध्ये ठेवला आहे. ह्या भांड्यात मेंदूचे पोषण करणारा द्रव आहे. तो मेंदूला जिवंत ठेवतो. ह्या मेंदूचा मज्जा रज्जुशी संबंध तुटला आहे. त्या ऐवजी मेंदू तारांच्या सहाय्याने सुपर संगणकाशी जोडला गेला आहे.
आपल्याला संवेदना कशा होतात? आपल्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला विद्युत संदेश पाठवले जातात. आपण चुकून एखाद्या गरम भांड्याला बोटाने स्पर्श केला तर बसलेल्या चटक्याचे विद्युत संदेशांत रुपांतर होते आणि हा संदेश मज्जा तंतुतून मज्जारज्जुतून मेदुला पोहोचवला जातो. मेंदू तत्काळ हात बाजूला घेण्याचा संदेश हाताच्या बोटाच्या स्नायूंना देतो.
समजा आपण संगणकाकडून “चटक्याचा” संदेश ( किंव्व एकूण आजूबाजूला दिसणार्या ) ह्या व्हॅट मधल्या एकाकी मेंदूला दिला तर त्या मेंदूची अशी कल्पना होईल कि आपण शरीरातच आहोत. आणि रोजचे जीवन जगत आहोत. शास्त्रज्ञ अशा एकाकी मेंदूबरोबर काहीही खेळ खेळू शकतील.
समजा हा प्रयोग पुणे विद्यापिठातल्या न्युरोलोजीच्या प्रयोगशाळेत चालला आहे. पण मेंदूला वाटतंय कि आपण मित्रांबरोबर वैशालीत गप्पागोष्टी करत इडली वड्यावर ताव मारत आहोत. किंवा मुंबईत मरीन ड्राईववर मैत्रिणी बरोबर हवा खात आहोत. इथच थांबू नका. आपण चंद्रावर, मंगळ ग्रहावर आहोत असा पण विचार करू शकतो.
मनुष्याच्या कल्पना शक्तीला अंत नाही.
हे वाचताना तुम्हाला एलओएल होत असणार, तुम्ही म्हणत असणार ह्याची आता सटकली आहे. मला कल्पना आहे. पण ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये.
तत्त्वज्ञानातील हा हॉट टॉपिक सुरु झाला रेने देकार्त पासून. (René Descartes in 1641 in the Meditations on First Philosophy,) त्याचे म्हणणे होते कि आपल्याला पंचेंदिरीयांतून जे ज्ञान प्राप्त होते ते खरे आहे कि तो निव्वळ भ्रम आहे. त्यतून ते सुप्रसिद्ध वाक्य आले, ‘Cogito, ergo sum’ (‘I think, therefore I am’).
१९७३ मध्ये गिल्बर्ट हार्मन ह्याला आधुनिक स्वरून दिले.आणि १९८१ साली हिलरी पुटनामने त्याच्यावर अधिक काम केले. BIV म्हणजे ब्रेन इन अ व्हॅट चा कंसेप्ट ह्या दोघानीच पुढे आणला.
मग आपण BIV मध्ये आहोत कि नाही? हे कसे सिद्ध करायचे? ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. ती केवळ ज्यांनी त्या विषयाचा कसून अभ्यास केला आहे त्यांनाच समजावी अशी आहे. अजून डोक्याला शॉट लावून घेण्यात अर्थ नाही.
विज्ञानकथा लेखकांची मात्र चंगळ झाली. ही कल्पना वापरून अनेक कथा लिहिल्या गेल्या. अनेक सिनेमे बनवले गेले. त्यांची यादी आपल्याला विकिवर मिळेल. (https://en.wikipedia.org/wiki/Brain_in_a_vat)
आपले कितीतरी आवडीचे सिनेमे ह्यात आहेत. ह्यात प्रमुख म्हणजे “द मॅट्रिक्स” ह्या सेरीज मधील तीन सिनेमे.
ह्या यादीतील मला आवडलेला म्हणजे “डोनोवान’स ब्रेन” ही कथा १९४२ साली लिहिण्यात आली. त्यावर आधारित एकूण तीन पिक्चर आले.
The Lady and the Monster (1944), Donovan's Brain (1953), and The Brain (1962). ह्या पैकी दोन The Lady and the Monster (1944), and The Brain आपण यू ट्युब वर बघू शकता. वेळ असेल तर अवश्य पहा.
कवटीत भुस्सा भरलेले लोक.
Submitted by केशवकूल on 23 August, 2024 - 08:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Is this a fiction or a wiki
Is this a fiction or a wiki type article?
छान लेख आहे. समजला.
छान लेख आहे. समजला.
लहान मुलांच्या 'मटिल्डा' (Matilda) चित्रपटात पण अशा काही गमतीजमती आहेत. जरूर बघा. मानवी शरीरातील best and worst asset आहे मेंदू. एकाचवेळी दोन्ही आहे.
अमा , अस्मिता. आभार.
अमा , अस्मिता. आभार.
हे fact आहे कि fiction ह्याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. मी इतकेच सांगेन कि शास्त्रज्ञ प्रयोग शाळेत organic मेंदू बनवण्याचे प्रयोग करत आहेत. कुणाच्या प्राण्याच मेंदू वापरून फायटर प्लेनचा सिम्युलेटर चालवण्याचे प्रयोग पण झाले आहेत.
तुम्ही matrix बघितला असेल ना. तुमचे काय मत आहे?
अस्मिता Matilda वाचले आहे.
छान लेख.
छान लेख.
छान लेख.
छान लेख.
मग आपण BIV मध्ये आहोत कि नाही? हे कसे सिद्ध करायचे? >>> कोणापुढे सिद्ध करायचे?
जर कुणी BIV मध्ये नसणारी दुसरी व्यक्ती मला विचारते आहे आणि ते माझ्या पर्यँत पोचते आहे आणि मी जे सांगणार हे तिला कळणार असेल तर मी BIV मध्ये नाही आणि हे तिलाही माहीत असायला हवे.
जर मी BIV आहे तर हा प्रश्न फक्त तो सुपर संगणक माझ्या मेंदूत घुसवतो आहे आणि माझे उत्तरही तोच नियंत्रित करणार, मग मी काही सिद्ध कसे काय करू शकेन?
छान लेख आहे. समजला. Happy
छान लेख आहे. समजला. Happy
+७८६
पिक्चर बघणे होणार नाही
एखादा आवडलेल्या पिक्चरची कथाच लिहा तुमच्या शैलीत..
मानव
मानव
"मी" म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. केवळ तो जार मधला मेंदू. आणि संगणक. समजा संगणक ज्ञानेन्द्रीयाचे काम करतो आहे. पण विचार करण्याचे काम मेंदूच करत आहे. मेंदू conscious आहे. त्याला "अहं"भाव आहे. काय अक्शन घ्यायची हे तोच ठरवतो आहे. त्याप्रमाणे संगणक "action taken" असा फीडबॅक त्याला देतो. अशा मेंदूला ( जसा गेले २५००० वर्षे होत आहे त्यापमाणे ) कोSहं असा विचार येऊ शकतो. त्याचे उत्तर काय?
मेंदू विरहित पण शरीर आहे. ह्यात समजा spinal cord एका प्रक्षेपकाशी (send/receive transmitter)जोडला आहे. हा सुपर संगणकाशी कम्युनिकेट करतो आहे. संगणक जार मधल्या मेंदूशी जोडलेला आहे. असा माणूस जगात वावरत आहे. तर प्रॉब्लेम साधा आहे. MRI केल्यावर समजेलच कि ह्याला मेंदू नाहीये.
आता ठरवा
"मी" कोण आहे? "मी" चे स्थान -location-- कुठे आहे?
ओके आले लक्षात. छान मांडलेय
ओके आले लक्षात. छान मांडलेय तुम्ही.
मानव पृथ्वीकर मला वाटतय कि
मानव पृथ्वीकर मला वाटतय कि तुम्ही ठरवले आहे कि केकुशी बोलण्यात अर्थ नाही. ह्याचा ब्रेन कवटीत नाही, गुढघ्यातही नाही तर मटक्यात आहे. तेव्हा इथेच बंद करावे.
लेख बराचसा व मानव यांनी
लेख बराचसा व मानव यांनी विचारलेला प्रश्न व त्यास दिलेले उत्तर हे काही प्रमाणात कळले. मानव यांनी विचारले की 'कोणापुढे सिद्ध करायचे'! मला विचारावेसे वाटले की 'का सिद्ध करायचे'! (म्हणजे आपणहून कशाला सिद्ध करायचे की आमच्या कवटीत भुस्सा आहे असे विचारायचे नसून, असे विचारायचे आहे की मुळात हा प्रश्नच कोणाला का पडेल आणि त्याचे उत्तर द्यायची जबाबदारी घ्यावीच का लागेल! यालाच कवटीत भुस्सा असणे म्हणण्यात येणार असेल तर स्वागत आहे).
>>> अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते
हे वाक्य नाही कळले.
मला लेखाचा हेतूच कळला नाही. मी हे टिंगलीच्या टोनमध्ये म्हणत नसून जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहीत आहे.
शास्त्रज्ञांना व त्यामुळे एकूण मानवजातीला या अभ्यासामुळे लाभ होत असतील इतके समजू शकतो.
नाही केकू. आले लक्षात
नाही केकू. आले लक्षात म्हणजे केवळ मांडलेली कल्पना व प्रश्न नीट लक्षात आला. कसे सिद्ध करणार यावर आता ताण देऊन मग नंतर कुठे शोधुन वाचणार आणि नाही सापडले/ सापडून नाही कळले तर तुम्हालाच विचारणार.
.अशा कल्पनेच्या भरारीतून
.अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते>>
आईनस्टाईन आणि Schrodinger ह्यांनी रचलेले Thought Experiment ह्यांच्या संदर्भात लिहिले आहे. त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा पडताळा घेणे हे प्रत्यक्षात शक्य नव्हते म्हणून हे Thought Experiment डिझाईन केले गेले. BIV हा मला वाटत हा असाच एक Thought Experiment आहे. आपल्याला जे ज्ञान होते त्यावर ते कितपत विश्वासार्ह आहे. Ontology म्हणून तत्वद्न्यानाचा एकविभाग आहे त्याच्या अनुषंगाने.
मला लेखाचा हेतूच कळला नाही.>>> मी एक कथा लिहिली आहे. ती appreciate करता यावी म्हणून पूर्व पीठिका आहे.
ऋन्मेऽऽष आभार. ट्राय करतो.
ऋन्मेऽऽष
आभार. ट्राय करतो.
मी BIV मध्ये असेन तर आहे हे
मी BIV मध्ये असेन तर आहे हे सिद्ध करता येईल.
नसेन तर नाही हे सिद्ध होईल पण ते कळायला मी जिवंत नसेन.
म्हणजे मेंदूचा चेंदामेंदा होईल अशा रीतीने आत्महत्या करायची. उदा. हायड्रॉलीक प्रेसमध्ये वगैरे डोके ठेवून आणि प्रेसचे बटन दाबून.
मी BIV मध्ये नसेन तर अर्थात मरून जाईन. खेळ खल्लास.
असेन तर सुपर संगणक मग वेदना, चिरकांड्या सगळे सिम्युलेशन करेल पण कुठेतरी त्याला थांबावेच लागेल. त्यामुळे मी अद्याप विचार करतोय म्हणजे BIV मध्ये आहे हे सिद्ध होईल.
किंवा संगणक असे सिम्युलेशन करेल की मी खरंच आत्महत्या केलीच नाही, स्वप्न पहात होतो आणि खाडकन जाग आली. मग मी परत आत्महत्या करतो, संगणक परत ते स्वप्न होते असे सिम्युलेट करतो असा इन्फिनिटी लूप होऊ शकतो. पण असा लूप झाला की मी BIV मध्ये आहे हे सिद्ध होईल आणि मी लूप ब्रेक करू शकतो.
मस्तच लेख. BIV भारी आहे.
मस्तच लेख. BIV भारी आहे.
मानव
मानव
तुमचा प्रतिसाद भारी आहे पण Destructive testing ची ही पद्धत मान्य नाही. कारण सर्व साधारण म्हणजे normal माणूस असे काही करणार नाही. तात्विक चर्चा डोक्यावरून जात आहे म्हणून माझ्या पुरते तरी ह्या प्रश्नाचे उत्तर सापडणे कठीण आहे.
@मामी आभार.
छान लेख आहे.
छान लेख आहे.
मानव यांच्या प्रयोगाची सौम्य
मानव यांच्या प्रयोगाची सौम्य आवृत्ती म्हणजे उपोषण करणे. जर मेंदू शरीरात असेल तर त्याला पोषणद्रव्ये मिळणार नाहीत, त्यामुळे तो क्षीण होत जाईल, पण जर VAT मध्ये असेल तर क्षीण होणार नाही. त्यावरून कळेल.
कि तो संगणक VAT मधील ऊर्जा पुरवठा नियंत्रित करून उपोषण सिम्युलेट करेल ? तसे असेल तर मानव यांच्या उदाहरणातला मृत्यूसुद्धा VAT मध्ये घातक विषारी रसायने किंवा उच्च दाबाची विद्युत वापरून सिम्युलेट करता येईल. म्हणजे अगदी VAT मध्ये असेल तरीही तो मेंदू कायमचा निकामी होईल. (कि त्या मेंदूला धोका पोचेल असे काही संगणक करत नाही?)
तर VAT मधील सिम्युलेशन च्या अटी शर्ती काय आहेत त्यावर अवलंबून आहे.
तुम्ही BIV मध्ये नसून भौतिक
तुम्ही BIV मध्ये नसून भौतिक जगात जगत आहात हे पटण्यासाठी जे काय सिम्युलेशन लागेल ते सगळे / कुठलेही सिम्युलेशन संगणक करतो. भूक लागली, जेवलो ते काही कारणामुळे जेवलोच नाही दिवसभर, किती थकलोय, चक्कर येतेय वगैरे सगळं. तेव्हा उपोषण केल्याने मेंदु क्षीण होतोय वगैरे सगळेच त्यात आले.
म्हणुन मेंदु पूर्ण काही क्षणात नष्ट करून पहाणे हेच एक उरते.
ते अर्थात उत्तर नाही पण प्रश्न किती गहन आहे दिसुन येते. केकुंनी लिहिल्या प्रमाणे हा जसा प्रश्न कुणाला पडला तर तो असे काही करणार नाही, तार्किक/तात्विक विचाराने याचे उत्तर शोधेल यात एखादा नॉन डिस्ट्रिक्टिव्ह एक्सपरिमेन्ट चालेल जो सामान्यतः कुणी करू शकेल पण त्यातुन काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.
असे सिम्युलेशन कुणी करत असेल तर त्याला तार्किक/तात्विक उत्तर असणे अशक्य/महा कठीण आहे.
आपल्या हयातीत कुणी सोडवलेच तर कळेल.
<<म्हणजे अगदी VAT मध्ये असेल तरीही तो मेंदू कायमचा निकामी होईल. (कि त्या मेंदूला धोका पोचेल असे काही संगणक करत नाही?)>>> संगणक फक्त सिम्युलेशन सिग्नल्स देतो, फिजिकली काही करत नाही. त्याला कायमसाठी खेळ बंद करावा लागेल मृत्यू सिम्युलेट करायला.
समजा त्या मेंदूत संवेदना
समजा त्या मेंदूत संवेदना ग्रहण करण्याचे मग त्यावर विचार करण्याचे स्थान सापडले आहे. तर त्यास त्या संवेदना दिल्यावर तो त्यावर विचार करून इतर अवयवांच्या स्नायूंना आज्ञा देईल.
असे सिम्युलेशन कुणी करत असेल
असे सिम्युलेशन कुणी करत असेल तर त्याला तार्किक/तात्विक उत्तर असणे अशक्य/महा कठीण आहे.>>>
मानव आणि माबो वाचक. छान चर्चा. मी जेव्हढे वाचले आहे त्या प्रमाणे लोकांनी तर्कशास्त्र वापरून हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
मी मात्र ह्याकडे विज्ञानकथेचा एक trope म्हणून बघतो.
Srd >>तुम्ही म्हणता तेच ह्या प्रयोगात अभिप्रेत आहे.
ज्यावर आजकाल अनेकदा विचारमंथन
ज्यावर आजकाल अनेकदा विचारमंथन होते अशा विषयावरचा लेख आणि त्यातील चित्रपटांच्या लिंक्स पाहून आश्चर्ययुक्त छान वाटले. इतके चित्रपट या विषयावर आहेत माहित नव्हते. "Consciousness" हा आजवर अनेकांच्या कुतूहलाचा/संशोधनाचा/तत्त्वज्ञानाचा विषय झालेला आहे. याबाबत solipsism हि कल्पना काही तत्वज्ञांनी मांडलेली आहे. त्यानुसार, आपले अस्तित्व म्हणजेच विश्व. "अस्तित्व फक्त आपले एकट्याचेच आहे. बाकी सर्व विश्व म्हणजे भास आहेत" असे solipsism सांगते. त्यानुसार आपण झोपी जातो तेंव्हा विश्वाचे अस्तित्व नष्ट होते. टेक्निकली, अवस्थेचा विचार केल्यास, मृत्यू मध्ये फार वेगळे घडत नाही. फरक इतकाच कि झोपेतून जाग येते तेंव्हा "संदेश" पुन्हा प्रोसेस व्हायला सुरु होतात, तर मृत्यूमध्ये संदेश पुन्हा प्रोसेस होत नाहीत.
मानवनी खूप interesting मुदा मांडला आहे. आपण कोणाच्या प्रयोगशाळेत असू तर ते सिद्ध करणे मात्र शक्य नाही. कारण तशी recursions असतील तर अनंत असू शकतात. हे Multiverse ची कल्पना सुद्धा सांगते कि तसे काही असेलच तर इतर विश्वे अनंत असू शकतात. ज्याबाबत आताच्या मेंदूला (खूपच अप्रगत आहे बिचारा) कधीच कळू शकणार नाही.
अतुल
अतुल
आभार!
इतके चित्रपट या विषयावर आहेत माहित नव्हते.>> मी पण एक कथा पाडली आहे. "परबची अजब कहाणी."
परबच्या कहाणीचा शेवटचा भाग https://www.maayboli.com/node/85527
केकुशी बोलण्यात अर्थ नाही.
केकुशी बोलण्यात अर्थ नाही. ह्याचा ब्रेन कवटीत नाही, गुढघ्यातही नाही तर मटक्यात आहे.>>>>
लेख पहिल्यांदा वाचला तेव्हा असेच वाटले. पण परबाच्या कहाणीचा अंत वाचल्यावर थोडेफार कळाले.
थॉट एक्स्पेरिमेंट जबरी आहे.
भारी लेख व चर्चा!! हे movies
भारी लेख व चर्चा!! हे movies माहित नव्हते आता शोधते. मॅट्रिक्स आवडतो बघायला दरवेळी त्यातून नवीन लिंक कळते, पण नेटफ्लिक्सला आहेत त्यांचे आवाज इतके हळू आहेत की volume २४ वर ठेवले तर जरा समजते तेही विथ subtitle .. पण music मात्र जोरात वाजते..
कदाचित अति अवांतर >>
"Consciousness" हा आजवर अनेकांच्या कुतूहलाचा/संशोधनाचा/तत्त्वज्ञानाचा विषय झालेला आहे.>> yess .. एक map of Consciousness पण आहे google केल्यावर मिळेल. असा एक मतप्रवाहही आहे की आपण ३d मॅट्रिक्समध्ये आहोत म्हणजे इथे प्रत्येक बाबतीत द्वैत आहे. प्रत्येक भावनेला विषयाला बाजू आहेत , चांगले-वाईट, पॉसिटीव्ह-नेगेटिव्ह, डावे -उजवे, वर-खाली.. आपल्या बिलीफ सिस्टिम / डीवाइड अँड रुल / रीती / श्रद्धा .. मॅनिप्युलेशन / कपट ... अमुक ढमुक समुक यामुळे काय चांगले काय वाईट असे आपण आपल्यात ठरवून मोकळे होतो व लेबल लावतो.. व यातून भीती guilt ego वगैरे वाढीस लागते map of Consciousness प्रमाणे आपण आपल्या वागण्यात बदल करत गेलो व वर वर चढत गेलो तर एकदिवस आपण हे मायाजाल / मॅट्रिक्स तोडून आपण higher dimensional लेवल ला जगण्यासाठी लागण्याच्या freq ला पोहोचू जिथे सगळीकडे फक्त पॉसिटीव्हिटी , oneness gratitude abundance unconditional love हे सगळे असेल.. अजून खूप काही.. सध्या थांबते.. सॉरीssss फॉर अवांतर
anjali_kool
anjali_kool
आता ही कथा वाचा वाचली नसेल तर
https://www.maayboli.com/node/85527
yess !! मस्तय हे ..कवटीतला
.
anjali_kool
anjali_kool
कित्येक हजार वर्षांनंतर आपण इथे पोहोचलो आहोत. असेच कित्येक हजार वर्षांनंतर तुमच्या "अवांतर" मधेही पोहोचू. आमेन!
असेच कित्येक हजार वर्षांनंतर
असेच कित्येक हजार वर्षांनंतर तुमच्या "अवांतर" मधेही पोहोचू. आमेन!>> इतका वेळ नाही लागणार लवकरच..फार फार तर शे वर्ष..! आपली नावे तेव्हा वेगळी असतील तुम्हाला के कु आठवणार व मला अं कु सुद्धा !! हाहा !
आज ऑफिस चा सोमवार आहे आणि हे
आज ऑफिस चा सोमवार आहे आणि हे शीर्षक इतकं चपखल बसत आहे ना, काय सांगू
Pages