पोपटवाला

Submitted by बिपिनसांगळे on 9 August, 2024 - 12:55

पोपटवाला

सकाळची वेळ. नऊ वाजलेले. आकाश धुरकट रंगाचं. बरसो - ह्या ऑर्डरची वाट पहात थांबलेले ढग . पण नुसतेच .
शनिवार वाड्याचा पूल गजबजलेला होता . मागे आकाशाचा हे विस्तीर्ण पट .
कालच्या अती पावसाचा पूर गायब झालेला .
पुलावर भविष्य सांगणारा शंकरण्णा बसलेला होता .पोपट घेऊन .
गेले दोन दिवस पडण्याऱ्या पावसामुळे तो वैतागला होता. त्याला पुलावर बसता आलं नव्हतं. बरं - पुलासारखा धंदा दुसऱ्या ठिकाणी आणि कुठे नव्हता.
आज पाऊस नव्हता आणि त्याच्या खिशात पैसाही ! त्याला भूक लागली होती. पोटात कावळे कोकलत होते. त्यामुळे तो गिऱ्हाईकांची चातकासारखी वाट पहात होता. पहिलं गिऱ्हाईक झाल्याझाल्या तो एक गरमागरम वडापाव खाणार होता,एक स्पेशल चहा पिणार होता.एकदम कडक ! म्हणजे पुढच्या गिऱ्हाईकाला पटवायला त्याला जोम आला असता .
समोरून एक तरुण येत होता . आनंदात , उत्साहात . हूडी घातलेला . त्याने त्याला थांबवलं. तोही थांबला . शंकरअण्णाने पिंजऱ्याचं दार उघडलं. त्याचा तो लहानसाच पोपट बाहेर आला. त्याने समोर पसरलेल्या चिठ्ठ्यांकडे पाहिलं व डौलात एक चिठ्ठी काढली आणि तो परत त्याच्या पिंजऱ्यात गेला .
काय असेल त्या चिठ्ठीत ? …
आज तुम्हाला जीवनसाथी भेटेल !
तो तरुण खूष झाला त्याने विचारलं , ' किती झाले ?'
‘पन्नास ‘.
‘पन्नास ? पाच मिनिटं थांब शंभर देतो ... ‘
असं म्हणून तो तरुण भरभर कॉर्पोरेशन बसस्टँडच्या दिशेने निघूनही गेला . शंकरअण्णा विचारात पडला .त्याला कळायच्या आत तो गेलाही होता . तो परत येण्याची काही गॅरंटी नव्हतीच .
तो तरुण पुलावरून खाली स्टॅंडकडे जाणाऱ्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या पटापट उतरू लागला. तो स्टॅन्ड मोठा होता . अनेक ठिकाणी जाणाऱ्या बसेसचे अनेक स्टॉप तिथे होते .तिथे त्याची आवडती पोरगी थांबलेली असायची . ह्या वेळेला रोज , तिच्या स्टॉपवर . आज तिच्याशी काय ते एकदाचं त्याला बोलून टाकायचंच होतं .
त्यात ती चिठ्ठी !
तो पायऱ्या उतरतच होता . इतक्यात -
ती एका बाइकवाल्याच्या मागे बसून जाताना त्याला दिसली. तिने एक नजर याच्याकडे टाकली . तिला तो तरुण माहिती होता . आणि तिच्या त्या नजरेत सगळं चित्र सामावलेलं होतं… त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना .
तो तिरमिरीत पायऱ्या चढून पुन्हा पुलावर आला. शंकरअण्णाकडे बघत तो जाऊ लागला . शंकरअण्णाने त्याला हात केला; पण तो पोरगा रागाने डोळे मोठे करत, त्याच्या अंगावरून सरळ निघून गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं .
त्या पोराचं काहीतरी बिनसलंय, हे अण्णाच्या लक्षात आलं; पण त्याने मग काही त्याला थांबवलं नाही .
पोरगा लांब गेला .
अण्णा त्याच्या पेरू खाणाऱ्या पोपटाला म्हणाला , ' त्या देवाकडे कुठला पोपट आहे कोणास ठाऊक ? त्याने चुकीचीच चिट्ठी काढलीये साली ! माझ्या नशिबाची !'
तो डोक्याला हात लावून नजर खाली घालून बसला .
त्याच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांचाही आता पोपट झाला होता.
xxx

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लघू कथा...
अजून एक शक्यता त्या तरुणाला साक्षात्कार होतो . तो जिच्यावर प्रेम करत होता तिचं प्रेम कुठं होतं त्याच्यावर. एकतर्फी प्रेमाचा भ्रमाचा भोपळा फुटला म्हणून तो दहा रुपये पोपटवाल्याला देतो आणि या क्षणी त्याला खूप हलकं वाटतं. तो गुणगुणतो...
छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए
ये मुनासिब नहीं आदमी के लिए
प्यार से भी ज़रूरी कई काम हैं
प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए

"जीवनसाथी मिळण्यासाठी प्रयत्न करू नयेत, प्रयत्न न केल्यास जीवनसाथी मिळू शकेल, प्रयत्न केल्यास पोपट होईल" अशी एक चिठ्ठी तिथे असायला हवी होती.

छान आहे कथा.
मला वाटलं त्याच्या आयुष्यात आलेल्या 2 3 मुली वेगवेगळ्या प्रसंगात त्याला भेटतील आणि मग त्याला पेच पडेल नक्की कोणाला निवडाव Wink

छान आहे Happy

बाकी पोपट घेऊन भविष्य सांगणे यावर लोकं कसे विश्वास ठेवायचे याचे आश्चर्य वाटते.
ते कसली तरी चित्रांची कार्ड असतात त्यावरून सुद्धा भविष्य सांगणे त्यातलेच..
बहुधा tarot card म्हणतात त्याला.. ते टॅरट आणि हे parrot.. यमक सुद्धा आहे.

टॅरोने भविष्य सांगता येत नाही. तुमच्याच विचारांना चालना मिळून एक क्लॅरिटी येते. पूर्वीपासून प्रतिकांचा वापर आणि प्रतिकांतून मेंदूस , सबकॉन्शस (अमूर्त मन)ला मिळणारी चालना सर्वज्ञात आहे. यावर काही रिसर्च झालाय का माहीत नाही.
टॅरो ही 'द फूल' या पात्राची ७८ प्रसंगांतून केली गेलेली जर्नी आहे. तुम्ही एक किंवा ३ वगैरे कार्डे निवडता. जो किंवा जे काही प्रसंग सामोरे येतील त्यातून तुम्हीच अर्थ लावता. आणि ते पटतात, क्लॅरिटी देतात. कदाचित अमूर्त मन आपल्याला गाईड करते.
किंवा रिव्हर्स इंजिनीअरिंगही असेल की आपणच सोईस्कर अर्थ काढायचा व नंतर टाळ्ञा पिटायच्या की तो अर्थ पटला, क्लॅरिटी आली म्हणुन.
पण मी जी स्वतःकरता रिडींग्ज घेतलेली आहेत ती ८९-९२% खरी आलेली आहेत.

सामो जवळपास काहीच समजले नाही.
बहुधा समजून घ्यायला उदाहरणे गरजेची असावीत.
जर भविष्य किंवा चमत्कार नमस्कार नसेल आणि मानसशास्त्राशी निगडीत असेल तर जाणून घ्यायला आवडेल. मायबोली किंवा इतर कुठे यावर अजून सविस्तर आणि मराठीत कोणी लिहिले असेल तर वाचायला आवडेल.

सामो,
तिथे पहिल्या भागात असे लिहिले आहे
>>>
जसे आपले ज्योतिष शास्त्र आहे तसेच. परन्तु हे शास्त्र जास्तीत जास्त ३ ते १२ महिन्या पर्यन्त चे भविष्य सांगू शकते.
>>>

म्हणजे भविष्य सांगणारी विद्याच म्हटले आहे.
तिथे दुसराच प्रतिसाद माझा आहे.
तरी बघतो पुढचे भाग सवडीने..
इथे आता फार अवांतर नको. धागाकर्ता क्षमस्व Happy

>>>>>>>.परन्तु हे शास्त्र जास्तीत जास्त ३ ते १२ महिन्या पर्यन्त चे भविष्य सांगू शकते.
ते मला पटत नाही मी फक्त मराठीतील माहीती पास ऑन केलीये.