तुझ्यासवे तुझ्यामनी

Submitted by कविन on 4 August, 2024 - 09:31

श्वास तुझा; भास तुझा
तुझाच ध्यास हा मनी
तुझ्याविना ही राधिका
रितीच भासते वनी

कृष्ण सखा; मी तुझा
तुला गुपित सांगतो
ऐक तू, तुझ्यासवे
मलाच मीच ऐकतो

तुझाच मी, तुझ्यात मी
पहा जरा तुझ्या मनी
डाव रंगतो अता
तुझ्यासवे तुझ्यामनी

(जुनीच आहे. इथे आणायची राहिली होती याची आठवण आज झाली कुठलातरी मित्रदिनाचा फॉर्वर्ड वाचताना)

Group content visibility: 
Public - accessible to all site users