आम्ही बराच वेळ ऑफीस जवळच्या लेक वर घालवला... आजची संध्याकाळ खुप रम्य वाटत होती... बाकावर बसुन पाण्या कडे एकाग्रतेने पहाणार्या स्टिव्ह चा गोरा गोमटा, तरतरीत नाक, तांबुस डोळे असलेला चेहरा बघतच रहावा अस वाटत होत... जणु त्याला मनभरुन पहाण्यासाठी मन कासाविस होत होत.... मी स्टिव्ह ला निहाळत होते आणी का कुणास ठाऊन पण.... आमची पहिली भेट मग ३-४ महिन्यांनी आमच गराज मध्ये भेटण.... त्या दिवशीच डिनर....ईंडिया बजार ला भेटण... सोबत घालवलेले क्षण .... माझ्या साठी रुम शोधण....मागच्या ६ महिन्यांचा आढावा मन घेत होत... मी बेभान पणे त्याला बघत होते.... तो ही पापणी ही न हलवता पाण्याकडे बघत कुठल्याश्या विचारात गुंतला होता.... काही क्षण असेच संध्यामय झाले .... अचानक त्याने माझ्या कडे बघितल आणी आमची नजर भेट झाली... आज प्रथमच त्याच्याशी नजर भेट झाल्यावर माझी नजर पुन्हा त्याच्या कडे बघण्यास चाचरत होती.... तो उभा राहिला आला नी त्याने विचारल ... अस्ताला जाणार्या सुर्याच्या केशर छटांनि रंगलेल पाणी बघण्या एवजी मी त्या पाण्या कडे पाठ करुन का उभी आहे आणी कसला विचार करतेय, कुठे बघतेय....
"स्टिव्ह, ह्या मावळत्या क्षणी मी माझ्या मनात उगवलेल्या भावनांच्या सुर्याची किरण तुझ्या पर्यंत पोहवण्याचा प्रयत्न करत होते... अधिरतेने तुझ्या कडे पहात असतांना तुझ्या डोळ्यात स्वःताला शोधत होते"....... त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात बघुन हेच सांगावस वाटल मला पण मी स्वःताला आवरल... आम्ही परत निघालो त्याला भुक लागली होती पण मला रुम वर जायचय अस मी म्हणाले तर तो आधी मला सोडायला आला... मला रुम वर ड्रॉप करुन करुन तो निघुन गेला... मला खुप अस्वस्थ होत होत.... पाणी प्यायच म्हणुन मी फ्रीज कडे वळाले तर मला एकदम लक्षात आल अरे हा त्याच्या ऑफीसमधुन माझ्या ऑफीसला आला आणी आम्ही लेक वर गेलो ....वाटेत तो म्हणालेला आज खुप काम असल्याने सकाळ पासुन पाणी पीण्याची हि उसंत त्याला मीळाली नाही आणी मेगनचा त्याला माझ्या रुम साठी फोन आला तर तो तसाच माझ्या ऑफीसला मला हि बातमी द्यायला आला....
छे! किती भुक लागली असेल त्याला आणी त्याने सांगुन सुद्धा आपण डिनर ला न जाता त्याला रुम वर सोड म्हणालो आता तर रेस्टॉरंटस ही बंद झाले असतील.... लेक वर बसण्याचा आग्रह हि माझाच होता....... कशी ना मी पण स्वःताच्याच तंद्रित होते... काय करु, काय करु, ह्या विचारात त्याला फोन करुन परत बोलावुन घेवु आणी गरम गरम करुन वाढु हे सुचल... त्याला फोन केला... तो अर्ध्या वर परतला होता पण तरीही माझ्या सांगण्यावर परत माझ्या रुम कडे वळाला
आज ६ महिन्यात प्रथमच तो रुम वर येत होता... बरेचदा त्याने मला रुम वर ड्रॉप केल पण वर कधी आला नाही वा मी बोलावल नाही... तो येईपर्यंत पटकन काहीतरी बनवुन ठेवु ... पटकन काय होणार तर माझा आवडता पास्ता.... पास्ता गॅस वर चढवुन मी फ्रेश झाले आणी दुसरी तयारी करु लागले.... कांदा चिरता चिरता तो दिवस आठवला........
......ऑफीस मधुन निघाले पण रुम वर जाण्याचा अजीबात मुड नव्हता, काय करायचय घरी जाऊन त्यात आज शुक्रवार म्हणजे पुढचे दोन दिवस ऑफीस नाही... किती कंटाळा येईल... सोनु पण नाही, ती असती तर तिच्या सोबत शॉपींग ला जाता आल असत, मुव्हि बघायला गेलो असतो, दोघिंनी मिळुन विकएंड मस्त एनजॉय केला असता ह्या विचारात रुम च्या दिशेने गाडी नेत होते आणी एकदम गाडी खाली गेल्याच जाणवल, गाडी थांबवुन पाहिल तर मागच चाक चिप्पट झालेल... एक बर की गराज जवळच होत कशीबशी गाडी तीथवर नेली आणी गाडी तयार होण्याची वाट बघु लागले...
... गराज च्या टेबला वर पडलेल मासीक वाचता वाचता जरा नजर वर केली आणी "अरे हा तर स्टिव्ह".. माझ्या आधिच्या ऑफीसातला माझा ईटालीयन कलीग... वाटल जाऊन त्याला हाय म्हणाव पण दुसर्याच क्षणी वाटल नको जाऊ दे कशाला उगाच आपण स्वःताहुन जायच त्याने ओळखल नाही तर... होतोच किती दिवस सोबत आपण... तो प्रोजेक्ट वर रुजु झाला आणी पुढल्या दोन आठवड्यात माझ प्रोजेक्ट वरच काम संपल... मी नव्या प्रोजेक्ट वर नव्या जागी रुजु झाले... निटशी ओळखही झाली नव्हती आमची पण त्या १०-१५ दिवसात एक ओढ की आकर्षण??? निर्माण झाली होती मनात त्याच्या बद्द्ल..... त्याच्याशी बोलतांना त्याच्या सोबत काम करतांना मनातुन आनंद व्हायचा कधी कधी तो जवळ च्या खुर्ची वर येवुन बसायचा कींवा माझ्या खुर्ची मागे येवुन उभा रहायचा तेव्हा मला शहारे यायचे... आपल्यात काही waves आहेत जाणवायच... मी माझ्याच विचारात होते तोच मोठ्याने गराज मध्यल्या एका गाडी चा हॉर्न वाजला आणी मी भानावर आले.. स्वःताशीच हसुन पुन्हा मासीकात डोक घातल... मनात आल बघुया त्याच आपल्या कडे लक्ष जात का आणी गेलच तर तो ओळख दाखवतो का...
"हाय निर्राली" मी मासीकातुन नजर वर घेतली तर स्टिव्ह समोर उभा होता. "ओ हाय हाऊ आर यु"...
हाय-हलो च्या बोलण्या नंतर जुन्या ऑफीसच्या गप्पा सुरु झाल्या ईतक्यात त्याची गाडी तयार झाल्याच समजल ; मी माझ्या गाडी च विचारल तर माझ्या गाडीला अजुन बराच वेळ लागणार होता आणी गाडी एक दिवस गराज मध्ये ठेवली तर चांगल होईल गाडीतले ईतर फॉल्टस ही ठीक करण योग्य राहिल अस मेकॅनिक म्हणाला... काय कराव ह्या विचारात असताना ... स्टिव्ह म्हणाला "आय कॅन गीव यु राईड, यु कीप युवर कार ईन गराज"
थोड हा-ना करत शेवटी मी गाडी गराज मध्ये ठेवुन स्टिव्ह बरोबर निघाले... "सो वॉटस प्लॅन फॉर डिनर" स्टिव्ह ने विचारल ... "नथींग" ... गराज मध्ये बराच वेळ झाला होता... रुम वर जाऊन काय बनवायच आणी काय खायच ह्या विचारात मी होते... रुम वर पोहचायला अजुन तास भर होता .. रात्री १० वाजता काय बनवणार आपण!!! ... म्हणुन वाटेतल्या ईंडियन रेस्टॉरंट मधुन काहितरी पीक-अप कराव हा विचार केला... अर्थात स्टिव्हला तीथे जाण जमणार असेल तर... त्याला विचारल तर तो म्हणाला... मला पण डिनर करायचय तुला हरकत नसेल तर पीक-अप एवजी माझ्या सोबत डिनर कर, "आय लाईक ईंडियन फुड"...
अस जास्त ओळख नसलेल्या माणसा कडुन लिफ्ट घेण मग त्याच्या बरोबर डिनर मला जरा अस्वस्थ झाल पण मग विचार केला जास्त ओळख नसतांना हा आपली ईतकी मदत करतोय मग आपल्याला काय हरकत आहे थोड मोकळे पणा ने रहायला डिनर तर करायचय सोबत
ईंडियन कल्चर, ईटालीयन कल्चर, फॅमीली ई बाबत गप्पा करता करता आमच डिनर झाल. पालक-पनीर, मसाला भेंडी हा ईतक्या आवडिने कसा खातो याच मला जाम आश्चर्य वाटल.
डिनर नंतर त्याने मला रुम वर सोडल... उद्या सकाळी ११ ला मी तुला गराज वर सोडायला येईल म्हणाला... आणी सकाळी अगदि बरोबर ११ ला आलाही... माझी गाडी तयार होती... मनात आल घरी जाऊन आपण काय करणार त्यापेक्षा स्टिव्ह बरोबर लन्च ला गेलो तर.... पण कालच तर आम्ही सोबत डिनर केल मग आज अस कस त्याला लन्च च सांगायच!!!!... मनात एक प्रकारचा गोंधळ... कनफ्युजन होत होत... तोच तो म्हणाला "डु यु माईंड टेकींग मी टु ईंडियन स्टोअर आय वॉन्ट टु बाय ईंडियन पीकल..." ... मनात आनंदाची एक लहर आली आणी उत्सहाने मी त्याला ईंडियन बजार ला घेवुन गेले ... मग शेजारच्या मॉल मध्ये आम्ही शॉपींग केली..... ११ चे ५ कधी वाजले समजल ही नाही ... लन्च च हि भान राहिल नाही... येतांना दोघांनी कॉफी हाऊस मध्ये कॉफी घेतली आणी आपआपल्या मर्गी लागलो.... त्याला थँक्स म्हणुन मी त्याचा नोरोप घेतला... मनात थोडा संकोच होता तरी त्याला सेल नंबर दिला आणी म्हणाले "गीव मी कॉल ईफ यु वाना गो टु ईंडियन स्टोअर अगेन"
... रविवारी एकटिच निवांत पडले होते... कालचा दिवस मानातुन जाता जात नव्हता.. पुन्हा पुन्हा कालचा दिवस आठवुन मी खुश होत होते ... वाटल त्याला फोन करावा पण मग लगेच वाटल नको... त्याचा फोन यावा अस खुप वाटत होत पण त्याचा फोन नाही आला...
सोमवार पासुन पुन्हा काम सुरु झाल आणी पुन्हा शनिवार उजाडला... शनिवारी सकाळी सकाळी कुठुन कुणास ठावुन त्याचा विचार मनात आला... पण फोन मात्र आला नाही... सोनु ची मैत्रीण विकएंड साठी आमच्या बरोबर होती आम्ही तिघी गप्पा, टप्पा, खी खी करत वेळ घालवत होतो, पण मनात त्याचा विचार येत होता त्याचा फोन यावा वाटत होत... साधारण ४ च्या सुमारास माझा फोन वाजला आणी त्याचा नंबर आहे पाहुन माझा रोम रोम हर्षीत झाला... उद्या ईंडिया बजार ला येवु शकतेस का म्हणाला... अर्थात मी होकार दिला...
... असच चार-पाच वेळा ईंडिया बजार च्या निमीत्ताने आम्ही भेटलो, सोबत लंच ला गेलो...आमची ओळख वाढत होती... ह्या रविवारी तर मुव्हि ला हि जावुन आलो... पुढच्या विकएंड ला त्याला भेटण शक्य नव्ह्त... सोनु शीकागो ला मुव्ह होणार होती... तीला तीथे प्रोजेक्ट मीळाला होता... आता तीला आणी शंतनुला सोबत रहाता येणार होत... सोनु जाम खुश होती मला मात्र खुप एकट होणार होत त्यात ही अपार्टमेंन्ट सोनु च्या नावावर घेतलेली ती जाणार मग इथे एकट रहाण्या पेक्षा ऑफीस जवळ रुम बघावि वाटत होत
सोनु मुव्ह झाल्यावर मी ही रुमचा शोध सुरु केला, स्टिव्ह हि माझ्या साठी रुम शोधत होता... आमच फोन वर बोलण, भेटण वाढल होत ....खर सांगायच तर त्याला भेटल्या शीवाय त्याच्याशी बोलल्या शीवाय रहावत नव्हत... मला त्याची ओढ लागली होती...
स्टिव्ह च्या ओळखीतुन मला एक नवी रुम मिळाली १५ दिवसांनी शिफ्ट व्हायच होत.... आज हि बातमी देण्यास स्टिव्ह चक्क माझ्या ऑफीसला आला..... जरा वेळ जवळच्या लेक वर जाऊ अस मी म्हणाले ....********
पास्त्यातल पाणी उकळुन सर्रकन पातेल्याच्या बहेर आल त्या आवाजाने मी विचारातुन बाहेर आले आणी भराभरा हात चालवु लागले.... अजुन कसा आला नाही हा ४५ मी. झाले रस्ता तर ३० मीं चा आहे, मला त्याची काळजी वाटत होती, त्याला फोन करावा वाटत होत मग विचार केला अजुन ५-१० मी. वाट बघु तोवर आपला पास्ता ही तयार होईल
मी डिनर टेबल लावते होते तोच बेल वाजली मी दार उघडल... मला एक छानसा बुके देत स्टिव्ह हाय म्हणाला... त्याला भुक लागली होती आणी तो खुप थकला होता हे त्याच्या चेहर्या वरुन दिसत होत ... जास्त फॉर्म्यालिटिज न करता आम्ही डिनर टेबल वर गेलो... डिनर झाल्या झाल्य तो निघाला
आज प्रथमच तो रुम वर आला होता.... तो गेला पण त्याच्या असण्याचा भास तसाच होता... त्याने दिलेला बुके हातात घेवुन मी फुलांचा वास घेतला त्यातही त्याचाच गंध दरवळत होता...
.... सकाळी ऑफीसला निघत होते तो आईचा फोन आला.... निरु, भाऊसाहेब तुझ्या ऊत्तराची वाट पहात आहेत... निशांत ही तुझ्या 'हो' ची वाट पहातोय... मुलगा चांगलाय तुला पसंत करतो, घराण चांगलय ... अग अजुन किती लांबणी वर घालणार आहेस आज ना उद्या तुला लग्नाचा विचार करावाच लागेल एकटी किती दिवस रहाशील.... वर्ष भरा आधी मागणी घातली तुला निशांतने... तू अजुन विचारच करतेस... निशांत येतोय अमेरीकेला पुढच्या महिन्यात दोघ मीळुन काय ते ठरवा... आणी हो मागच आठवुन त्रागा करु नकोस .... घडतात गोष्टि त्या विसरुन पुढे जाव लागत....आई च बोलण दटावल्या सारख आणी आदेश दिल्या सारख वाटत होत.... तीच हि बरोबर होत माझी काळजी लागलेली असते तीला नेहमीच...
संध्याकाळी स्टिव्ह शी ह्या बाबत बोलले.... मुलगा खरच चांगला असेल तर तू लवकर निर्णय घेतला पहिजे म्हणाला... किती दुखावले मी त्याच्या अश्या बोलण्याने.... अचानक परका भासु लागला तो.. तीर्हाईता प्रमाणे बोलत होता अस वाटल... मला नको होता असा प्रतीसाद त्याच्या कडुन
का, का अस बोलला स्टिव्ह ..... माझ्या मनाची घालमेल कशी कळत नाही याला की... त्याच्या मनात काही नाही म्हणुन तो माझ मन समजुनही न समजण्याचा भाव आणतो.... त्याला फक्त मैत्रीत रस आहे आणी आपणच त्याच्या वर जीव लावुन बसलोय....... त्याच्या आयुष्यात दुसर कोणी असेल का... असेल तर आपल्याशी कधी का नाही बोलला त्या बाबत.... ह्या विचारात मी दिवस रात्र कुढत होते
... आज ह्याला स्पष्ट काय ते विचारुन मन मोकळ करायच ठरवुन मी त्याला लेक वर भेटायला बोलावल... तो आला पण खुपच टेन्स होता... स्टिव्ह च्या घरात त्याने दोन जणांना बेडरुम भाड्याने दिली होती...... ते दोघे रात्री पिऊन आले आणी त्यांनी दंगा माजवला त्यामुळे स्टिव्ह ने त्यांना घरातुन काढुन टाकल... आता त्याला नवे भाडेकरु हवे होते... घराच कर्ज फेडण्यास त्याचा पगार पुरेसा नव्हता... भाडेकरुं कडुन मीळणार्या भाड्याचा बराच आधार होता... आज त्याच्याशी काय बोलणार तो स्वःताच खुप
टेन्स होता...
.... आम्ही शांत बसलो होतो तोच स्टिव्ह म्हणला तू माझ्या घरी रहायला आलीस तर... मेगन ला तस ही तिच्या दुसर्या एका फ्रेंडने विचारलय रुम साठी... तू माझ्या कडे आलीस तर तुझ्या एवजी मेगनला तिच्या फ्रेंडला रुम देता देईल... आज प्रथमच स्टिव्ह ने मला मदत मागीतली होती... पण तो आणी मी एकाच घरात... त्याच्यावर विश्वास होता मला पण तरीही मी विचार करुन सांगते अस त्याला म्हणाले... अचानक एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता
स्टिव्ह च घर बघुन निर्णय घ्यावा म्हणुन मी त्याच घर बघण्यास गेले... त्याच्या घरातला निटनेटके पणा, स्वःच्छता, टाप-टिप बघुन मी थक्क झाले... वेगळे बेडरुम तेही समोरा समोर वा आजुबाजु नाहीत... त्याची बेडरुम वर होती... पण मनात संकोच होताच आणी कुठेतरी होकारही...
मी स्टिव्ह सोबत मुव्ह झाले... आम्ही सोबत राहु लागलो... तस त्याच्या सवयी, लाईफ स्टाईल मला अधिक समजु लागल... आठवडाभर झाला आम्ही सोबत रहात होत... "आज मी स्वयंपाक करणार तू मला, तुला आवडते त्या डिश च सामान आणुन दे मी कुक करेन", अस मी त्याला सांगीतल... 'येस मॅम" म्हणुन तो ग्रोसरी आणायला गेला.... तो काय आणतो याच कुतुहल मला होत पण!!!.... जर ह्याने काही नॉनव्हेज आणल तर.... आपण तर शाकाहारी त्यात पोर्क,बीफ वै आणल तर!!!! आज प्रथमच त्याच्या मासाहारी असण्याची धास्ती मला वाटली... आजवर आपल्या हे कधी लक्षात कस नाही आल... आपण बाहेर नेहमीच ईंडियन खायचो म्हणुन????????????????..... छे! आपला ताळ मेळ बसण कठीणच आहे
.... स्टिव्ह ग्रोसरी घेऊन आला पास्ता, पालक, पनीर.... सार शाकाहारी त्याच्या साठी पालक्-पनीर आणी माझ्या साठी पास्ता अशी त्याची फर्माईश होती... दोघांच्या आवडिचा विचार त्याने केला होता...पास्ता आणी पालक पनीर एकाच वेळी थोड ऑड काँम्बिनेशन होत पण चालणार होत...
पुढच्या आठवड्यात निशांत येणार होता त्याला माझ अस स्टिव्ह सोबत रहाण कितपत रुचेल म्हणुन त्याला ह्या बाबत सांगायच नाही ठरवल... पण त्याला उत्तर काय द्यायच?????.... स्टिव्ह सोबत रहाता रहाता त्याच घर आपलस वाटु लागत होत... ह्या घरावर, स्टिव्ह वर आपला हक्क आहे वाटु लागल होत... पण तो तस काहिच बोलत नाही... मला स्टिव्ह शीवाय दुसर्या कोणाचा विचार करण शक्य नव्हत.....
माझ्या मनाचा बांध तुटत होता.... आज मी पुन्हा निशांतचा विषय काढला तर स्टिव्ह चा चेहरा पडला... त्याला त्याच्या लग्ना बाबत विचारल तर तो म्हणाला आधी एक गर्ल फ्रेंड होती पण आमच ब्रेक अप झाल ...त्या नंतर स्टेला भेटली तिच्याशी लग्न झाल पण वर्ष भरात डिवोर्स झाला त्या नंतर मी कुणाला प्रपोज नाही केल... आता जर कुणी मला प्रपोज केल तरच मी लग्नाचा विचार करायचा अस ठरवलय... .
....मला स्टिव्ह त्याच्या मागच्या आयुष्या बद्द्ल बोलला होता आधी पण नाती तुटण्याचा ईतका खोलवर परीणाम त्याच्या मनावर झालाय हे आज जाणावल... पण मी स्टिव्ह ला प्रपोज करण मला कस जमणार हे जर मला जमल असत तर मी अविनाश ला माझ्या मनातल सांगीतल असत आणी कदचीत आज आम्ही सोबत असतो ....
निशांत ईथे आल्यावर त्याला रीसीव्ह करायला स्टिव्ह सोबत विमानतळावर गेले ... निशांतला हॉटेल वर सोडुन आम्ही परतलो वाटेत स्टिव्ह म्हणाला "निशांत ईज नाईस गाय, शीकलेला आहे, चांगल्या घराचा आहे, त्याच्या फॅमेलीत कुणाचा डिव्होर्स झालेला नाही, शाकाहारी आहे... ही ईज सुटेबल फॉर यु... तुला असाच मुलगा हवा होता ना... ..."मला तू हवा आहेस स्टिव्ह" नजरेचे कटाक्ष त्याच्या वर रोखुन त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला मी , पण तो गाडी चालविण्यात होता माझी माझ्या नजरेची आतुरता, विवशता क्षण भर हि पाहिल नाही त्याने
.... निशांतला काय ऊत्तर द्याव मला सुचत नव्ह्त.... बरीच रात्र झाली होती ...रात्रीच टिपुर चांदण, चंद्रा ची झळकती कोर ह्याने आकाश लाख्ख झाल होत, थंड झुळझुळ हवा आणी कीर्र शांतता.... मी गॅलरीत उभी होते... वरच्या गॅलरीत स्टिव्ह उभा होता... आम्ही एकमेकां कडे पाहिल आणी एक हलकी स्माईल दिली... माझे डोळे पाणावले तो खुप दुर उभा आहे आणी अधिकच दुरावतोय असा भास झाला... हा दुरावला तर कस जगु शकु आपण..... ह्या विचारने मला कंप सुटला मी धावत वर गेले... स्टिव्ह अशी कापती हाक देवुन मी स्टिव्ह ला आलींगन देवुन ढसाढसा रडु लागले "आय विल मीस यु स्टिव्ह..."....
.... मला शांत करत स्टिव्ह म्हणाला "आय टु!"..... आज त्याने काही तरी बोलाव अशी मला खुप आशा होती पण तो कहिच बोलला नाही...... मी रात्र भर झुरत होते हा का नाही मनातल बोलत??? हा प्रश्न मला सतावत होता.... कदाचीत त्याच्या मनात खरच काही नसेल आपणच भावुन झालोय हे मी स्वःताला पटवत होते...
... निशांत ला "हो" म्हणायच आणी आपण स्टिव्ह सोबत रहातो हे ही त्याला सांगायच ठरवुन मी निघाले... स्टिव्ह ला बाय करतांना ही एक आशा माझ्या मनात होती... मी निशांतच्या हॉटेल वर पोहचले ..... तीथे मेगन भेटली... तिने मला माझा निर्णय पक्का आहे का विचारल आणी म्हणाली "डु यु रीयली फील स्टिव्ह इज नॉट ईंटरेसटेड ईन यु.... केवळ कल्चर वेगळ म्हणुन तू स्टिव्हला सोडु नकोस ....तो डिव्होर्सी आहे, तुझ्या फॅमीलीत अजुन कधिच डिव्होर्स झाला नाही तेव्हा तुला तुझ्याच कल्चर मधला मुलगा हवा असेल अस स्टिव्ह ला वाटत .......
मेगन काय बोलतेय मला कळत नव्हत पण एक गोष्ट मला समजली ती ही की स्टिव्ह ही माझ्या साठी झुरतो... माझ्या मनाला बर वाटल ... स्टिव्ह च घरात अंड हि न आणण, नेहमी ईंडियन रेस्टॉरंट मध्ये जाण आणी निशांत बद्द्ल च ते वाक्य त्याच्या फॅमेलीत कुणाचा डिव्होर्स झालेला नाही>>> .... हे काय आहे........... त्याने अव्यक्त पणे व्य्क्त केलेल प्रेम ... माझ्या साठी त्याने स्वःताला ईतक बदलल पण मला ते लक्षातच नाही आल....... अजुन वेळ गेली नव्ह्ती मी घरी पोहचले स्टिव्ह ने दार उघडल आणी मी त्याला घट्ट मीठी मारली.... I Love You आज सारे संकोच, बांध सोडुन मी स्वःताला व्यक्त केल....
निशांतचा फोन आला तसे आम्ही भानावर आलो..."निराली मला तुला काही महत्वाच सांगायचय.... तू न भेटता हॉटेल वरुन निघुन गेलीस म्हणुन फोन केला... निराली मला माफ कर पण!! मी तुझ्याशी... अॅकच्युली तुला प्रपोज केल्यावर मेगन माझ्या जीवनात आली आणी आता तिच्याशिवाय... तू समजतेस ना आय एम सॉरी पण....
स्टिव्ह ची मैत्रीण मेगन आणी निशांत यांचे सुर जुळले होते, मी निशांतलाच भेटायला गेले होते हे तीला माहित नव्हत... स्टिव्ह ने कधी तिला निशांतच नाव सांगीतल नव्हत आणी तिने तिच्या बॉयफ्रेंन्ड च स्टिव्ह ला... एकंदर कम्युनिकेशन च्या आभावे आम्ही सारेच बरेच झुरलो... पण फायनली पास्ता आणी पालक पनीर एकत्र आलो... ऑड काँम्बीनेशन पण... चलता है
मला वाटलं
मला वाटलं पालक पनीर आणि पास्त्याची रेसीपी लिहिली आहेस
अरेच्या! आता अजून अॅड केलीस का गं? मघाशी अर्धवट होती.. लिहित होतीस का? नीधपला अनुमोदन
चांगलं लिहित आहेस!
सास तुझ्या
सास तुझ्या आधीच्या लिखाणांच्या नंतर हा बदल, तुझे प्रयत्न, तुझे सातत्य कौतुकास्पद आहे. मला ही कथा म्हणून खूप आवडली नसली तरी मूळ विषय आवडला. अजून जास्त फुलवता आला असता असं वाटतं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
शैलजा, ....
शैलजा,
.... आभार
हो मी अर्धवट टाकली होती आधी नंतर १०-१५ मीं नी पुर्ण केली
निधप,
आभार! ... तुम्ही सांगितल्या प्रमाणे आपण बोलतो तसे ऊकार, वेलांट्या द्यायच्या प्रयत्न मी करत आहे ....
सायोनारा, आभार
मलाही
मलाही आवडली गोष्ट.
छान कथा,
छान कथा, सास. लगे रहो.
------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सास सुंदर
सास
सुंदर आहे कथा. एकदम सहज वाटली , आणि मनाला स्पर्षुन गेली. ( नायिकेच्या भावना अगदी मस्त उतरल्या आहेत लिखाणातुन)
आजचा रविवार तुझ्या कथेने मस्त सुरु झाला.:)
मस्त!!
मस्त!! आवडली कथा!
========================
बस एवढंच!!
मस्त!!
मस्त!! आवडली!!
www.bhagyashree.co.cc
छान झालीय
छान झालीय गोष्ट. अजून खुलवली असती तर जास्त चांगलं झालं असतं. मधे मधे तुटक वाटली.
पण एकंदर आवडली.
छान
छान लिहिलिये..
पुलेशू..
मस्त आहे
मस्त आहे कथा, आवडली.
सुपर मॉम,
सुपर मॉम, रीमझीम, अक्षरी, bsk, ट्युलीप, adm, जोगळेकर सगळ्यांचे आभार
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली. छानच आहे.
आवडली!
आवडली!
मला पण
मला पण आवडलि.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
आवडली.
आवडली. ह्म्म.. एकदम स्पर्शून गेली मनाला.
छान आहे.
छान आहे.
सुंदर,सहज्.
सुंदर,सहज्...छान कथा .
खुप चान
खुप चान आहे
चांगली
चांगली वाटली कथा. पण एक समजल नाही निशांतचं अमेरिकेत आल्या आल्या लगेच मेगनशी कस जमल?
छान
छान कथा...आवडली...
सहीच.. हलकी
सहीच.. हलकी फुलकी कथा.....
--------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
छान आहे.
छान आहे. आवडली.
छान आहे
छान आहे कथा........आवडली
*******************
सुमेधा पुनकर
*******************
आवडली. आणि
आवडली. आणि शेवट गोड झाला ते पण आवडलं. नायिकेला नायक मिळाला.
फक्त मला हि कथा न वाटता एक घटना कुणीतरी आपल्याला सांगत आहे असे वाटले. थोडी कथेच्या फॉरमॅट मधे लिहीलीस तर अजुन भावेल. हे झालं माझं मत.
कथा छान
कथा छान आहे, फक्त मेगन आणि निशांत कुठे कसे भेटतात प्रेमात पडायला ते नाही कळलं.
कथा छान.
कथा छान.
कथा आवडली
कथा आवडली
स्टोरी
स्टोरी लाईन छान आहे. कथा आवडली. अजून फुलवता आली तर बघ!!
Pages