Alien Contact

Submitted by Mandar Katre on 21 July, 2024 - 13:49

The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA

हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे. मी ताबडतोब रिप्लाय दिला ते ठीक आहे मला तुमच्याकडील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे गॅजेट ताबडतोब पाठवून द्या. एवढे बोलल्यानंतर कोणताही मेसेज आला नाही.

मी हा विषय विसरून गेलो आणि आठ दिवसांनी माझ्या पत्त्यावर एक पार्सल आले. मी आश्चर्यचकित झालो कारण मी कोणते पार्सल ऑर्डर केले नव्हते तरीपण मी उत्साहाने ते पार्सल उघडले तर त्यामध्ये एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने युक्त गॅजेट होते ज्यायोगे करोडो प्रकाशवर्ष अंतरावरील गॅलेक्सी शी संपर्क साधू शकत होतो. मी आश्चर्यचकित झालो.

त्या रात्री मी ते गॅजेट ऑन केले आणि काही मिनिटात माझा संपर्क गॅलेक्सी टू वन नाईन एट शी झाला. तेथील आकाश हवा पाणी वातावरण सर्व एकदम निराळे होते. तिथे भाषा अशी नव्हती. सर्वजण एकमेकांशी मानसिक भाषेने म्हणजेच टेलिपॅथी नें संपर्क साधत होते. तिथले रहिवासी मला म्हणाले की भाषा वापरून एकमेकांना संबोधित करणे ही एकदम प्राथमिक लेव्हल आहे. आम्ही भाषा वापरात नाही. इथे सरकार वगैरे काही नाही. प्रत्येक राहिवश्याला एक कार्ड दिले जाते ज्यावर त्याला महिन्यभर लागणारे सर्व जीवनावश्यक वस्तू भरपूर मिळतात. इथे पैसा नाही.... त्यामुळे कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. सगळे समान आणि सगळे सारखेच महत्वाचे... आम्ही इथे आनंदात राहतो. Cosmic Bliss मध्ये राहतो. माझ्या मर्यादित माहितीनुसार मी विचारले की हा स्वर्गलोक आहे का? तर ते म्हणाले असं काही नाही पण तुला वाटत तर तसं म्हणू शकतोस.... मी स्वप्नातून जागा झालो तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते...

त्यानंतर संध्याकाळी मी माझा जिगरी दोस्त तुषार घाग याला दुबई मध्ये फोन केला आणि त्याला सर्व स्टोरी सांगितली तो म्हणाला तुला लॉटरी लागली आहे ताबडतोब टेस्लाचा मालक एलोन मस्क ला फोन कर आणि भरपूर किमतीला तुझं गॅझेट वीक. मी बोललो ठीक आहे. मग मी ट्विटरवर एलोन मस्क मेसेज पाठवला. आणि बोललो की माझ्याकडे एलियन टेक्नॉलॉजी आहे तू मला किती पैसे देणार? दोन दिवसांनी त्याचा रिप्लाय आला मिस्टर मंदार, मला तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे कुठे येऊ? मी रिप्लाय दिला मी भारतात आहे, चोरवणे गाव रत्नागिरी जिल्हा. महाराष्ट्र. नंतर रिप्लाय आला मी तुम्हाला लवकर भेटतो. यथावकाश आम्ही मुंबईत भेटलो आणि मस्कला ते गॅजेट खूप आवडले.
मस्क म्हणाला, तुम्हाला मी दोन करोड डॉलर देतो पण मला ताबडतोब ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करा. मी ताबडतोब ते गॅजेट मस्कला दिले. आणि दोन दिवसात माझ्या खात्यात दोन करोड डॉलर जमा झाले. आता मी लवकरच वर्ल्ड टूरवर निघत आहे...

© Mandar Katre 21 July 2024
With valuable inputs from तुषार गंगाराम घाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एलिअन ची कथा म्हटल्यावर अनुभव सांगावेच लागतील. ते सांगितले कि कुणीतरी मसणातून तिरमिरी आल्यासारखे चावळत उठणार आणि म्हणणार "अर्धी लाकडं गेली , वयाला साजेसे प्रतिसाद देता येत नाहीत का ?"
त्यांना कसं सांगायचं कि पृथ्वीवरची ३६५ वर्षे म्हणजे आमचा एक दिवस , आताशी शैशव संपलेय. या वयात मॅच्युअर्ड प्रतिसाद कसा द्यायचा ?
एलिअन्स ने काही शिकवलं तर देता येईल एखादा विलक्षण प्रतिसाद.
तोवर एलिअन्सच्या वेबमास्टरांचा एस एम एस वाचतोय " आपल्या नादाला मी सुद्धा लागत नाही, जय एलियन"