Submitted by द्वैत on 8 July, 2024 - 23:21
असा पाऊस कोसळे
सुन्या खिडकीच्यापाशी
झाल्या पुसट पुसट
दिशा दूर क्षितिजाशी
अश्या बरसल्या सरी
पान पान ओलेचिंब
उभे आडोश्याला तिथे
कोण चोरुनिया अंग
अशी कडाडली वीज
दचकून जाग आली
माझी कागदाची नाव
खोल पाण्यात बुडाली
आता वाजे टपटप
माझे कवलारू मन
अंधारता देव्हाऱ्यात
तेवे तुझी आठवण
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा खूप सुंदर....
व्वा खूप सुंदर....
अहाहा!! सुंदरच.
अहाहा!! सुंदरच.
>>>>>अशी कडाडली वीज
>>>>>अशी कडाडली वीज
दचकून जाग आली
माझी कागदाची नाव
खोल पाण्यात बुडाली
जब से बुलबुल तू ने दो तिनके लिए टूटती हैं बिजलियां इन के लिए
हा शेर आठवला.
फार सुरेख कविता!
फार सुरेख कविता!
(शेवटच्या कडव्यातील दुसरी ओळ तंत्राच्या दृष्टीने एकदा तपासा प्लीज)
सुंदर!
सुंदर!
>>> शेवटच्या कडव्यातील दुसरी ओळ
सहमत. ते 'कवलारू' असं वाचून घेतलं मी सध्या.
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद
अष्टअक्षरी भंग होते, हो ते
अष्टअक्षरी भंग होते, हो ते कवलारू असच हवं होतं
तरल...!! खूप भावली कविता...
तरल...!! खूप भावली कविता...
आवडली. खूप छान.
आवडली. खूप छान.
अवांतर : हेच शब्द वापरून सुरूवात असलेली माझी जुनी अष्टाक्षरी आठवली या निमित्ताने आणि गंमत वाटली
छान आहे!
छान आहे!
मस्तच....
मस्तच....