माझ्या निकटच्या नातेवाईकांना (ते IT मध्ये काम करतात) अमेरिकेमध्ये कामासाठी जाण्याची संधी मिळाली आहे. ती स्वीकारावी का नको याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी व मी चर्चा करून पुढील मुद्दे मांडले आहेत.
https://docs.google.com/document/d/e/2PACX-1vQlq6PhlKxGfYsWgdmnZpvCM6qdd...
यावर मायबोलीकरांचे मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः ज्यानी याच परिस्थितीत अमेरिकेला जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये न आलेले मुद्देसुद्धा मांडावेत हि विनंती. आभार.
अजून काही माहिती -
अमेरिकेत जाण्याचे ठिकाण : Overland Park, Kansas
एक मूल, वय १.३ वर्षे
तर दोन मोठी माणसे आणि एक बेबी यांचा वरील ठिकाणी राहण्याचा खर्च काय येऊ शकेल?
UPDATE ---
या धाग्यातील चर्चेतून Pros आणि Cons यांची यादी पुनर्लेखित केली आहे. इतरांना उपयोगी पडेल अशी आशा करतो.
Pros (फायदे) :
१) पैसा - एकटे गेलात तर जास्त बचत होईल आणि कुटुंबासोबत कमी. पण कुटुंबासोबत जास्त समृद्ध आयुष्य जगता येईल.
२) नवीन अनुभव - नवीन लोक, ठिकाणे, अन्न, संस्कृती ई. चा अनुभव मिळेल.
३) करिअर - नवीन जबाबदारी, नवीन कामाची संस्कृती, नवीन लोकांबरोबर कामाचा अनुभव करिअर मध्ये उपयोगी पडेल. व्यक्तिमत्व विकासाला मदत होईल. नवीन टेक किंवा बिझनेस शिकायला मिळणे.
४) इंग्रजी - इंग्रजीत बोलायचा सराव होईल.
५) आयुष्याचा दर्जा - मोठी घरे, शुद्ध हवा, कमी गर्दीची व शिस्तबद्द वाहतूक, मुबलक resources, शिस्त आणि ह्या सगळ्यामुळे रोजच्या जीवनातल्या (९० टक्के ) कमी झालेल्या कटकटी.
६) शाळा - शिक्षणाचा दर्जा चांगला, पण शिक्षण महाग असू शकते, विशेषतः उच्च शिक्षण
७) अमेरिकेत भारतीय बऱ्याच संख्येने आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मिनी-भारता मध्ये राहिल्यासारखे आहे. सर्व भारतीय खाद्यपदार्थ, स्वयंपाकाचे जिन्नस, वस्तू विकत मिळतात.
Cons (तोटे) :
१) मोलकरीण किंवा नातेवाईक यांची स्वयंपाकात-घरकामात आणि मुलांना वाढविण्यात मदत मिळणार नाही. भारतासारखा साग्रसंगीत स्वयंपाक करायला मिळेल याची खात्री नाही. व्यायामाला वेळ मिळेल याची खात्री नाही. शनिवार व रविवार किराणा माल भरणे व घराची साफसफाई करणे यात निघून जातात.
२) बायकोला नोकरी सोडावी लागेल. त्यामुळे पैसे, अनुभव यांचे नुकसान. अमेरिकेत बायकोला वर्क-परमिट मिळायला बराच उशीर लागतो.
३) हवामान - उत्तर व मध्य अमेरिकेत हिवाळा कडक असतो. शून्य अंशाखाली तापमान जाऊ शकते. बर्फवृष्टी होऊ शकते. घरात हिटर असतो. उबदार कपडे घालून बाहेर जाता येते. मोठी बर्फवृष्टी झाल्यास बाहेर जाण्यावर मर्यादा येऊ शकतात. ढगाळ हवामान व हिवाळा यामुळे काही लोकांस उदास वाटू शकते.
४) वाहतूक - बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. स्वतःची कार घ्यावी लागते. स्टिअरिंग व्हील हे दुसऱ्या बाजूला असते, पण त्याची काही अडचण येत नाही. सरावाने जमून जाते.
५) दवाखाना - चांगले डॉक्टर्स आहेत पण अपॉइंटमेंट लवकर मिळत नाही. वैद्यकीय खर्च बराच येतो. ऑफिस कडून आरोग्यविमा असावा.
६) शाळेत जाणारे मूल असेल आणि त्याला इंग्रजी पुरेसे येत नसेल, तर जुळवून घेण्यास कदाचित अडचण येऊ शकेल.
७) अमेरिकेत मित्र कष्ट करून मिळवावे लागतात, (भारतात बालपणापासूनचे मित्र आपण मिळवलेले असतात)
८) अमेरिकेत सुद्धा महागाई वाढत आहे असे काही लोकांचे मत पडले.
आता निर्णय झाला आहे हे छान
आता निर्णय झाला आहे हे छान झाले.
इतके काटेकोर गुगल डॉक बनवून निर्णय घेतले जातात हे नव्यानेच समजले.
निकटच्या नातेवाईकांनी त्यांच्या आयटी फिल्डमधल्या मित्रांसोबत, त्यांच्या अमेरिकेत असलेल्या नातलग, मित्रमंडळींसोबत चर्चा केली होती का ?
तुम्ही स्वतः अमेरिकेला जाऊन आलेला आहात का ? नसेल तर हे कोष्टक (
किंवा जे काही असेल ते) बनवताना गृहीतकांवर बनवले का ? हे कोष्टक मायबोलीवर चर्चेला टाकू, त्यावर जे प्रतिसाद येतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ असे काही ठरले होते का ?
कोष्टक बनवले यातून नीटनेटकेपण समजतो.
पण आमच्या जवळची व्यक्ती अमेरिकेला चालली आहे, पण अमूक अमूक परिस्थिती आहे आणि निर्णय घेता येत नाही, तरी फायदे तोटे सुचवा असा प्रस्ताव असता तरी उत्तम सूचना नक्कीच आल्या असत्या असे पहिल्या पासून वाटले. पण ते टाळले.
क्षमा करा अशा नकारात्मक प्रतिसादाबद्दल.
अजबराव -
अजबराव -
फायदे तोटे सुचवा असा प्रस्ताव
फायदे तोटे सुचवा असा प्रस्ताव असता तरी उत्तम सूचना नक्कीच आल्या असत्या >>>> होय, पण मला स्वतःला सुद्धा थोडे कष्ट घ्यावेच लागणार होते. स्वत: काहीच विचार न करता इतरांकडून सल्ले मागणे पटत नाही. तसेही जे मुद्दे मला सुचले नाहीत त्यावर सुद्धा चर्चा व्हावी असे लिहिले होतेच. किंबहुना मी तयार केलेल्या कोष्टकामुळे मी यावर गंभीर आहे हे कळून बऱ्याच जनांनी सविस्तर प्रतिसाद दिले, आणि उपयुक्त चर्चा झाली.
इतके काटेकोर गुगल डॉक बनवून निर्णय घेतले जातात हे नव्यानेच समजले. >>>> निर्णयाचे महत्व किती आहे यावर त्या निर्णयप्रक्रियेवर किती गुंतवणूक करायची हे मी ठरवतो. बऱ्याचदा केवळ मनात विचार करण्यापेक्षा, जर गोष्टी लिहून काढल्या तर विचार करायला सोपे पडते. इतरांशी शेअर करून एकत्रित निर्णय घ्यायला मदत होते.
तुमच्या meticulous पद्धतीचे
तुमच्या meticulous पद्धतीचे कौतुक आहे.
>>निर्णयाचे महत्व किती आहे यावर त्या निर्णयप्रक्रियेवर किती गुंतवणूक करायची हे मी ठरवतो.
>>>> हे बरीक खरे हो. आमच्या सौभाग्यवतींनी नुकतेच घरासाठी पडदे घेतले. पडदे घेण्यासाठी जितका विचार केला त्याच्या एक दशांशही मला हो म्हणायच्या आधी केला नव्हता असे सांगून झाले
मला हे जबरदस्त आवडलं आहे
मला हे जबरदस्त आवडलं आहे
घरात उपमा म्हणून वापरण्यात येईल.आमच्याकडे मोबाईल घेताना जितका विचार आणि अभ्यास केला जातो तितका बायको निवडताना अजिबात केला नसावा.
मोबाईल बदलता येतो, बाईल नाही
मोबाईल बदलता येतो, बाईल नाही हाच विचार असेल
मोबाईलचा टॉकटाईम नियंत्रणात
मोबाईलचा टॉकटाईम नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
बायको आणि मोबाईल आपल्याला
बायको आणि मोबाईल आपल्याला निवडतात.नसत्या भ्रमात राहू नका, गैरसमज दूर करा लोकहो.
The wand chooses the wizard.
The wand chooses the wizard. - Mr. Ollivander.
सहा महिन्यात हे महोदय ब्लॅक
सहा महिन्यात हे महोदय ब्लॅक हिस्टरी, हिस्पॅनिक इम्मिग्रंट वगैरे वर पोस्टी टाकुन राह तील. टार गेरिअन इतके व्हाइट केस असल्यावाणी च चतुर्थीसाठी सबुदाणा शोधतील. एक और लाइन पे लग गया.
होय, पण मला स्वतःला सुद्धा
होय, पण मला स्वतःला सुद्धा थोडे कष्ट घ्यावेच लागणार होते. स्वत: काहीच विचार न करता इतरांकडून सल्ले मागणे पटत नाही. तसेही जे मुद्दे मला सुचले नाहीत त्यावर सुद्धा चर्चा व्हावी असे लिहिले होतेच. किंबहुना मी तयार केलेल्या कोष्टकामुळे मी यावर गंभीर आहे हे कळून बऱ्याच जनांनी सविस्तर प्रतिसाद दिले, आणि उपयुक्त चर्चा झाली. >> माफ करा हे कोष्टक गंभीर आहे असे मुळीच वाटले नाही.
जो मनुष्य आयटी मधे आहे त्या क्षेत्रात अमेरिकेला जाण्या न जाण्याचे फायदे तोटे सांगणारे कुणीही त्याला उपलब्ध नाहीत असे समजणे अवघड आहे. पोस्टलेखक ज्याला अमेरिकेबाबत फर्स्ट हॅण्ड माहिती नाही त्याची निवड कोष्टक बनवायला केलेली असणे आणि त्यावर कोष्टक बनवणे हे मायबोलीवर धागा टाकून सल्ले काय येतात त्यावर आपले अमिरेकाप्रयाण आधारित असावे असे प्लॅनिंग केलेले असेल हे पचायला अवघड आहे.
क्षमा करा. पण हे असेच वाटले.
माफ करा हे कोष्टक गंभीर आहे
माफ करा हे कोष्टक गंभीर आहे असे मुळीच वाटले नाही.>>> त्यांच्या साठी गंभीर असेल, त्यांना ज्या ज्या गोष्टी कंसिडर कराव्या वाटल्या, माबोकरांचा सल्ला घ्यावा वाटला, त्यांनी तो घेतला. क्वेरी टाकणार्यांच्या सिरियसपणावर च प्रश्न उमटवायची काय गरज आहे?
मग एखाद्या ला सल्ला विचारावा वाटला तर लोकांना काय वाटेल हा विचार आधी करायचा का?
एव्हढे का डाफरताय?
एव्हढे का डाफरताय?
काम झाले म्हणून प्रतिसाद देत आहे असे म्हटले आहे हे वाचले नाही का?
त्यांना जे सल्ले हवे ते मिळाले आहेत.
त्यानंतर माझे मत मांडले. यापेक्षा थेट मागच्या पानावर इतरांनीही मांडले आहे. शिवाय ते मान्य करा ही सक्ती नाही.
तुमचा प्रॉब्लेम समजला नाही.
मत द्यायचे नाही असा फतवा काढला आहे का? कारण काय?
त्यांना जे गांभीर्याने वाटत
त्यांना जे गांभीर्याने वाटत आहे ते मला वाटत नाही. यात तुम्हाला आक्षेप असण्याचे कारण नाही.
कोष्टक न बनवता वर म्हटल्याप्रमाणे साधी क्वेरी असती तर लोकांचे अनुभव उस्फूर्तपणे आले असते. तसे न होता केवळ कोष्टकावर लोकांनी मतं मांडली आहेत.
एक तर तुम्ही पूर्ण वाचत नाही किंवा तुम्हाला माझ्या बद्दल आकस असावा. तो असण्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे.
न्यायाधीश बनण्याचे ही आहे.
मला कसलाच आकस नाही. माझा
मला कसलाच आकस नाही. माझा प्रतिसाद पण डाफरण्याच्या भाषेत लिहिला नाहिये. मी परत वाचला & कन्फ्युज झाले
फक्त इतकेच की धागा लेखकाने जसे लिहिले आहे, हा लेख माझे वडील/काका किंवा एखादा स्नेही त्यांच्या जवळील व्यक्ती ला सर्व सिचुवेशन्स पाहून बघून योग्य/बेस्ट सल्ला मिळावा ह्या कळ कळीने लिहिलेला असा वाटला. त्यांना दुसरे कुणी आयटी मधे सल्ला देणारे आहेत का नाहीत ह्याच्याशी कुणाला काय? त्यांना माबो चा सल्ला उपयुक्त वाटत असेल, इथे अनेक भारतीय अमेरिका वासी आहेत..
त्यांना दुसरे कुणी आयटी मधे
त्यांना दुसरे कुणी आयटी मधे सल्ला देणारे आहेत का नाहीत ह्याच्याशी कुणाला काय?>> ते तुमचं मत आहे. मल्लिनाथी म्हणा हवं तर.
या विषयावर मला तुमच्याशी वाद वाढवायचा नाही.
तर अमेरिकेत गेलेल्या माझ्या
तर अमेरिकेत गेलेल्या माझ्या नातेवाईकांना आयुर्वेदिक औषधे पाठवायची आहेत . २ कुरिअर कंपन्यांकडे चौकशी केली. त्यांनी किलोला साधारण ६ हजार व १० हजार खर्च येईल असे सांगितले आहे. त्याचबरोबर कस्टम मध्ये अडकू नये यासाठी कागदपत्रे सांगितली आहेत. कागदपत्रे तयार करत आहे .
ती औषधे कोणत्याही कारणाने (गहाळ, कस्टम ने प्रवेश नाकारणे, इजा होणे, इ.) पोचली नाहीत तर भरपाई मिळते का असे कुरिअर कंपनीला विचारे असता नाही असे उत्तर आले. एका कंपनीने ऐच्छिक विम्यासाठी दीड हजार जास्त लागतील असे सांगितले. एक कंपनी म्हणाली कि कस्टम ने नाकारले तर ते तिथेच नष्ट करतात. दुसरी कंपनी म्हणाली कि कस्टमने नाकारले तर तुम्हाला ते परत येते.
तर अशी आयुर्वेदिक औषधे कोणी पाठविली आहेत का ? काय अनुभव आहेत ? काय काळजी घ्यावी? किती खर्च आला होता ? भारतीय पोस्टाची अशी काही सेवा आहे का ?
स्वस्तातील स्वस्त मार्गाने
स्वस्तातील स्वस्त मार्गाने पाठवा आणि विसरून जा. आली तर आपली नाही तर गेली. फेडेक्स इन्शुरन्स फंदात पडू नका. पोस्टाने स्वस्त होईल आणि महिन्याभरात पोहोचेल. हवं तर दोनदा पाठवा. एक अडकलं तर दुसरं मिळेल. शक्यता वाढेल.
परत काही येणार नाही. ते नष्ट करतील.
पटेल कडे विचारा मिळताहेत का? मिळतही असतील.
आपण घेऊन गेलं तर बिया नाही चालत पण इबे, विश वरून वाट्टेल त्या गोष्टी राजरोस आणता येतात. फार विचार करू नका. पाठवून द्या.
२ कुरिअर कंपन्यांकडे चौकशी
२ कुरिअर कंपन्यांकडे चौकशी केली. त्यांनी किलोला साधारण ६ हजार व १० हजार खर्च येईल असे सांगितले आहे. >>हो एवढाच खर्च येतो.
एक कंपनी म्हणाली कि कस्टम ने नाकारले तर ते तिथेच नष्ट करतात.>>> येस! कस्टमने नाकारले तर ते नष्ट करतिल..
आयुवैदीक पॅकबन्द ब्रेण्डेड प्रॉडक्ट ज्याच्या बाटल्यवर कन्टेड लिस्ट असते, जसे सितोपलादी चुर्ण हिमालया किवा इतर वेल नोन ब्रॅन्ड बहुधा चालावे...
पण तुमच्या लोकल आयुवैदीक डोक्टरने पुड्या, चुर्ण, चाट्ण दिले असतिल तर ते बहुधा चालणार नाहित..
स्वचःचा अनुभव नाही पण कुरियरने सगळ पॅकबन्द, ब्रॅन्डेड चालत...कुरियरवाल्याने खात्री दिली नसेल किवा त्याच्याकडच्या न चालणार्या लिस्ट मधल असेल तर पाठवु नका..वेस्ट होइल.कुरियरवाले भरपाई देत नाहित.
भारतिय पोस्टाचा माझा अनुभव अत्यत वाइट आहे..एकदा भारतारतुन पाठवलेले कपड्यामधे फक्त एक कपडा आला( ६ पैकी एक) आम्ही इथुन २ लहान मुलाचे टॉप आणी जिन्स पाठवले तर जिन्स गायब झाल्या फक्त टोप पोहोचले...हे साधारन २००६-७ मधला अनुभव आहे त्यानतर कधिही काहीही पोस्टाने मागवले नाहि.( यु एस मधे फक्त एवढच पोहोचल याचे निट तपशिल युएस पोस्टल सर्व्हिसने दिले होते)
औषधे महाग आहेत (साधारण पंधरा
औषधे महाग आहेत (साधारण पंधरा हजाराच्या आसपास) त्यामुळे दोनदा पाठवणे व्यवहार्य वाटत नाही. औषधे ब्रँडेड आहेत पण ब्रँड छोटा आहे. फक्त भारतात मिळतात, इतर मार्केट - प्लेसेस वर, किंवा इतर देशात पाठविण्याची त्यांची सेवा नाही.
ब्रँडेड असतील तर पाठवून द्या.
ब्रँडेड असतील तर पाठवून द्या. कस्टम आणि बॉर्डर सिक्युरिटी वाल्यांना कधी काय नको वाटेल कोण सांगू शकेल? असही त्यावर अपील नाही. इथे इतकं विचारत आहात म्हणजे न पाठवणे हा उपाय आहे का?
नाहीतर चकल्या, चिवडा, लाडू पाठवा आणि बरोबर औषधे पाठवा. जुगाड. प्रोसेसड फूड म्हणून लिहा. येतील. नाही आली तर सगळंच जाईल मातीत. एक अनुभव येईल त्यावर गणेशोत्सवात लेख लिहा. लवकर पाठवा म्हणजे गणेशोत्सव संपेपर्यंत हा जयद्रथ होऊन जाईल.
भारतीय पोस्टाचा माझा अनुभव उत्तम आहे.
छोटा ब्रांड असला तरी तिथल्या
छोटा ब्रांड असला तरी तिथल्या ॲमेझॉनवर ऍव्हेलेबल आहे का ते चेक करा. मला हव्या त्या ब्रांडचे नसले तरी त्रिकटू चूर्ण एका वेगळ्या ब्रांडचे कॅनडासाठी ऑर्डर करता आले होते.
आयुर्वेदिक नाही पण माझं
आयुर्वेदिक नाही पण माझं होमिओपॅथीचं औषध परवाच कुरियरने ४ दिवसात येऊन पोचलं आहे. माझ्या पासपोर्टची कॉपी, डॉक्टरचं लेटर्/प्रिस्क्रिप्शन आणि कुरियर करणार्या व्यक्तीच्या आधार कार्डची कॉपी वगैरे लागली. खर्च साधारण ३.५/४ हजार रुपये आला.
कुणी ओळखीचे येणारे असतील तर
कुणी ओळखीचे येणारे असतील तर त्यांच्या सोबत पाठवा..काही problem येत नाही..मी नेहमी पाठवते..पण कुरिअर कंपनी चा अनुभव नाही..
औषधे कुरिअरने पाठविली. ४ -५
औषधे कुरिअरने पाठविली. ४ -५ दिवसात पोचली. रु ४५०० खर्च आला . १ kg वजन झाले. बरीच कागदपत्रे लागली.
सर्टिफिकिट ऑफ मेडिसिन
प्रिस्क्रिप्शन
औषधांचे बिल
(वरील तीनही कागदपत्रे लेटरहेडवर सही शिक्क्यासहित मूळ प्रत)
पाठवणाऱ्याचे आधार, पॅन २ झेरॉक्स प्रती
स्वीकारणाऱ्याच्या पासपोर्ट ची झेरॉक्स प्रत
पाठविणाऱ्याचे हमीपत्र
इन्व्हॉईस व इतर कागदपत्रे कुरीवरवाला तयार करतो .
माबो वाचक पुन्हा धाग्यावर
माबो वाचक पुन्हा धाग्यावर येउन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
बरोबर आहे तुमचे माबो वाचक..
बरोबर आहे तुमचे माबो वाचक.. कुरिअर वाल्यांना बरेच कागदपत्र लागतात.
साधा फराळ पाठवताना पण हल्ली आधार कार्ड पासून सगळ्या गोष्टी लागतात
Pages