अर्थ संकल्प की निवडणूक जाहिरनामा

Submitted by ashokkabade67@g... on 29 June, 2024 - 11:22

काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री असलेल्या अजीत पवारांनी युतीसरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला लोकसभा निवडणुकीत युतीन सपाटून मार खाल्ल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीतही युतीला यशाची खात्री नसल्याने लोकानुनय करणारा अर्थ संकल्प असेल हे माहीतच होत म्हणून या अर्थसंकल्पात आश्वासनांची गाजर दाखवली गेली पण ती सर्व समावेशक जनतेला नाही तर फक्त एका वर्गाला खुष करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे.
अनेक योजना जाहीर केल्या त्यात मुलींसाठी फीमाफीची योजना असो वा लाडकी बहिण योजना असो या योजनेचा अध्यादेश [जी .आर ] काढण्यात एक महिणा जाणार त्यानंतर अर्ज करण्यात दिडदोन महिणे आणि तोपावेतो निवडणूक जाहिर होणार मग जर.युती सरकार आलच तर महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करत जनतेच्या पदरात काही टाकेल, बर या अर्थ संकल्पात महागाईन कंबरड मोडलेल्या मध्यमवर्गीय जनते साठी काहीच नाही बेरोजगार तरुणांना कुठलाच दिलासा नाही. एकुण काय त घरमा नही दाना खिसामा नही आना वाटस मी गाजर मले बाजीराव म्हना अशातला हा जनतेची थट्टा करणारा . हा अर्थसंकल्प दिसतोय ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पंजाबमध्ये आआप आणि कर्नाटकात कॉन्ग्रेसने जे केलं ते यांनी अर्थसंकल्पातच आणलं. पुढच्या निवडणुका गरीबी हटाव नसून गरीबांना वाटावाटी असणार आहेत.
पैसे कुठून आणणार?